एक्स्प्लोर

शोकांतिकेची गाथा....

तुझे शेवटचे हे काही क्षण आता बाकी राहिले आहेत, अन् मी तुझ्या पुढ्यात बसलो आहे. आता त्याचा काय उपयोग होणार आहे? कारण मी जे काही तोंडदेखले हसत आहे. ते केवळ काही काळासाठी हे मला ठाऊक आहे. त्यानंतर मात्र प्रत्येक दिवसाचा हरेक क्षण माझ्या जगण्यासाठी श्वासाचे ओझे बनून राहणार आहे. आयुष्यातील प्रत्येक रात्र माझ्यासाठी जणू काळरात्र होऊन माझ्या गात्रांचे निव्वळ शोषण करणार आहे.

देखणी केट विन्स्लेट, राजबिंडा लिओनार्डो डिकॅप्रीओ आणि जेम्स कॅमेरुनच्या दिग्दर्शनासाठी टायटॅनिक किमान पंचवीसेक वेळा तरी पाहिलाय. दर वेळेस शेवट पाहताना भारावून जायला होतं. उत्तर अटलांटिक समुद्राच्या रक्त गोठवणाऱ्या पाण्यात ती अजस्त्र बोट जलसमाधी घेते, आणि हजारो जीव तिच्या सोबत आपली स्वप्ने त्या काळ्या-निळ्या पाण्यात विरघळवत तळाशी जातात. काही जीव कसेबसे तरतात. एकाच माणसाचं वजन झेपू शकेल, अशा एका अलमारीच्या फळकुटावर रोझ पडून आहे. तिचे श्वास धीमे होत चाललेत. ती अर्धवट बेशुद्ध व्हायच्या बेतात आलेली आहे, हे जॅकने ओळखलेलं. त्या लाकडावर हात टेकवून त्या थंडगार पाण्यात तो उभा तरंगतोय. तिने भान हरपू नये, म्हणून बोलण्यात गुंतवून ठेवतोय. खरं तर त्याला तिथून सरकणं शक्य होतं, पण तो तिला सोडून जात नाही. तिनं जगावं म्हणून तो पाण्यात उभा आहे, तिनं 'गिव्ह अप' करु नये याचं प्रॉमिस त्याने घेतलंय. तिचा हात त्याच्या हातात आहे. त्या हाताची ऊब आणि त्यातून जाणवणारे तिच्या काळजाचे ठोके हिच काय ती त्याची ऊर्जा, त्यावर तो तरुन आहे. बघता बघता प्रहर उलटून जातो. आपल्या सहप्रवाशांची दया आल्याने एक लाईफ सेव्हिंग बोट तिथं परतते. त्यातून एनीबडी देअरचा पुकारा होऊ लागतो. त्या आवाजाने आणि बोटीच्या चाहुलीने गाढ झोपी गेलेली श्रमलेली रोझ जागी होते. जीवाच्या आकांताने जॅकला जागं करण्याचा प्रयत्न करते. काही केल्या त्याच्या चेतना जाग्या होत नाहीत. ती त्याच्या चेहऱ्यात डोकावते आणि तिच्या काळजात धस्स होते. तिचा जॅक तिला वाचवण्याच्या नादात कधीच अचेतन झालेला असतो. तिला रडूही फुटत नाही. ती पुरती भांबावून जाते. तरीही जॅकच्या हातातली हथकडी वाजवत खोल गेलेल्या आर्त आवाजाने त्याला सांगू लागते की, 'देअर इज बोट जॅक!". बोटीवरुन पळून जाण्याच्या ध्येयापासून ते जीव वाचवण्याच्या कसरतीपर्यंत त्यांनी या लाईफ सेव्हींग बोटीची प्रतीक्षा केलेली असते. आता ती बोट काही अंतरावर असते. सगळं तारांगण जणू गतप्रभ झाल्यागत असतं. दाट अंधार दाटून आलेला आणि डोक्याच्या ओल्या केसातल्या पाण्याचं बर्फ झालेलं इतकी बधीर थंडी अन् पहाटेची कातरवेळ! पडद्यावरील अक्राळ विक्राळ कॅनव्हासवर जीव कासावीस झालेली रोझ आणि