एक्स्प्लोर

BLOG | रहस्यमयी मोनोलिथ, चर्चेचा विषय!

सोशल मीडियावर सध्या 'मोनोलिथ' नावाचा शब्द सध्या फारच चर्चेत आहे. काही ठिकाणी 'मोनोलिथ' सापडले आणि रहस्यमय रित्या गायबही झालेत.आपल्या आजूबाजूला असं काही घडलं 'उडती तबकडी' दिसली तरी घाबरून मात्र जाऊ नका.

एक... दोन.. नाही तर तिसरा रहस्यमयी मोनोलिथ आढळून आला आहे. सोशल मीडियावर या दिवसात 'मोनोलिथ' नावाचा शब्द सध्या फारच चर्चेत आहे. काही ठिकाणी 'मोनोलिथ' सापडले आणि रहस्यमय रित्या गायबही झालेत.. आता मोनोलिथ म्हणजे काय हा प्रश्न पडला असेल. मोनोलिथ म्हणजे एक दगडी किंवा धातूचा उंच उभा केलेला खांब. जो उताह वाळवंट इथं निदर्शनास आला आणि रहस्यमय रित्या गायब होताच उत्तर रोमानियाच्या एक टेकडीवर पाहायला मिळाला... कॅलिफोर्निया, नेदरलँड इथं देखील हे प्रकार लक्षात आले आहेत. सध्या माहिती हाती येतेय त्यानुसार युकेच्या व्हाईट बिच वर देखील 'मोनोलिथ' पाहायला मिळाला आहे.

परग्रहवासियांसंबंधी मानवाच्या खुप साऱ्या कल्पना आहेत. ज्या कथा शोधनिबंध तर कित्तेक चित्रपट-पुस्तक माध्यमातून देखील याबाबतीत माहिती व दावे आणि यांच्या अस्तित्वाच्या मागील सत्यतेचा आढावा शोध आपण वाचत पाहत आलो असलो तरीही मात्र अजूनही 'उडत्या तबकड्या' दिसल्या किंवा एलियन उतरले अश्या अफवा पसरल्या तरी आपण मात्र कुतूहलाने याविषयी खोलवर जाऊन सुद्धा कोणी कितीही सांगितले हे खरं नाहीये तरी आपल्याला खरंच वाटत असतं.

'नासा'मधील कम्प्यूटर शास्त्रज्ञ सिल्व्हानो पी. कोलंबानो यांनी सादर केलेल्या शोध निबंधात सांगितलंय की 'परग्रहवासीय पृथ्वीवर आलेले आपल्या लक्षातही आले नसतील, कारण 'एलियन' आणि त्यांच्या 'उडत्या तबकड्या' यापलीकडे पृथ्वीवासीयांच्या संकल्पना पलीकडे जात नाहीत' असं ते म्हणतात, याबाबतीत ठोस पुरावे मात्र समोर आले नाहीत...

अश्यातच अलीकडे रहस्यमय 'मोनोलिथ' अढळले आहेत. काहींचा तर ठाम दावा आहे की परग्रहवासीय पृथ्वीवर आले आणि त्यांनी हे 'मोनोलिथ' उभे केले असावे आणि काही ते दिवसातच अचानकपणे गायबही झालेत.

BLOG | रहस्यमयी मोनोलिथ, चर्चेचा विषय!

आपल्याला माहीत असलेलं 'स्टोनहेंज' (Stonehenge) हे सुद्धा इंग्लंडच्या विल्टशायर काउंटीमधील एक वास्तू आहे. स्टोनहेंजमध्ये अनेक मोठे दगड उभ्या स्थितीमध्ये वर्तूळाकार शैलीत रचलेले आहेत. ही वास्तू अंदाजे इ.स. पूर्व 3000 मध्ये बनली असावी असा पुरातत्त्वशास्त्रज्ञांचा अंदाज आहे. ही वास्तू देखील एक मोनोलिथ चा प्रकार आहे.

पण या वास्तूचा आणि या मोनोलिथ चा काहीही संबंध नक्की नसावा कारण दगडी नाही तर धातूचा खांब प्रथम शोधला तो 18 नोव्हेंबर 2020 ला अमेरिकेत वाळवंटात अ‍ॅडव्हेंचर करणाऱ्या डेव्हिड सर्बर यांनी!

