एक्स्प्लोर

अमरनाथ यात्रेकरुंसाठी देवदूत ठरलेले जिगरबाज सलीम शेख

अनंतनागमधील सलीम शेख यांचं कृत्य हे दहशतवादाला एका धर्माशी जोडणाऱ्या लोकांना सणसणीत चपराक आहे.

"तू हिंदू बनेगा, न मुसलमान बनेगा.. इन्सान की औलाद है इन्सान बनेगा..." साहिर लुधियानवींनी या दोन ओळीत धर्म, जात, पंथात माणसाची झालेली विभागणी मोडीत काढली होती. सलीम शेख यांच्याकडे पाहिल्यावर त्याची आठवण आल्याशिवाय राहत नाही. जम्मूमध्ये अमरनाथ यात्रेकरुंच्या बसवर दहशवादी अंधाधुंद गोळीबार करत असताना, प्रसंगावधान दाखवून 49 भाविकांचे प्राण वाचवून त्यांच्यासाठी देवदूत बनून आलेले बस ड्रायव्हर सलीम शेख. अमरनाथमधील निष्पाप भाविकांवर अंधाधुंद गोळीबार करणारे अतिरेकी बोलायला मुसलमान होते, पण इस्लाम आणि मुसलमानचा खरा अर्थ काय असतो, हे अनंतनागपासून हजारो किलोमीटर दूर महाराष्ट्रातून आलेल्या आणखी एका मुसलमानामुळे समजलं. सलीम शेख.. मूळचे जळगाव जिल्ह्यातील पिंपरखेड गावचे. पण सलीम यांचे वडील गफूर पटेल कामानिमित्त कुटुंबासह 15 वर्षांपूर्वी गुजरातच्या वलसाडला स्थायिक झाले. ओम ट्रॅव्हल्सवर गेल्या अनेक वर्षांपासून सलीम ड्रायव्हर म्हणून काम करतात. जवळपास 8 वर्ष सलीम यात्रेकरुंना अमरनाथला घेऊन जातात. वलसाड, डहाणू आणि परिसरातील भाविकांना घेऊन सलीम अमरनाथला रवाना झाले. 10 जुलै 2017 रोजी बाबा अमरनाथचं दर्शन करुन यात्रेकरुंनी भरलेली बस जम्मूच्या दिशेने जात होती. रात्रीचे 8 वाजले होते, सलीम यांनी अनंतनाग पास केलं आणि बटेंगूजवळ अचानक अतिरेक्यांनी ट्रॅव्हल्सवर अंदाधुंद गोळीबार केला. जेव्हा अतिरेक्यांनी बसवर गोळीबार करायला सुरुवात केली त्यावेळी सलीम शेख यांना जाणवलं की जर त्यांनी बस थांबवली तर अतिरेक्यांनी मृत्यूचा तांडव केला असता. याच भीतीमुळे बस चालक सलीम शेख यांनी प्रसंगावधान दाखवत गाडी सुसाट सोडली. धावती बस पाहून अतिरेक्यांनी चाकांवर निशाणा साधून गोळीबार केला. टायर पंक्चर होऊनही सलीम यांनी एक्सलेटरवरील पाय हटवला नाही. डोकं खाली झुकवून बस चालवली आणि पुढे दीड किलोमीटरपर्यंत सैन्याच्या कॅम्पपर्यंत बस पोहोचवली. अमरनाथ यात्रेकरुंसाठी देवदूत ठरलेले जिगरबाज सलीम शेख या हल्ल्यात सात जणांचा मृत्यू झाला तर दोन डझनहून अधिक भाविक जखमी झाले. अशा आणीबाणीच्या परिस्थितीतही सलीम शेख यांनी एका सैनिकासारखी कामगिरी केली. आपल्या प्राणांची पर्वा न करता 49 जणांचा जीव वाचवला. हल्ल्याच्या वेळी त्यांनी तेच काम केलं, जे कोणत्याही माणसाचं कर्तव्य असतं. सलीम शेख यांच्या या असामान्य धैर्यामुळे, हिंमतीमुळे तब्बल 49 भाविकांचा जीव वाचला होता. त्यांच्या रुपाने जणू देवच यात्रेकरुंच्या मदतीला धावून आला होता. स्वतःचा जीव धोक्यात घालून अनेकांचा जीव वाचवला याचा सलीम शेख यांच्या कुटुंबीयांसह देशाला सार्थ अभिमान आहे. अमरनाथ यात्रेकरुंच्या बसवर हल्ला झाल्यानंतर सो कॉल्ड हिंदुत्ववादी चेकाळत आहेत. धर्मांध आणि भडकाऊ ट्वीट आणि फेसबुक पोस्टचा पाऊस सुरु आहे. पण त्याचवेळी सलीम शेख सोशल मीडियावर हीरो बनले आहेत. त्यांच्या धाडसाला सलाम करत आहेत. सच्चा भारतीयाचा आम्हाला अभिमान आहे, असं नेटीझन्स बोलत आहेत. टीकाकारांसाठी अल्लाह, देव, गॉडने सलीमच्या रुपाने कडक संदेश दिला आहे. विशेष म्हणजे सलीम यांच्या भावाने तब्बल 15 वर्ष हिंदू भाविकांसोबत ड्रायव्हर म्हणून अमरनाथ यात्रा केली आहे. तर सलीमही गेली 8 वर्ष हिंदू भाविकांची सेवा करत आहेत. अनंतनागमधील सलीम शेख यांचं कृत्य हे दहशतवादाला एका धर्माशी जोडणाऱ्या लोकांना सणसणीत चपराक आहे. गुजरातचे मुख्यमंत्री विजय रुपाणी यांनी सलीश शेख यांच्या नावाची वीरता पुरस्कारासाठी शिफारस करणार असल्याची घोषणा केली आहे. 49 भाविकांचे प्राण वाचवणारे जिगरबाज सलीम शेख यांच्यावर देशभरातून शुभेच्छांचा वर्षाव होत असताना, एबीपी माझानेही त्यांना यथोचित गौरव केला. 'माझा सन्मान' देऊन एबीपी माझाने सलीम शेख यांच्या धाडसाला सलाम केला. तसंच यावेळी सलीम शेख यांच्यासोबत ओम ट्रॅव्हल्सच्या मालकाचा मुलगा ओमचाही सत्कार केला, तोच बससोबत क्लीनर होता.
अधिक पाहा..

