एक्स्प्लोर

फोटोग्राफीसाठी कोणता मोबाईल फोन घ्यायचा?

मोबाईल सिलेक्ट करताना कॅमेरा किती मेगापिक्सेलचा आहे, एवढच पाहिलं जातं. खरंतर फक्त मेगापिक्सेलवर फोटोची क्वालिटी अवलंबून नसते. मेगापिक्सेल सोडून कलर रिप्रॉडक्शन, ग्रेन्स ट्रान्सिशन, इमेज स्टॅबीलायझेशन, कलर डेप्थ, डायनॅमिक रेंज असे कित्येक पैलू असतात, ज्यावर कॅमेऱ्याची क्वालिटी ठरते.

हल्ली खास फोटोग्राफीसाठी वेगवेगळ्या मोबाईलमध्ये खास फीचर्स असतात. जास्त मेगापिक्सेलचे कॅमेरे असणाऱ्या मोबाईलचा तर सुळसुळाट आहे. मात्र कॅमेऱ्याच्या मेगापिक्सेलवरच क्वालिटी अवलंबून असते का? की मोबाईलचे इतरही पैलू पाहण्याची गरज आहे? यासंदर्भात प्रसिद्ध फोटोग्राफर इंद्रजीत खांबे यांचं विश्लेषण...
आजकाल बरेचदा हा प्रश्न मला विचारला जातो. मी पहिला स्मार्टफोन घेतला 2015 मध्ये. त्यावेळी मी फार विचार करत बसलो नाही. दिल्लीच्या एका फोटोग्राफर मित्राने ‘रेडमी 2 घे’ म्हणून सांगितलं आणि मी तो घेतला. नंतर मोबाईल फोटोग्राफीमध्ये मजा यायला लागली. सहा महिन्यांपूर्वी परत मोबाईल घ्यायची वेळ आली. बजेट दहा हजाराच्या खाली होतं. त्यामुळे ‘रेडमी 4A’ला मी पसंती दिली. मला तो मिळाला सहा हजारात. दोन महिने त्यावर चिक्कार फोटो काढले. नंतर जरा वरचं मॉडेल घ्यावं असा विचार आला आणि 15 हजारापर्यंतचे मोबाईल पहायला सुरुवात केली. एखादं मॉडेल आवडलं की कुणा मित्राकडे आहे का, ते शोधायचे आणि त्याची टेस्ट घ्यायचो. तेवढ्यात मोबाईल फोटोग्राफीची एक स्पर्धा दिसली. त्यात एंट्री टाकली व आयफोन-8 हे जवळपास साठ हजार किंमतीचा मोबाईल मला मिळाला व त्यावर सध्या फोटो काढणं चालू आहे. फोटो पाहून मोबाईल खरेदी केल्यास फसगतीची शक्यता मोबाईल घ्यायचा म्हटला की आजकाल इंटरनेटवर रिव्हूज वाचले जातात आणि मोबाईल सिलेक्ट केला जातो आणि इथेच खरी फसगत होते. पहिली गोष्ट म्हणजे मोबाईल कंपन्या जे फोटो त्याच्या मार्केटिंगसाठी वापरतात, ते खरच त्या मॉडेलच्या मोबाईलने काढलेले असतील याची खात्री देता येत नाही. अगदी अडीच तीन लाखाच्या कॅमेरानं काढलेले फोटोदेखील मोबाईलचे फोटो म्हणून कंपन्यांनी त्यांच्या वेबसाईटवर टाकलेले आहेत. आणि हे सर्वच कंपन्या करतात. स्पर्धाच जिवघेणी आहे. मेगापिक्सेलसह कॅमेऱ्याच्या इतर पैलूही महत्त्वाचे दुसरं म्हणजे मोबाईल सिलेक्ट करताना कॅमेरा किती मेगापिक्सेलचा आहे, एवढच पाहिलं जातं. खरंतर फक्त मेगापिक्सेलवर फोटोची क्वालिटी अवलंबून नसते. माझ्या 6 हजाराच्या रेडमीला 16 मेगापिक्सेलचा कॅमेरा आहे आणि 60 हजाराच्या आयफोनला 12 मेगापिक्सेलचा. मेगापिक्सेल सोडून कलर रिप्रॉडक्शन, ग्रेन्स ट्रान्सिशन, इमेज स्टॅबीलायझेशन, कलर डेप्थ, डायनॅमिक रेंज असे कित्येक पैलू असतात, ज्यावर कॅमेऱ्याची क्वालिटी ठरते. तर गेले काही महिने बरेच मोबाईल रिसर्च केल्यावर वेगवेगळ्या बेजचसाठी मी काही मॉडेल्स सजेस्ट करतो. 1) बजेट 5 ते 10 हजार - रेडमी 4A 2) बजेट 10 ते 15 हजार - MIA1/ Honor 7x या दोन्ही फोनना दोन कॅमेरे आहेत. एक लेन्स 50MM ज्याचा उपयोग पोट्रेटसाठी होतो व बॅकग्राईंज ब्लर इफेक्टही मिळतो. दुसरी लेन्स वाईड अॅंगल लेन्स असते. 3) बजेट 15 ते 20 हजार--- IPhone SE (32GB) फोटोग्राफीसाठीच वापरायचा असेल तर 20 हजाराच्या खाली हा सर्वात बेस्ट फोन आहे. आयफोनच्या सॉफ्टवेअरमुळे फोटोंना चांगला दर्जा आहे. फक्त याचा स्क्रीन 4 इंच असल्यामुळे काहींना तो वापरायला अवघड वाटू शकतो. पण फोटोचा दर्जा उत्तम आहे यात शंका नाही. मी आयफोन वापरु लागल्यावर बरेच मित्रमंडळी म्हणाली की, तुझे फोटो पाहून आम्ही रेडमी घेतला आणि तू आता आयफोनवाला झालास. खरंतर मी टूल्सचा फार विचार करत नाही. जे काही यंत्र हातात आहे, त्यावर सतत काम करत राहाणं महत्वाचं. ...शेवटी क्रिएटिव्ह असणं गरजेचं! आयफोनचा दर्जा नक्कीच चांगला आहे. सर्व बाबतीत तो सरस आहे. पण प्रत्येकाला पन्नास-साठ हजाराचा आयफोन वापरणं परवडू शकेल असं नाही. अगदी मलाही इतका महागडा फोन वापरायची इच्छा कधी झाली नाही. कोणत्या गोष्टीला किती पैसे घालावेत याचे माझे काही ठोकताळे आहेत. फोनसाठी दहा हजाराच्या वर पैसे खर्च करणं मला पटत नाही. मी ज्या स्पर्धेत आयफोन जिंकला त्या स्पर्धेत जवळपास दीड हजार एंट्रीज होत्या. आणि त्यात कित्येक फोटो हे आयफोनसारख्या महागड्या मोबाईलने काढलेले होते. तरीही माझ्या सहा हजाराच्या रेडमी 4 च्या फोटोला पहिलं बक्षीस मिळालं. त्यामुळे शेवटी क्रिएटिव्ह असणं गरजेचं. टूल्स काय आहेत याला एका मर्यादेपलिकडे महत्व नाही.
अधिक पाहा..