तिचा हात हाती धरलेल्या अवस्थेत देहाच्या संवेदना हरवलेला अचेतन जॅक दिसतात. तिचे उस्मरणे तिच्या उसाशांतून जाणवतं. मधूनच लाईफ बोटीच्या वल्ह्यातून येणारा पाण्याचा आवाज, टॉर्चच्या प्रकाशाची तिरीप आणि रोझचं जॅकसाठी धडपडणं, पार्श्वसंगीतात 'माय हर्ट विल गो ऑन'ची धून हलकेच तरळत राहते. अखेर ती सत्य स्वीकारते. सेलीन डीऑनच्या आवाजातले कातर आलाप काळीज चिरत जातात. ती कम बॅकची आर्जवं करत राहते. लाईफ बोटीतून हॅलोचा पुकारा होत राहतो. 'कॅन एनीवन हिअर मी?' चा आवाज कानी पडत राहतो. इथं कुणीच नसल्याचा निष्कर्ष काढून पाण्यात तरंगणाऱ्या अगणित मृतदेहांना बाजूला सारत आस्तेच बोट पुढे जाऊ लागते. तिला याची जाणीव होते. आता ‘तो’ क्षण जवळ आल्याची तगमग तिच्या चेहऱ्यावर स्पष्ट दिसते. निमिषार्धासाठी त्याचा हात घट्ट धरते, विमनस्कतेला हरवत निश्चयाने त्याच्याकडे पाहत उद्गारते की 'आय विल नेव्हर लेट गो आय प्रॉमिस !....' पुढच्या क्षणाला त्याचा हात हलकेच सोडून देते, तिचा हात आपल्या हातात धरण्याच्या भावमुद्रेतला त्याचा ताठलेला देह हळूहळू पाण्यात दिसेनासा होतो. तिच्या काळजात कालवाकालव होते, आणि पुढच्याच क्षणाला ती घसा ताणून हाका मारण्याचा प्रयत्न करू लागते. तिची ताकद कमी पडते. आपला आधार सोडून जीवाच्या आकांताने त्या थंडगार पाण्यातून काही अंतर कापून ती शेजारीच तरंगत असणाऱ्या एका गार्डच्या शवाजवळ जाते. त्याच्या तोंडातली शिटी काढून प्राण कंठाशी आणून फुंकू लागते. त्या आवाजाने लाईफ सेव्हिंग बोटीचे तिच्याकडे लक्ष जाते. तिच्या चेहऱ्यावर टॉर्चचा प्रकाशझोत पडतो. एका वेगळ्याच आवेगाने शिटी वाजवणारी डोळे तारवठून गेलेली रोझ पडद्यावर दिसते आणि फ्लॅशबॅक संपतो. चित्रपट संपल्यावरही जॅक आणि रोझ डोळ्यापुढे तरळत राहतात. तर सेलीन डीऑनचं ‘माय हर्ट विल गो ऑन’ काही केल्या डोक्यातून जात नाही. 'एव्हरी नाईट इन माय ड्रीम्स आय सी यू, आय फील यू, दॅट इज हाऊ आय नो यू' पासून सुरु झालेला हा प्रवास 'निअर फार व्हेअरेवर यू आर, आय बिलीव्ह दॅट द हर्ट डज गो ऑन वन्स मोअर'पर्यंत येऊन थबकतो. जॅक तिला का सोडत नाही आणि ती 'गिव्ह अप' का करत नाही? याचं उत्तर या गाण्यात सापडतं, जे जगण्याच्या आणि प्रेमाच्या नव्या व्याख्या शिकवतं. ही टायटॅनिकच्या शोकांतिकेची अपूर्व ताकद आहे. असंच काहीसं 'शोले'चं आहे. शोले जेव्हा-जेव्हा पाहतो, तेव्हा-तेव्हा काही तरी नवीन गवसतं. 