एक्स्प्लोर
Advertisement
खान्देश खबरबात : चर्चेतील कलेक्टर आणि मनपा आयुक्त
प्रशासकीय उच्च पदांच्या भोवती अधिकारांचे संरक्षण असते. या अधिकारांचा वापर केवळ प्रशासकीय पद्धतीने केला तर संबंधित अधिकाऱ्यांचा उल्लेख कर्तव्य दक्ष म्हणून केला जातो. अधिकारांचा वापर निष्ठूरपणे केला तर कर्तव्य कठोर अशी ओळख निर्माण होते. मात्र, प्रशासकीय काम कर्तव्य दक्ष-कठोर होऊन करताना सोबत सामाजिक जाणीव व संवेदनशीलता बाळगली तर संबंधित अधिकाऱ्यांचा लौकिक हा सामाजभिमुख कर्तव्य परायण अधिकारी असा होतो. खूप कमी अधिकाऱ्यांना या पद्धतीने काम करणे शक्य होते. खान्देशात या पद्धतीने काम करण्याविषयी सध्या चर्चा आहे ती जळगावचे कलेक्टर किशोर राजे निंबाळकर आणि धुळे मनपाच्या आयुक्त संगीता धायगुडे यांचीच.
जळगावचे जिल्हाधिकारी म्हणून किशोर राजे निंबाळकर रुजू होऊन जवळपास दोन-अडीच महिन्यांचा कालावधी होतो आहे. या काळात प्रशासकीय कामासोबतच सामाजिक हिताच्या अनेक विषयात सक्रिय सहभागी होत त्यांनी आपली कार्यशैली हटके असल्याचे सिद्ध केले आहे. त्यांच्या ठायी असलेल्या सामाजिक जाणीव व संवेदनशीलतेचा परियच चि. सौ. का. मंगल जैन हिच्या मांडव परतणीच्या कार्यक्रमातून आला. पिता म्हणून वधू मंगल हिचे कन्यादान त्यांनी केले. नंतर पालक म्हणून रितीभाती निभावण्याचे कर्तव्य सुद्धा राजे निंबाळकर यांनी पार पाडले.
वझ्झर (ता. अचलपूर, अमरावती) येथील ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते शंकरबाबा पापळकर यांची मानसकन्या मंगल हिचा विवाह भातखेडा (ता. रावेर, जि. जळगाव) येथील योगेश जैन यांच्याशी दि. 30 एप्रिल रोजी जळगाव येथे उत्साहात झाला. या विवाह सोहळ्याचे आयोजन एक राष्ट्रीय उपक्रम म्हणून जळगाव रोटरी वेस्ट क्लबने केले होते.
मंगल व योगेश हे दोघेही विशेष घटकातील आहेत. मूक-बधीर, अंध किंवा गतीमंद मुलांचे वयाच्या १८व्या वर्षानंतर काय होते? त्यांच्या पुनर्वसनाचा कोणताही सरकारी कार्यक्रम नाही, या प्रश्नाकडे सरकारचे लक्ष वेधण्यासाठी शंकरबाबा पापळकर व जळगाव रोटरी क्लबने हा विवाह सोहळा घडवून आणला होता. त्यात मुलीचे मामा म्हणून राजे निंबाळकर यांनी जबाबदारी निभावली. याच जबादारीचा पुढचा भाग मांडव परतणीच्या कार्यक्रमातून पार पाडला. सौ. मंगलच्या सासरी पालक म्हणून राजे निंबाळकर गेले. त्यांनी जावायासह इतरांना घरी येण्याचे रितसर निमंत्रण दिले. नंतर जळगाव येथे कलेक्टर निवासात शहरातील मान्यवरांच्या उपस्थितीत सौ. मंगलचे माहेरपण साजरे झाले. हा कार्यक्रम आयोजित करताना राजे निंबाळकर यांच्या चेहऱ्यावर घरातील एक कार्य आनंदाने पार पडल्याचे समाधान होते.