ओपिनियन

Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

राजस्थानचा हल्लाबोल! यंदाच्या हंगामातील प्लेऑफमध्ये पोहचणारा पहिला संघ
राजस्थानचा हल्लाबोल! यंदाच्या हंगामातील प्लेऑफमध्ये पोहचणारा पहिला संघ
संजू सॅमसन-ध्रुव जुरेलची रॉयल खेळी, राजस्थाननं लखनौला सात विकेटनं लोळवलं!
संजू सॅमसन-ध्रुव जुरेलची रॉयल खेळी, राजस्थाननं लखनौला सात विकेटनं लोळवलं!
Baipan Bhaari Deva : महाराष्ट्राचा सुपरहिट चित्रपट 'बाईपण भारी देवा'चा होणार वर्ल्ड टेलिव्हिजन प्रीमिअर; जाणून घ्या कुठे पाहायला मिळणार...
महाराष्ट्राचा सुपरहिट चित्रपट 'बाईपण भारी देवा'चा होणार वर्ल्ड टेलिव्हिजन प्रीमिअर; जाणून घ्या कुठे पाहायला मिळणार...
हार्दिक पांड्याची कार्बन कॉपी, लग्नात वाजवतोय ढोल, पाहा व्हायरल व्हिडीओ
हार्दिक पांड्याची कार्बन कॉपी, लग्नात वाजवतोय ढोल, पाहा व्हायरल व्हिडीओ
Advertisement
for smartphones
and tablets