'शोले'च्या क्लायमॅक्सला गब्बरच्या गोळीबारात एकट्याने खिंड लढवत असलेला जय घायाळ होऊन पडतो तो सीन खूप काही शिकवून जातो. जखमांनी विद्ध झालेला जय रक्तबंबाळ झालेल्या अवस्थेत एका मोठ्या शिळेला टेकून बसलेला आहे. त्याचे श्वास वेगाने होताहेत, त्याला बोलण्यात प्राणांतिक कष्ट होताहेत, तो अगदी कासावीस होऊन गेलेला आहे. जणू त्याचे प्राण अक्षरशः कंठाशी आलेले आहेत. त्याचा मित्र वीरु त्याच्या शेजारी बसून त्याला धीर देतोय, "तू मुझे छोड के नही जा सकता ..." असं सांगताना त्याचं उसनं अवसान स्पष्ट जाणवतं. आता काहीच क्षण उरलेले आहेत, हे त्याने ताडलेले आहे. पण आपला जिवलग दोस्त आपल्याला सोडून जाणार ही कल्पना त्याला सहन होत नाही. दरम्यान, जयच्या गंभीर जखमी होण्याची खबर ठाकूर बलदेवसिंगच्या हवेलीपर्यंत गेलेली असते. तो सारा लवाजमा घेऊन गब्बरच्या अड्ड्याकडे जाणाऱ्या लाकडी पुलाच्या रस्त्याजवळ येतो. वीरुने आता आपल्या मित्राचा लहूलुहान देह आपल्या कुशीत घेतलेला आहे, त्याच्या समोरच ठाकूर दाखल होतो. ठाकूरसोबत आलेली पांढऱ्या शुभ्र वेशातली छोटी बहु राधा न राहवून सर्वांच्या पुढे धावत येते. नकळत अगदी आपल्या सासऱ्याच्याही पुढे! जखमी जयच्या पुढ्यात येऊन ती थबकते आणि त्याच्या क्षतिग्रस्त देहाला पाहून तिचा शोक अनावर होतो. ती एकाग्र चित्ताने त्याला शक्य तितकं स्वतः च्या डोळ्यात साठवत राहते. या मोमेंटला जयने वाजवलेल्या माऊथ ऑर्गनचा अप्रतिम म्युझिकपीस बॅकग्राउंडला वाजतो काळजाचे पाणी पाणी होते. तिचा धपापणारा ऊर स्पष्ट जाणवतो. तिला पाहून श्वास जड झालेला जय मोठ्या कष्टाने म्हणतो, "देख वीरु... देख... ये कहानी भी अधुरी रह गयी... क्या सोचा था... और क्या हो गया ..." ... त्याच्याही डोळ्यातून अश्रूधारा वाहू लागतात. त्याचे अश्रू रक्तात मिसळतात. तो शेवटचे आचके देऊ लागतो आणि वीरुची त्याला थांबवण्याची तडफड सुरु होते. जयच्या मनाची प्रचंड घालमेल होते. त्याची अखेरची अगतिक तगमग ती थिजल्यागत पाहत उभी राहते. तिच्यापासून काही फर्लांग अंतरावर तिचा सासरा ठाकूर बलदेवसिंग नियतीच्या समोर हतबद्ध होऊन उभा असतो. जयची तडफड वाढत जाते आणि काही क्षणात त्याचा देह शांत होतो. वीरु मोठ्याने हंबरडा फोडून शोकाचे बांध मोकळे करतो. पण ती ? तिचे काय? तिच्या म्लान चेहऱ्यावरती शोकाची झळाळी चढते. तिच्या डोळ्यातून हळुवारपणे अश्रू वाहू लागतात. एक क्षण सगळेच जण गोठून जातात. पडदादेखील निशब्द होतो. फक्त वीरुच्या हमसून रडण्याचा बारीक आवाज येत राहतो. निमिषार्धात ठाकूर पुढे सरसावतो. आपल्या लाडक्या छोट्या बहुकडे जातो. सासरा जवळ येताच तिचा दुः खाचा बांध फुटतो. पण तोही विलक्षण संयत पद्धतीने! ती त्याच्या छातीवर डोकं टेकवून रडू लागते. तिला कवेत घेऊन तिचं दुः ख हलकं करणंदेखील ठाकूरला शक्य नाही. कारण त्याचे हात गब्बरने पूर्वीच छाटलेले आहेत. ती त्याच्या डोळ्यात पाहत मूसमूसून रडू लागते आणि ठाकूरला तर तेही शक्य नसते. तो अश्रुंचे कढ पित तिला मोकळं होऊ देतो. बॅकग्राउंडला अगदी हळुवारपणे 'ये दोस्ती हम नही तोडेंगे... 