BLOG | रहस्यमयी मोनोलिथ, चर्चेचा विषय!

डेव्हिड यांनी संबंधित सर्वात प्रथम हे फोटो आणि व्हिडीओ इन्स्टाग्राम वर पोस्ट केले. मोठमोठ्या दगडांच्या मध्ये एक धातूचा त्रिकोणी खांब जमिनीत रोवलेला यात दिसत होता आणि तो चुंबकीय नव्हता.

View this post on Instagram
 
A post shared by David Surber (@davidsurber_)

हे फोटो सोशल मीडियावर चर्चेचा विषय होतो तोच हा मोनोलिथ गायब झाला आणि उत्तर रोमानिया येथे आढळून आला. याचीच पुनरावृत्ती युके मधेही एकामागोमाग घडली. पण हे तिन्ही ठिकाणी हा खांब रोवला कुणी हे कारण मात्र गुलदस्त्यात आहे. काही मंडळींनी असेही दावे केले, एका आर्टिस्टने उताह येथे 4 चारवर्षांपूर्वी हे गुप्तपणे उभारलं असल्याचं म्हटलं तर या खांबाला चार लोकांनी उखडून टाकलं असं कोलरडोचे फोटोग्राफर रॉस बरनोर्ड्सने सांगितले आणि याविषयीचे फोटो सुद्धा इन्स्टाग्राम वर टाकले आहेत.

रॉस बरनोर्ड्सने याच चार लोकांचे फोटो शेयर करताच एक Youtuber MrSlackline ने एक व्हिडिओ शेयर करत सांगितले की हा मोनोलिथ त्यांनी हटवला. याचं कारणही त्यांनी सांगितलं, की हा मोनोलिथ पाहायला पर्यटकांनी कोरोना तिथं काळात गर्दी करणं चुकीचं होतं आणि पर्यटक गर्दी करत आहेत म्हणून आम्ही हटवला.

हा मोनोलिथ आला कसा..? खरंच एलियन आले त्यांनी आणलं होतं की वरील मंडळींचे दावे. अजूनही वेगवेगळ्या ठिकाणी होत असलेल्या रहस्यमयी घटनांमागचा हेतू काय असावा. याबाबत म्हणायचं झालं तर देशातील पर्यटन व्यवसाय वाढीसाठी हे केलं गेलं आहे का? की केलेला पोरकटपणा नक्की माहीत नाही, मात्र नेटिझन्सनी यावर भरपूर मिम्स आणि जोक्स तयार करून याही रहस्यमय गोष्टींचा आनंद मात्र घेतलाय.खरी गोष्ट लपून राहणार नाही. यामागे काही धोक्याची सूचना तर नाही ना? त्या त्या देशाच्या यंत्रणा याचा शोध घेतलीच पण आपल्या आजूबाजूला असं काही घडलं 'उडती तबकडी' दिसली तरी घाबरून मात्र जाऊ नका.

अधिक पाहा..

ओपिनियन

Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Bhaskar Jadhav : शिवसेनेची काँग्रेस झाली, भास्कर जाधवांची खदखद बाहेर; सेनेत धुसफूस, ठाकरे काय निर्णय घेणार? 
शिवसेनेची काँग्रेस झाली, भास्कर जाधवांची खदखद बाहेर; सेनेत धुसफूस, ठाकरे काय निर्णय घेणार? 
India Open 2025 Badminton : पीव्ही सिंधू, किरण जॉर्ज, ध्रुव-तनिषा दुसऱ्या फेरीत; चीनच्या पाचव्या मानांकित ली शी फेंगचा पराभव 
पीव्ही सिंधू, किरण जॉर्ज, ध्रुव-तनिषा दुसऱ्या फेरीत; चीनच्या पाचव्या मानांकित ली शी फेंगचा पराभव 
Garbage Free Hour : बुधवारी मुंबईत 'गार्बेज फ्री अवर', सकाळी 11 ते 1 वाजेपर्यंत कचरा मुक्तीसाठी सामूहिक स्वच्छता मोहीम
बुधवारी मुंबईत 'गार्बेज फ्री अवर', सकाळी 11 ते 1 वाजेपर्यंत कचरा मुक्तीसाठी सामूहिक स्वच्छता मोहीम
आधीच जागेची वानवा, कारसाठी जागा पार्कींगचा निर्णय; शासनाचे धोरण, ठाकरेंची प्रतिक्रिया, नागरिकांचाही संताप
आधीच जागेची वानवा, कारसाठी जागा पार्कींगचा निर्णय; शासनाचे धोरण, ठाकरेंची प्रतिक्रिया, नागरिकांचाही संताप
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Mahakumbh Mela 2025 | महाकुंभ मेळाव्यात आज पहिलं अमृत स्थान Special ReportWalmik karad Macoca | वाल्मीक कराडवर मकोका, मुलासाठी आईची तळमळ, परळीत ठिय्या Special ReportRajkiya Shole Sharad pawar vs Amit Shah|अमित शाहांच्या टीकेला शरद पवारांचं तिखट उत्तर Special ReportRajkiya Shole on Walmik Karad | वाल्मीक कराडवर मकोका, आससापोटी गुन्हे वाढवत असल्याचा पत्नीचा आरोप