ओपिनियन

Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Devendra Fadnavis : वाढवण ते नाशिक हायस्पीड कनेक्टिविटी तयार करा; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे प्रशासनाला निर्देश
वाढवण ते नाशिक हायस्पीड कनेक्टिविटी तयार करा; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे प्रशासनाला निर्देश
Manoj Jarange Patil and Anjali Damania : मनोज जरांगे पाटील आणि अंजली दमानिया यांच्यावर लातूर जिल्ह्यात तिसरा गुन्हा दाखल
मनोज जरांगे पाटील आणि अंजली दमानिया यांच्यावर लातूर जिल्ह्यात तिसरा गुन्हा दाखल
शिव्या, शाप, आरोप... आदित्य ठाकरे-देवेंद्र फडणवीस भेटीवर एकनाथ शिंदे बोलले; म्हणाले, ही नवी जात
शिव्या, शाप, आरोप... आदित्य ठाकरे-देवेंद्र फडणवीस भेटीवर एकनाथ शिंदे बोलले; म्हणाले, ही नवी जात
हेल्थ इज वेल्थ: हृदयाच्या संबंधित रुग्णांनी कराव्यात 'या' आरोग्य तपासण्या; रक्तदाब निरीक्षणही महत्त्वाचे
हेल्थ इज वेल्थ: हृदयाच्या संबंधित रुग्णांनी कराव्यात 'या' आरोग्य तपासण्या; रक्तदाब निरीक्षणही महत्त्वाचे
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