'चे सूर व्हायोलीनवर वाजू लागतात. तिचं रडणं अनुभवत ठाकूर त्याच्या मस्तकातला सूडाचा लाव्हा आणखी दाहक करत राहतो... त्या क्षणाला राधाच्या मनातली भावना, तिचं नकळत जयवर बसलेलं प्रेम, तिचं त्याच्यासाठी शोकविव्हळ होणं या सर्व जाणीवांना ठाकूर समजून घेतो. तिच्या मनात साठलेलं मळभ रितं होऊ देतो. मात्र, तिचा गहिवर काही केल्या शांत होत नाही... त्यापुढच्या सीनमध्ये गब्बरला पोलिसांच्या हवाली केल्यानंतर जयच्या चितेला यथासांग अग्नी दिला जातो. त्या चितेच्या ज्वालात ठाकूरला आपल्या राधा बहुची स्वप्ने पुन्हा एकदा खाक झाल्याचं जाणवतं. अन् तो मूक बनून राहतो. दूर हवेलीच्या खिडकीत उभी राहून चितेची धग आपल्या डोळ्यात साठवणारी छोटी बहु विमनस्क चेहऱ्याने चितेकडे पाहत असते. आस्ते कदम ती मागे सरकते आणि खालच्या मानेने खिडकी लावून घेते. पडद्यावरती ठाकूरच्या दारंखिडक्या बंद असलेल्या शोकमग्न हवेलीचं दृश्य दिसतं. हा सीन जीवाला चटका लावून जातो. संपूर्ण चित्रपटात सज्जातली दारं बंद करणारी छोटी बहु दिसते, आणि अखेरीस मात्र हवेलीची खिडकी बंद करुन ती जणू स्वतःला जगापासून अलिप्त करत कोंडून घेते. ठाकूरची सून होण्याआधी राधा ही बसंतीपेक्षाही जास्त बडबडी अन् अवखळ असते. पण गब्बरने तिच्या कुटुंबाची वाताहत केल्यापासून ती अक्षरशः पुतळा बनून राहत असते. जयच्या रुपाने तिच्या मनात प्रेमाचे अंकुर पुन्हा उगवण्याच्या बेतात असताना नियती पुन्हा एकदा तिच्यावर तोच प्रहार करते. या खेपेस तर तिला जगापुढे व्यक्तही होता येत नाही. सुखदुःख एकाच नाण्याच्या दोन बाजू आहेत, त्यात व्यक्त होण्याची संधी मिळताच अंतःकरणातले बोल उघड करण्यातही एक आगळे समाधान असते. राधासारख्या कोवळ्या तरुणीस तर एकच दुःख पुन्हा पुन्हा भोगावे लागते आणि त्यावर मनातले कढ पिऊन टाकावे लागतात. शोलेच्या क्लायमॅक्सला राधा जेव्हा खिडकी लावून घेते, तेव्हा आपण नकळत तिच्या दुःखात सामील झालेलो असतो. तिच्या अव्यक्त भावनांना आपण अश्रूतून वाट करून देतो. आपण आनंदाचे, हसण्याचे क्षण ज्यांच्या सोबत व्यक्त केलेले असतात त्यांना आपण सहजगत्या विसरुन जातो. पण ज्यांच्यासोबत आपण आपलं दुःख शेअर केलेलं असतं, जिथं आपलं काळीज हलकं केलेलं असतं ती माणसं आपण कधीच विसरु शकत नाही. दुः खात असणारी ही असामान्य ताकद आपल्या जगण्याचा संघर्ष बुलंद करत जाते. 