एक्स्प्लोर

BLOG : शंभर पायांची गोम

रिश्ता, प्यार, ख्याल, दीदार और माफ़ी हैं।
इक 'शक' इनकी मौत के लिए काफ़ी है।।

संशय येणे हे जागरुकतेचे लक्षण असले तरी सतत संशय घेणे हा एक मानसिक आजारच आहे. (संशयाचा फायदा फक्त एका ठिकाणी मिळतो. तो म्हणजे आरोपीला न्यायालयात.)
संशयाने माणसाची नजर गढूळ होते. संशयी व्यक्तीसोबत जगणे म्हणजे एक प्रकारचा नरकवासच. त्यात पुन्हा 'विवाहबाह्य संबंध' म्हणजे लफड्याचा संशय असेल तर त्याला एक वेगळीच धार चढते. 
अशाच एका संशयी बायकोला घेऊन सुजय सावंत नावाचा एक मेकॅनिक मानसतज्ज्ञ डाॅ. उदय देशपांडे यांच्याकडे येतो आणि 'मन सुद्ध तुझं' या मालिकेचा अकरावा भाग सुरू होतो. ही मालिका सध्या एबीपी माझा वाहिनीवर दर रविवारी प्रसारित होत आहे.

सुजयची पत्नी सुरेखा डाॅक्टरांच्या वेटिंग रूममध्ये बसलेली असतानाच तिची दातखिळ बसते. डाॅक्टर आणि नर्स तिला धरून केबिनमध्ये नेतात. बीपी तपासतात. तोवर ती भानावर येते. 
सुरेखा डॉक्टरांना सांगते की, "आम्हाला एक छोटी मुलगी आहे. माझा नवरा वॉटर प्युरिफायर दुरुस्तीचे काम करतो. तसा खूप चांगला आहे. व्यसन करत नाही वगैरे. पण त्याचं समोर राहणार्‍या एका बाईसोबत लफडं आहे. त्या बाईला मुलंबाळं आहेत. तिचा नवरा दुबईला असतो. श्रीमंत आहे. अधून मधून येतो. परत जातो आणि ही बाई इकडे रंग उधळते." 
डॉक्टर सुरेखाला विचारतात की,"तुला असा संशय का येतो?" तर सुरेखा सांगते की,"मी स्वतःच्या डोळ्यांनी पाहिलंय की, ती बाई माझ्या नवर्‍याच्या स्कूटरवर बसून जाताना. पूर्वी नीटनेटके राहायला सांगितले तर दुर्लक्ष करायचा. पण आता उलटसुलट भांग पाडत बसतो. खिडकीत उभा राहून चहा पितो. लक्ष सगळं समोर. फोनला हात लावून हळूहळू बोलतो. कामावर गेला की माझा फोन घेत नाही. घेतला तरी तुटक बोलतो. त्यामुळे आता माझा जीव कशातच रमत नाही. सारखे तेच विचार येतात. जेवण गोड लागत नाही." बोलता बोलता सुरेखाच्या डोळ्यांत अश्रू येतात.

डॉक्टर विचारतात की, दातखिळ कधीपासून बसते. तर ती सांगते की, संशय आला तेव्हापासून.आता डॉक्टर या प्रकरणाचा ताबा घेतात आणि तिला विचारतात की, "या प्रकरणाला दुसरी बाजू असू शकेल असे तुला वाटत नाही का? तू तुझ्या नवर्‍याची तक्रार करतानाही त्याच्याबद्दल चांगलंच बोलत होतीस. मग कदाचित तूच 'चेन्नईच्या टॅक्सीत' बसली असशील!" (चेन्नईची टॅक्सी म्हणजे काय ते सुरेखाला कळत नाही. तेव्हा डॉक्टर तिला एक किस्सा सांगतात. ते एकदा चेन्नईला गेले असताना टॅक्सीवाला आपल्याला लुटतो की काय या संशयाने डॉक्टर घाबरले होते. मात्र टॅक्सीवाल्याने त्यांना सुखरूप हॉटेलवर पोचवले होते.)

शेवटी सुजय सावंतला डॉक्टर केबिनमध्ये बोलावतात. त्याच्याशी बोलल्यानंतर या संशयामागचा उलगडा होतो आणि तिघेही मनमोकळे हसू लागतात.
हा उलगडा नेमका काय होतो ते पाहण्यासाठी मालिकेचा अकरावा भाग यू ट्यूबवर पाहू शकता.

सत्याचा आधार नसलेला संशय म्हणजे विभ्रम. संशय ही शंभर पायांची गोम आहे. ती ज्याच्या डोक्यात घुसते त्याला ठार वेडे करते. तिचे एक दोन पाय तुटल्याने काहीच होत नाही. तिला पूर्णपणे डोक्याबाहेर फेकून देणे हाच जालीम इलाज असतो. 

संशयाने अनेकांची आयुष्ये उद्ध्वस्त झालेली आहेत. लोकांनी एकमेकांचे खून केले आहेत. अनेकांनी आत्महत्या केल्या आहेत. त्यामुळेच केवळ संशयावरून न्यायालय कुणालाही फाशी देत नाही. आरोपीचा जीव गेल्यानंतर संशय खोटा निघाला तर त्याचा जीव परत कसा आणणार? 
संशय घेतल्याने संशय वाढतो आणि विश्वास ठेवल्याने विश्वास वाढतो. जगण्यात आशय असेल तरच मजा आहे. संशयाने केवळ मातीच होते.