TOP 25 : टॉप 25 बातम्यांचा वेगवान आढावा एका क्लिकवर : 09 Jan 2025 ABP MajhaABP Majha Headlines : 07 PM : 09 जानेवारी 2025 : Maharashtra News : ABP Majha एबीपी माझा हेडलाईन्सTOP 25 : टॉप 25 बातम्यांचा वेगवान आढावा सुपरफास्ट आढावा एका क्लिकवर : 09 Jan : ABP MajhaMaharashtra Superfast News : महाराष्ट्र सुपरफास्ट बातम्या : 6 PM : 09 Jan 2025 : ABP Majha

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Devendra Fadnavis : वाढवण ते नाशिक हायस्पीड कनेक्टिविटी तयार करा; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे प्रशासनाला निर्देश
वाढवण ते नाशिक हायस्पीड कनेक्टिविटी तयार करा; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे प्रशासनाला निर्देश
Manoj Jarange Patil and Anjali Damania : मनोज जरांगे पाटील आणि अंजली दमानिया यांच्यावर लातूर जिल्ह्यात तिसरा गुन्हा दाखल
मनोज जरांगे पाटील आणि अंजली दमानिया यांच्यावर लातूर जिल्ह्यात तिसरा गुन्हा दाखल
शिव्या, शाप, आरोप... आदित्य ठाकरे-देवेंद्र फडणवीस भेटीवर एकनाथ शिंदे बोलले; म्हणाले, ही नवी जात
शिव्या, शाप, आरोप... आदित्य ठाकरे-देवेंद्र फडणवीस भेटीवर एकनाथ शिंदे बोलले; म्हणाले, ही नवी जात
हेल्थ इज वेल्थ: हृदयाच्या संबंधित रुग्णांनी कराव्यात 'या' आरोग्य तपासण्या; रक्तदाब निरीक्षणही महत्त्वाचे
हेल्थ इज वेल्थ: हृदयाच्या संबंधित रुग्णांनी कराव्यात 'या' आरोग्य तपासण्या; रक्तदाब निरीक्षणही महत्त्वाचे
पुणे विद्येचं माहेरघर, शहरातील प्रत्येक शिक्षणसंस्थेवर संघाचे लोक; शरद पवारांकडून पुन्हा RSS चं कौतुक
पुणे विद्येचं माहेरघर, शहरातील प्रत्येक शिक्षणसंस्थेवर संघाचे लोक; शरद पवारांकडून पुन्हा RSS चं कौतुक
बीड जिल्ह्यात वर्षभरात 40 खुनाचे गुन्हे, सर्वच उघड करण्यास पोलिसांना यश; गतवर्षीच्या तुलनेत सरस कामगिरी
बीड जिल्ह्यात वर्षभरात 40 खुनाचे गुन्हे, सर्वच उघड करण्यास पोलिसांना यश; गतवर्षीच्या तुलनेत सरस कामगिरी
धक्कादायक! घराबाहेर पडलेल्या 80 वर्षाच्या महिलेवर बिबट्याची झडप, 500 मीटर फरफटत नेले, मृतदेह छिन्नविछिन्न
धक्कादायक! घराबाहेर पडलेल्या 80 वर्षाच्या महिलेवर बिबट्याची झडप, 500 मीटर फरफटत नेले, मृतदेह छिन्नविछिन्न
Video: शिक्षकांच्या पगारी रखडल्याचा प्रश्न, अजित पवारांचा भर पत्रकार परिषदेतून थेट मंत्रालयात फोन
Video: शिक्षकांच्या पगारी रखडल्याचा प्रश्न, अजित पवारांचा भर पत्रकार परिषदेतून थेट मंत्रालयात फोन
Embed widget