'शोले' ही एक रसरसलेली सूडकथा आहे. पण तिला छोटी बहुच्या कारुण्याची जी शोकमग्न झालर लागलेली आहे, तिच्यामुळे 'शोले'च्या ज्वाला अधिक धगधगत्या होतात... छोटीबहुचं हवेलीमधलं स्मशानशांततेलं वावरणं, तिचं अचेतन जगणं, तिच्या शुष्क निर्जीव हालचाली आणि डोळे गोठवणारी नजर यामुळे अंतःकरणात कालवते. दिग्दर्शकाने हे दुःख इतकं उत्तुंग चितारलं नसतं तर कदाचित सूड फिका झाला असता... मराठी चित्रपट - साहित्यातही या भावनेची प्रचीती येते. पण चित्रपट टाळून इथे एका अलौकिक कवितेचा उल्लेख करावासा वाटतो. गेले द्यायचे राहूनी, तुझे नक्षत्रांचे देणे... माझ्यापास आता कळ्या, आणि थोडी ओली पाने... आलो होतो हासत मी, काही श्वासांसाठी फक्त दिवसांचे ओझे आता, रात्र-रात्र शोषी रक्त... आता मनाचा दगड, घेतो कण्हत उशाला होते कळ्यांचे निर्माल्य आणि पानांचा पाचोळा... पंडित हृदयनाथ मंगेशकर यांनी संगीत दिलेल्या आणि आशाताईंनी गायलेल्या या अर्थपूर्ण भावगीताला रसिकांनी हृदयात जे स्थान दिले ते आजही कायम आहे. गाणे म्हणून प्रसिद्ध मिळण्याआधी या कवितेच्या आशयाकडे पाहिले तर एक प्रकारची खिन्नता मनात दाटून येते. जीवनात प्रत्येकाला खूप काही करावेसे वाटत असते, खूप काही द्यावेसे वाटत असते पण कालौघाच्या रहाटगाडग्यात आपण असे काही पिसलो जातो की त्या गोष्टी राहून जातात. ते क्षण पाण्याच्या बुडबुड्याप्रमाणे निसटून जातात आणि आपण रितेच राहतो. आपल्या भावना तशाच गोठून राहतात आणि ते देणे द्यायचे राहून गेले याची एक हुरहूर मनाला चटका लावून जाते. चि.त्र्यं. खानोलकर उर्फ आरती प्रभू यांच्या या कवितेचे दोन वेगवेगळे अर्थ लावले गेले. एक अर्थातच प्रेमाच्या प्रकटीकरणाचा होता. आपण आयुष्याच्या या सारीपाटावर सोंगट्या हलावे तसे आपसूक हलत राहतो आणि आपल्या प्रिय व्यक्तीला आपले प्रेम, आपली माया, आपली संवेदना आणि अंतरीचे भाव व्यक्त करायचे राहून जातो. आपण नुसतेच जगत जातो. त्यातून मनाला अपराधी भावनांची सल येते. शेवटी आपण ते देणे द्यायला जातो पण ती वेळ निघून गेलेली असते, असं लक्षात येतं. तर खानोलकरांच्या काही घनिष्ठ मित्रांनी या कवितेचा दुसरा अर्थ लावताना या कवितेत खानोलकर इतके हळवे का झाले याचा वेगळा अर्थ दिला. खानोलकरांचा मुलगा जेव्हा अंथरुणाला खिळला, तेव्हा त्यांना झालेली अपराधाची जाणीव ही या कवितेची पार्श्वभूमी आहे, असं त्यातून सूचित होतं. खरे तर माझ्या मुलाला मी अख्ख्या विश्वाचे तारांगण तुझ्या ओंजळीत द्यावे, आनंदाची नक्षत्रे त्यात प्रफुल्लीत व्हावीत, असं काही तरी मी द्यायला पाहिजे होतं. पण ते मी देऊ शकलो नाही. खरे तर मी तुला वेळही दिला नाही, आता माझ्यापाशी उरले आहेत केवळ आठवणींच्या कळ्या अन अश्रुंनी भिजलेली त्या कळ्यांची पाने! तुझे शेवटचे हे काही क्षण आता बाकी राहिले आहेत, अन् मी तुझ्या पुढ्यात बसलो आहे. आता त्याचा काय उपयोग होणार आहे? कारण मी जे काही तोंडदेखले हसत आहे. ते केवळ काही काळासाठी हे मला ठाऊक आहे. त्यानंतर मात्र प्रत्येक दिवसाचा हरेक क्षण माझ्या जगण्यासाठी श्वासाचे ओझे बनून