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Bhaskar Jadhav : शिवसेनेची काँग्रेस झाली, भास्कर जाधवांची खदखद बाहेर; सेनेत धुसफूस, ठाकरे काय निर्णय घेणार? 
शिवसेनेची काँग्रेस झाली, भास्कर जाधवांची खदखद बाहेर; सेनेत धुसफूस, ठाकरे काय निर्णय घेणार? 
India Open 2025 Badminton : पीव्ही सिंधू, किरण जॉर्ज, ध्रुव-तनिषा दुसऱ्या फेरीत; चीनच्या पाचव्या मानांकित ली शी फेंगचा पराभव 
पीव्ही सिंधू, किरण जॉर्ज, ध्रुव-तनिषा दुसऱ्या फेरीत; चीनच्या पाचव्या मानांकित ली शी फेंगचा पराभव 
Garbage Free Hour : बुधवारी मुंबईत 'गार्बेज फ्री अवर', सकाळी 11 ते 1 वाजेपर्यंत कचरा मुक्तीसाठी सामूहिक स्वच्छता मोहीम
बुधवारी मुंबईत 'गार्बेज फ्री अवर', सकाळी 11 ते 1 वाजेपर्यंत कचरा मुक्तीसाठी सामूहिक स्वच्छता मोहीम
आधीच जागेची वानवा, कारसाठी जागा पार्कींगचा निर्णय; शासनाचे धोरण, ठाकरेंची प्रतिक्रिया, नागरिकांचाही संताप
आधीच जागेची वानवा, कारसाठी जागा पार्कींगचा निर्णय; शासनाचे धोरण, ठाकरेंची प्रतिक्रिया, नागरिकांचाही संताप
मोठी बातमी! धनंजय मुंडे देवगिरीवर, अजित पवारांशी 10 मिनिटं चर्चा अन् थेट परळीला रवाना
मोठी बातमी! धनंजय मुंडे देवगिरीवर, अजित पवारांशी 10 मिनिटं चर्चा अन् थेट परळीला रवाना
वाल्मिक कराडची प्रकृती बिघडली, थकवा, चेस्ट पेन; SIT पथकासह थेट रुग्णालय गाठलं
वाल्मिक कराडची प्रकृती बिघडली, थकवा, चेस्ट पेन; SIT पथकासह थेट रुग्णालय गाठलं
Video: तू माझ्याकडून लाख रुपये घेतले, वाल्मिक कराडच्या प्रश्नावर अजित पवारांचा पत्रकारांनाच प्रतिसवाल
Video: तू माझ्याकडून लाख रुपये घेतले, वाल्मिक कराडच्या प्रश्नावर अजित पवारांचा पत्रकारांनाच प्रतिसवाल
Video: शिवसेनेची काँग्रेस होतेय म्हणताच शिंदेंच्या शिवसेनेकडून भास्कर जाधवांना ऑफर; ते अनुभवी,मोठे नेते
Video: शिवसेनेची काँग्रेस होतेय म्हणताच शिंदेंच्या शिवसेनेकडून भास्कर जाधवांना ऑफर; ते अनुभवी,मोठे नेते
Embed widget