राजे निंबाळकर हे सहृदयी अधिकारी असल्याचा प्रत्यय यापूर्वी ठाणे जिल्हा परिषदेत सीईओ म्हणून त्यांनी राबविलेल्या विविध सरकारी योजनांच्या उद्दिष्ट पूर्तीतून आला आहे. त्यांची तेथील कारकीर्द ही लक्षवेधी ठरली आहे. समाजातील गोरगरीबांच्या घरांचे उद्दिष्ट पूर्ण करण्यासाठी सीईओ म्हणून त्यांनी अथक परिश्रम घेतले. प्रधानमंत्री आवास योजनेत (ग्रामीण) जास्तीत जास्त लाभार्थींना घरकुले देण्यात ठाणे जिल्हा प्रथम आला. जिल्हा परिषदेच्या शाळा डिजिटल करण्याची सर्वोत्तम कामगिरी त्यांनी पार पाडली. शहापूरमधील 100 टक्के शाळा डिजिटल करण्याचा माईलस्टोनही त्यांनी रोवला. गरीबांच्या मुलांना संगणकीय प्रणालीतून शिक्षण मिळावे याच जाणिवेतून त्यांनी शाळा डिजिटलीकरणाची योजना राबविली.
आता जळगाव जिल्ह्यातही अनेक विकास योजनांचा पाठपुरावा करताना राजे निंबाळकर यांनी सामाजिक हिताच्या अनेक विषयांमध्ये थेट लक्ष घातले आहे. त्यांच्या विषयी जळगावकरांमध्ये आदरणीय अधिकारी अशी भावना निर्माण होत आहे, हे नक्की.
कर्तव्य कठोर अधिकारी असा लौकिक धुळे मनपाच्या आयुक्त संगीता धायगुडे यांनीही मिळवला आहे. सामाजिक जाणिव व संवेदनशीलता या विषयी त्या सुद्धा सजग आहेत. त्या स्वतः साहित्यिक मनाच्या आहेत. अत्यंत प्रतिकूल परिस्थितीत त्या वरिष्ठ पदावर पोहचल्या आहेत. “हुमान” या आत्मकथनातून त्यांनी आपली कहीणी मांडली आहे.
आयुक्त म्हणून त्यांनी स्वच्छ मनपा व स्वच्छ शहर हा उपक्रम प्रभावीपणे राबविला. मनपाच्या विविध करांची 92 टक्के वसुली करुन दाखविली. आपल्यातील कठोरपणा सिद्ध करताना त्यांनी मनपाच्या कर्मचाऱ्यांना शिस्त लावली. शहरातील अतिक्रमण निर्मूलन संदर्भातही कठोर कारवाई आरंभली. मनपाच्या आयुक्तांना नागरी सेवा-सुविधांची कामे करताना प्रस्थापित पुढाऱ्यांच्या रोषाला सामोरे जावे लागते. ते आयुक्त धायगुडे यांना अनुभवावे लागत आहे. आयुक्तपदी असलेली महिला आपल्या सारख्या लोकप्रतिनिधीला जुमानत नाही यातून अधिकारी रोषासह व्यक्तिगत द्वेषाचा विखारही उद्भवला आहे. त्यामुळे दंड, भेद व दहशत याचा वापर राजकारणातील गुंडापुंडांनी सुरू केला आहे.
आयुक्त धायगुडे यांच्या निवासस्थानी दगडफेक करण्याचा संतापजनक प्रकार घडला. अशा प्रकारच्या गुंडगिरीमागे कोण आहे? हे धुळेकर जाणून आहेत. मात्र, गुंडपुंडाना सत्तेचे संरक्षित कवच असल्याने सध्या तरी धुळेकरांच्या शिवाय आयुक्तांच्या पाठीमागे इतर पुढारी नाहीत.
धुळ्यातील हा प्रकार म्हणजे, सिंघम या गाजलेल्या चित्रपटातील गुंड जयकांत शिखरे आणि कर्तव्य कठोर अधिकारी सिंघम यांच्यातील लढाई असल्याचा उल्लेख काही पत्रकार करीत आहेत. मनपा आयुक्तांवर दहशत निर्माण करणाऱ्या अशा पुढाऱ्यांना “धुळेद्रोही” म्हणावे असे आवाहनही केले जात आहे. मंत्रालयातील सत्तेचा लंबक या प्रकारणात कोणाच्या बाजूने झुकतो? हे अद्याप स्पष्ट झालेले नाही.