राहणार आहे. आयुष्यातील प्रत्येक रात्र माझ्यासाठी जणू काळरात्र होऊन माझ्या गात्रांचे निव्वळ शोषण करणार आहे. कारण तू गेल्यानंतर जगण्यासाठी कसली उर्मी उरणारच नाही. शुष्क श्वासांचे कोरडे जगणे शेष असणार आहे. दिवसभर भले आपण आपले सुख-दुः ख कामाच्या अन् काळाच्या ओघात विसरु शकू. पण जेव्हा रात्र होते, पाठ जमिनीला टेकते, तेव्हा मात्र आठवणींचे जे मोहोळ उठते. ते मनाला ध्वस्त करुन जाते. अशावेळेस आठवणींच्या वेदनांनी दग्ध झालेल्या जीवाला आपण आधार म्हणून ती दुः खेच उशाला घेऊ शकतो, म्हणूनच खानोलकर लिहितात, 'माझ्या मनाचा दगड घेतो कण्हत उशाला...' पण यातूनही फार काही निष्पन्न होत नाही, जीवनाचे अस्तित्व क्षणभंगुर होऊन जाईल, अन् श्वासांच्या कळ्यांचे निर्माल्य होणार हे निश्चित आहे. मर्मबंधाच्या कुपीत जतन केलेल्या आसावल्या आठवणींच्या पानांचाही पाचोळा होऊन जाईल, असे ते विमनस्कपणे लिहितात. एक उदासवाणी झाक या कवितेच्या प्रारंभापासून ते अंतापर्यंत जाणवत राहते. कविता वाचून झाल्यावर आपण दिग्मूढ होऊन जातो. कवितांमधून क्वचित वापरले जाणारे शब्द ते वेगळ्या अर्थाने प्रतिमा म्हणून वापरतात. अन् कवितेला एका वेगळ्याच उंचीवर नेऊन ठेवतात. ही त्यांची खासियत या कवितेत मनस्वी पद्धतीने अनुभवायला मिळते. ही शोकांतिका म्हणावी की शोकभावनेचं अत्युत्तम प्रकटीकरण म्हणावं याचा निर्णय करता येत नाही. लोकांनी काळजात गोंदवून घेतलेल्या या कलाकृती सिद्ध करतात की, आयुष्यातून कारुण्य आणि दुःख वजा केलं, तर सुखाला किंमत शून्य उरते. शोकांतिकेच्या गाथेचा हा अर्थ जगणं आणखी समृद्ध करतो. संबंधित ब्लॉग पाच रुपयाची नोट... 'जाग्रणा'तली गोडी... आमच्या काळी असं नव्हतं  (?)...... अस्सल लोकनायक - बापू बिरु वाटेगावकर
View More

ओपिनियन

Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

Kolhapur : कोल्हापुरात आराम बसवर दरोडा, पोलिसांचा 12 तासांत तपास, 1 कोटी 22 लाखांच्या मुद्देमालासह सात आरोपी जेरबंद
कोल्हापुरात आराम बसवर दरोडा, पोलिसांचा 12 तासांत तपास, 1 कोटी 22 लाखांच्या मुद्देमालासह सात आरोपी जेरबंद
निवडणुकीची तयारी... मुंबई महापालिकेत भावी नगरसेवकांची तोबा गर्दी; पहिल्याच दिवशी 4165 अर्जांची विक्री
निवडणुकीची तयारी... मुंबई महापालिकेत भावी नगरसेवकांची तोबा गर्दी; पहिल्याच दिवशी 4165 अर्जांची विक्री
सीबीआयकडून GST कार्यालयातील अधिकाऱ्यास रंगेहात अटक; 5 लाखांची लाच घेताना ठोकल्या बेड्या
सीबीआयकडून GST कार्यालयातील अधिकाऱ्यास रंगेहात अटक; 5 लाखांची लाच घेताना ठोकल्या बेड्या
KDMC : शिंदेंच्या बालेकिल्ल्याला मनसे-ठाकरेसेना सुरूंग लावणार का? भाजपचं गणित काय? कल्याण-डोंबिवलीमध्ये कोण बाजी मारणार?