विनोद जैतमहाल  इतर ब्लॉग

BLOG : हिरव्या देठाची पिवळी केळी

BLOG: 'बायपोलर'

BLOG | इमर्जन्सी

BLOG : नो प्रिस्क्रिप्शन..

BLOG : यांना झालंय तरी काय?

अधिक पाहा..

ओपिनियन

Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Jayant Patil : जयंत पाटलांचं चाललंय तरी काय? दरवाजा उघडून सत्तेत जाणार की अजितदादांना हात दाखवून पुढे जाणाऱ्या शरद पवारांचा मार्ग स्वीकारणार?
जयंत पाटलांचं चाललंय तरी काय? दरवाजा उघडून सत्तेत जाणार की अजितदादांना हात दाखवून पुढे जाणाऱ्या शरद पवारांचा मार्ग स्वीकारणार?
Narayan Rane PC | 'त्या' घरात आदित्य काय धुमाकूळ घालत होता, मला माहिती, राणेंची आक्रमक पत्रकार परिषद
Narayan Rane PC | 'त्या' घरात आदित्य काय धुमाकूळ घालत होता, मला माहिती, राणेंची आक्रमक पत्रकार परिषद
रिया चक्रवर्तीला क्लीन चिट, सुशांत सिंह राजपूतची आत्महत्याच; सीबीआयचा क्लोजर रिपोर्ट दाखल
रिया चक्रवर्तीला क्लीन चिट, सुशांत सिंह राजपूतची आत्महत्याच; सीबीआयचा क्लोजर रिपोर्ट दाखल
Devendra Fadnavis : फडणवीसांना नाशकात पाय ठेवू देणार नाही, ठाकरेंच्या शिवसैनिकांचा मुख्यमंत्र्यांना थेट इशारा
फडणवीसांना नाशकात पाय ठेवू देणार नाही, ठाकरेंच्या शिवसैनिकांचा मुख्यमंत्र्यांना थेट इशारा
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Malhar Certificate Jejuri | मल्हार सर्टिफिकेट नावाला जेजुरी ग्रामस्थांचा विरोध, गावकरी म्हणाले..Special Rpeort Prashant Koratkar : पोलिसांचं सहकार्य? 'चिल्लर' प्रशांत कोरटकर सापडत कसा नााही?Nagpur Rada Loss : नागपूर राड्याचं नुकसान दंगेखोरांकडून वसूल करणार, फडणवीसांचा थेट इशाराSpecial Report Sharad Pawar : जयंत पाटील अजितदादांची भेट, संजय राऊतांचा थयथयाट, नेमकं शिजतंय काय?

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Jayant Patil : जयंत पाटलांचं चाललंय तरी काय? दरवाजा उघडून सत्तेत जाणार की अजितदादांना हात दाखवून पुढे जाणाऱ्या शरद पवारांचा मार्ग स्वीकारणार?
जयंत पाटलांचं चाललंय तरी काय? दरवाजा उघडून सत्तेत जाणार की अजितदादांना हात दाखवून पुढे जाणाऱ्या शरद पवारांचा मार्ग स्वीकारणार?
Narayan Rane PC | 'त्या' घरात आदित्य काय धुमाकूळ घालत होता, मला माहिती, राणेंची आक्रमक पत्रकार परिषद
Narayan Rane PC | 'त्या' घरात आदित्य काय धुमाकूळ घालत होता, मला माहिती, राणेंची आक्रमक पत्रकार परिषद
रिया चक्रवर्तीला क्लीन चिट, सुशांत सिंह राजपूतची आत्महत्याच; सीबीआयचा क्लोजर रिपोर्ट दाखल
रिया चक्रवर्तीला क्लीन चिट, सुशांत सिंह राजपूतची आत्महत्याच; सीबीआयचा क्लोजर रिपोर्ट दाखल
Devendra Fadnavis : फडणवीसांना नाशकात पाय ठेवू देणार नाही, ठाकरेंच्या शिवसैनिकांचा मुख्यमंत्र्यांना थेट इशारा
फडणवीसांना नाशकात पाय ठेवू देणार नाही, ठाकरेंच्या शिवसैनिकांचा मुख्यमंत्र्यांना थेट इशारा
China Counties In Ladakh : लडाखमध्ये चीनची घुसखोरी सुरुच, दोन नव्या काउन्टीची निर्मिती; केंद्र सरकार 'डिप्लोमॅटिक' पद्धतीने विरोध करणार!
लडाखमध्ये चीनची घुसखोरी सुरुच, दोन नव्या काउन्टीची निर्मिती; केंद्र सरकार 'डिप्लोमॅटिक' पद्धतीने विरोध करणार!
गावरान लाल मिरचीचा तिखट ठसका! क्विंटलमागे 21 हजाराचा भाव, आवक वाढतेय, पहा कुठे काय स्थिती? Photos
गावरान लाल मिरचीचा तिखट ठसका! क्विंटलमागे 21 हजाराचा भाव, आवक वाढतेय, पहा कुठे काय स्थिती? Photos
Ajit Pawar & Jayant Patil : जयंत पाटील पक्ष सोडतील हे निश्चित; अजितदादा-जयंत पाटलांची बंद दाराआड चर्चा होताच शिवसेना नेत्याचा मोठा दावा
जयंत पाटील पक्ष सोडतील हे निश्चित; अजितदादा-जयंत पाटलांची बंद दाराआड चर्चा होताच शिवसेना नेत्याचा मोठा दावा
टील ब्लू ऑफ शोल्डर गाउनमध्ये निमरत कौरचा क्लासी लुक!
टील ब्लू ऑफ शोल्डर गाउनमध्ये निमरत कौरचा क्लासी लुक!
Embed widget