किशोर राजे निंबाळकर आणि संगीता धायगुडे यांच्या कार्यपद्धतीचा हा लक्षवेधी इतिहास या पुढे इतर अधिकाऱ्यांसाठी निश्चितच मार्गदर्शक राहणार आहे.
‘खान्देश खबरबात’ सदरातील याआधीचे ब्लॉग :
खान्देश खबरबात : आदिवासींचा विकास घोटाळ्यातच!
खान्देश खबरबात : हैदोस घालणारा “दादा” समर्थक!
खान्देश खबरबात : खान्देश होणार मेडिकल हब !
ब्लॉग : जळगाव जिल्हा परिषदेत ‘काँग्रेसयुक्त’ भाजप
आमदार निलंबन की मॅच फिक्सिंग !
खान्देश खबरबात : डॉक्टरांना सामाजिक व कायदेशीर संरक्षण हवेच !
यशवंतराव ते पर्रिकर व्हाया पवार !
खान्देश खबरबात : जलसंपदा मंत्र्यांच्या तालुक्यात होणार विक्रमी शेततळी
खान्देशवासी मोकाट कुत्र्यांनी त्रस्त
खानदेश खबरबात: जळगावात समांतर रस्त्यांचा प्रश्न सार्वजनिक अजेंड्यावर
खान्देश खबरबात : जळगावसह धुळ्यात हॉकर्सचा प्रश्न कळीचा !!
खान्देश खबरबात : खान्देशात वाढतेय रनिंग, सायकलिंग कल्चर
खान्देश खबरबात : अवैध धंद्यांसाठी खान्देश नंदनवन
खान्देश खबरबात : पालकत्व हरवलेले तीन जिल्हे
खान्देश खबरबात : खान्देशातील आरोग्य यंत्रणा सुधारणार
खान्देश खबरबात : वाघुर, अक्क्लपाडा प्रकल्पांची कामे गती घेणार
खान्देश खबरबात : खान्देशात भूजल पातळीत वाढ
खान्देश खबरबात : खान्देशच्या औद्योगिक विकासाकडे लक्ष हवे!
खान्देश खबरबात : जळगाव, धुळे मनपात अमृत योजनांचे त्रांगडे
खान्देश खबरबात : कराच्या रकमेत धुळे, जळगाव मनपा काय करणार?
खान्देश खबरबात : करदाते वाढवण्यासाठी गनिमीकावा
खान्देश खबरबात : खान्देशात पालिका निवडणुकांत खो खो…
खान्देश खबरबात : ‘उमवि’त डॉ. पी. पी. पाटील यांची सन्मानाने एन्ट्री
खान्देश खबरबात: उसनवारीच्या पालकमंत्र्यांमुळे प्रशासन खिळखिळे… !!!
खान्देश खबरबात: मुख्यमंत्री जळगावसाठी उदार झाले…
खान्देश खबरबात: खान्देशात डेंग्यूचा कहर
खान्देश खबरबात : सारंगखेडा फेस्टिव्हल
खान्देश खबरबात : जळगावच्या राजकारणात अस्वस्थ खामोशी!
खान्देश खबरबात : खान्देशी काँग्रेस गलितगात्र
खान्देश खबरबात : गाईंना कत्तलखान्यात पाठवणारे कोण असतात?
खान्देश खबरबात : पोषण आहार घोटाळ्याचे रॅकेट
खान्देश खबरबात : वैद्यकीय सेवा महागणार, IMA चा इशारा
खान्देश खबरबात : पर्यटन विकासाला संधी
खान्देश खबरबात : पावसाची पाठ, शेतकरी चिंतेत
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
टेलिव्हिजन
महाराष्ट्र
मुंबई
बीड
Advertisement