शिंदेंच्या बालेकिल्ल्याला मनसे-ठाकरेसेना सुरूंग लावणार का? भाजपचं गणित काय? कल्याण-डोंबिवलीमध्ये कोण बाजी मारणार?
ABP Premium

व्हिडीओ

Sudhir Mungantiwar : जादू झाली, नाराजी गेली; सुधीरभाऊंना पक्ष ताकद कशी देणार? Special Report
Lote Parshuram MIDC : इटलीचा कारखाना, कोकणात कारमाना; लक्ष्मी ऑरगॅनिक लि. कंपनी वादात Special Report
Thackeray Brother Alliance : ठाकरेंच्या युतीचा नारा, वेळ दुपारी बारा Special Report
Mumbai Air Pollution : प्रदूषणाचा विषय खोल, कोर्टाचे खडे बोल; हवा प्रदूषण कसं रोखणार? Special Report
Pune NCP Alliance : पुण्यात मविआशी आघाडी, दादा प्रचंड आशावादी; समीकरणांची गुंतागुंत Special Report

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Kolhapur : कोल्हापुरात आराम बसवर दरोडा, पोलिसांचा 12 तासांत तपास, 1 कोटी 22 लाखांच्या मुद्देमालासह सात आरोपी जेरबंद
कोल्हापुरात आराम बसवर दरोडा, पोलिसांचा 12 तासांत तपास, 1 कोटी 22 लाखांच्या मुद्देमालासह सात आरोपी जेरबंद
निवडणुकीची तयारी... मुंबई महापालिकेत भावी नगरसेवकांची तोबा गर्दी; पहिल्याच दिवशी 4165 अर्जांची विक्री
निवडणुकीची तयारी... मुंबई महापालिकेत भावी नगरसेवकांची तोबा गर्दी; पहिल्याच दिवशी 4165 अर्जांची विक्री
सीबीआयकडून GST कार्यालयातील अधिकाऱ्यास रंगेहात अटक; 5 लाखांची लाच घेताना ठोकल्या बेड्या
सीबीआयकडून GST कार्यालयातील अधिकाऱ्यास रंगेहात अटक; 5 लाखांची लाच घेताना ठोकल्या बेड्या
KDMC : शिंदेंच्या बालेकिल्ल्याला मनसे-ठाकरेसेना सुरूंग लावणार का? भाजपचं गणित काय? कल्याण-डोंबिवलीमध्ये कोण बाजी मारणार?
शिंदेंच्या बालेकिल्ल्याला मनसे-ठाकरेसेना सुरूंग लावणार का? भाजपचं गणित काय? कल्याण-डोंबिवलीमध्ये कोण बाजी मारणार?
पंतप्रधान हे बारामती किंवा कराडमधले होणार नाहीत; एपस्टिन फाईलबाबत पृथ्वीराज चव्हाणांचे पुन्हा भाष्य
पंतप्रधान हे बारामती किंवा कराडमधले होणार नाहीत; एपस्टिन फाईलबाबत पृथ्वीराज चव्हाणांचे पुन्हा भाष्य
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 23 डिसेंबर 2025 | मंगळवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 23 डिसेंबर 2025 | मंगळवार
राहुल कलाटेंची कमाल, स्थानिक नेत्यांच्या नाकावर टिच्चून भाजपमध्ये प्रवेश करणार, पिंपरीत शरद पवार गटाला धक्का
राहुल कलाटेंची कमाल, स्थानिक नेत्यांच्या नाकावर टिच्चून भाजपमध्ये प्रवेश करणार, पिंपरीत शरद पवार गटाला धक्का
बनावट आयकार्ड, बोगस IAS अधिकाऱ्याच्या तुळजापूर मंदिरात पर्दाफाश; नडला व्हिआयपी दर्शनासाठी अट्टाहास
बनावट आयकार्ड, बोगस IAS अधिकाऱ्याच्या तुळजापूर मंदिरात पर्दाफाश; नडला व्हिआयपी दर्शनासाठी अट्टाहास
Embed widget