व्हिडीओ

Hello Mic Testing ABP Majha : हॅलो माईक टेस्टिंगमध्ये नेत्यांचे आरोप-प्रत्यारोप आणि नेत्यांची भाषणंSankarshan Karhale Politics Poem : संकर्षण कऱ्हाडेंची महाराष्ट्राच्या राजकारणावरील कविता व्हायरलDevendra Fadnavis:निर्यातबंदीतही सरकारकडून कांदा खरेदी, विरोधकांना शेतकऱ्यांशी देणंघेणं नाही:फडणवीसRavikant Tupkar On BJP : कांदा निर्यातीची निर्णय हा व्यापाऱ्यांसाठी, तुपकरांची केंद्र सरकारवर टीका

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
राजस्थानचा हल्लाबोल! यंदाच्या हंगामातील प्लेऑफमध्ये पोहचणारा पहिला संघ
राजस्थानचा हल्लाबोल! यंदाच्या हंगामातील प्लेऑफमध्ये पोहचणारा पहिला संघ
संजू सॅमसन-ध्रुव जुरेलची रॉयल खेळी, राजस्थाननं लखनौला सात विकेटनं लोळवलं!
संजू सॅमसन-ध्रुव जुरेलची रॉयल खेळी, राजस्थाननं लखनौला सात विकेटनं लोळवलं!
Baipan Bhaari Deva : महाराष्ट्राचा सुपरहिट चित्रपट 'बाईपण भारी देवा'चा होणार वर्ल्ड टेलिव्हिजन प्रीमिअर; जाणून घ्या कुठे पाहायला मिळणार...
महाराष्ट्राचा सुपरहिट चित्रपट 'बाईपण भारी देवा'चा होणार वर्ल्ड टेलिव्हिजन प्रीमिअर; जाणून घ्या कुठे पाहायला मिळणार...
हार्दिक पांड्याची कार्बन कॉपी, लग्नात वाजवतोय ढोल, पाहा व्हायरल व्हिडीओ
हार्दिक पांड्याची कार्बन कॉपी, लग्नात वाजवतोय ढोल, पाहा व्हायरल व्हिडीओ
मोठी बातमी : उद्धव ठाकरेंना मोठा झटका! एम के मढवी यांना अटक
मोठी बातमी : उद्धव ठाकरेंना मोठा झटका! एम के मढवी यांना अटक
भाजपने तिकीट कापल्यानंतर पूनम महाजन यांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाल्या...
भाजपने तिकीट कापल्यानंतर पूनम महाजन यांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाल्या...
वंचितने उमेदवार बदलला! संजीव कलकोरी ऐवजी परमेश्वर रणशूर यांना उमेदवारी, दौलत कादर खान यांनाही लोकसभेचं तिकीट
वंचितने उमेदवार बदलला! संजीव कलकोरी ऐवजी परमेश्वर रणशूर यांना उमेदवारी, दौलत कादर खान यांनाही लोकसभेचं तिकीट
पोलिसांनी उलगडलं गूढ, अल्पवयीन मुलीवर सामूहिक अत्याचार, दगडाने ठेचून हत्या;  फरार चौघांच्या आवळल्या मुसक्या
पोलिसांनी उलगडलं गूढ, अल्पवयीन मुलीवर सामूहिक अत्याचार, दगडाने ठेचून हत्या; फरार चौघांच्या आवळल्या मुसक्या
Embed widget