एक्स्प्लोर

डार्क हेच ब्युटिफुल!!!

मुळात आपल्या समाजातच गोरी त्वचा असणं म्हणजे सुंदर असणं हा विचार इतका खोलवर रुजलाय की तो पुसून काढायला अजून किती दशकं जातील सांगू शकत नाही. भारतातच नव्हे तर संपूर्ण जगात गोऱ्या रंगाला महत्वं दिलं गेलंय.

काही दिवसांपूर्वी एक लेख एका वेबसाईटवर वाचण्यात आला.. तो वाचल्यावर असं लक्षात आलं की हा अनुभव मलाच नाही तर अनेक गव्हाळ, गेरुवा किंवा सावळ्या रंगाच्या स्त्रियांना नक्की आला असेल. १९९६ साल.. मला ललित कला केंद्राची पाठ्यवृत्ती मिळाली होती. आणि त्याकरिता दीड वर्ष चेन्नईतल्या ललित कला केंद्रात काम करावं लागणार होतं. म्हणजेच चेन्नईत राहाणं गरजेचं होतं. एका वेगळ्या राज्यात राहून काम करायला मिळणार याचा आनंद होता. आणि आनंदाने मी तिथल्या एका वर्किंग वूमेन्स हॉस्टेलमध्ये राहाण्याची सोय करून घेतली होती. म्हणजे काम करतांना वेळेचे बंधन नको. रात्रीचे १० वाजले तरी चालेल असे हे हॉस्टेल. हॉस्टेलमध्ये दक्षिण भारतातल्या राज्यातून आलेलेया अनेक स्त्रिया.. या दाक्षिणात्य स्त्रियांचं सौंदर्य खूप ठसठशीत आणि मोहक असे आजही आहे. बरं फक्तं दक्षिण भारतातल्याच स्त्रिया नव्हत्या तर सिन्हाली म्हणजेच श्रीलंकेतून रोजगारासठी आलेल्या अनेक मुली इथे राहात होत्या. या हॉस्टेलमध्ये चौथ्या मजल्यावर माझी खोली.. आम्हा चौघींची ती खोली. एका भल्या मोठ्या खोलीत ४ लोखंडी पलंग आणि चौघींसाठी ४ वेगवेगळी कपाटं.. मी महाराष्ट्राची, दुसरी केरळ, तिसरी तामिळनाडूतल्या तिर्थ क्षेत्रातून म्हणजे मदुराईतून तर चौथी आशा ही सिन्हली.. श्रीलंकेची.. सिन्हली भाषे बरोबर तमिळ भाषेत देखील उत्कृष्टं होती. ही आशा नावाची रूमी किंवा रूममेट ३/४ महिन्यातून आपल्या घरी म्हणजे श्रीलंकेत जायची..  जायच्या आधी तिची एकच महत्वाची खरेदी असायची.. ५० ते १०० ट्युब्यस ‘फेअर अँड लव्हली’ या फेअरनेस क्रिमची.. एक लॉयल ग्राहक.. तिला अनेकदा समाजवलं की अगं याने काही होत नसतं पण मनात लहानपणा पासून रुजवलेला काळ्या रंगा बद्दलचा न्युनगंड.. असो.. हॉस्टेलमधला माझा पहिला दिवस उजाडला.. तो रविवारचा दिवस म्हणजे सुट्टीचा दिवस असल्याने संपूर्ण हॉस्टेल गजबजलेलं... जाग आली तिच कलाकलाटाने.. आमच्या खोलीत माझ्या रूमींच्या काही मैत्रिणी आल्या होत्या.. किलकिल्या डोळ्यांनी मी त्यांच्याकडे पहिलं.. पण त्यांचे चेहरे फार विचित्र दिसत होते.. म्हणून  माझ्या मैत्रिणीच्या चेहऱ्याकडे पाहाण्यासाठी मान वळवली तर इतर रूमींचे चेहरे तसेच.. पिवळे.. खाडकन जागी झाले स्वच्छ डोळे धुतले आणि बाहेर आल्या वर पॅसेजमध्ये देखिल तेच दृश्य.. पिवळटलेले चेहरे. मला समजेना.. बरं फक्तं चेहरा पिवळटलेला तर तसं ही नाही.. पाय- तळपाय, अगधी खांद्यापासून ते नखांपर्यंतचे हात सगळच पिवळं.. अंग पिवळं तर केस हिरवे.. मी वगळता सगळ्याच तशा जणू काही रविवारची या हॉस्टेलची प्रथा असल्या सारखे. पोटात भूकेचा खड्डा पडल्याने कॅन्टिनला गेले.. तर कॅटिनच्या अण्णासहित तिथल्या वाडप्यांसहित सगळ्यांचे चेहऱ्यावर विचित्र पिवळ्या रंगाची छटा.. शेवटी न राहात विचारलं.. अण्णा.. ये क्या है.. माझं नशिब त्यावेळी अण्णा म्हणावं हे सुचलं नाहीतर आम्हा मुंबईकरांना भैय्या म्हणायची सवय.. माझा हिंदीतला प्रश्नं त्याला किती समजला त्यालाच माहिती. ( साल १९९६ असल्याने आत्ता सारखी परिस्थिती नव्हती. तेव्हाची परिश्थिती आणि आताची याच्यात खूप बदल झालेयत.. काही दिवसांपूर्वीच एका सर्व्हेनुसार आज तिथली ६० टक्के तरूण तामिळ जनता हिंदी भाषेत संवाद साधते.)   पण मात्र मला माझं उत्तर मिळालं होतं.. अण्णा म्हणाला ‘अम्मा.. white face.. नल्ला फेस.. turmeric –oil, अम्मा’... वीज चमकावी आणि लख्ख प्रकाश पडावा तसा प्रकाश माझ्या डोक्यात पडला.. अरे बापरे कठीण आहे इतकं गोरेपणाचं आकर्षण.. ही माझी पहिली प्रतिक्रिया.. तेव्हा लक्षात आले की आज ही पिवळाई पसरली होती ती आपापलं सौदर्य खुलवण्यासाठी. हा अनुभव सकाळचा, तर रात्रीची तऱ्हाच वेगळी.. सगळ्यांच्या कपाटातून ‘फेअर अँण्ड लव्हली ‘ ही क्रिम निघते काय आणि चेहऱ्यावर मुरवली काय जाते.. सगळीच अजब तऱ्हा.. बरं हा रोज रात्रीचा क्रम.. मात्र दीड वर्षात मला एका ही हॉस्टेलच्या मुलीचा रंग उजळलेला दिसला नाही. अनेकदा माझ्या रूमींना, तिथल्या नव्याने झालेल्या मैत्रिणींना समजावण्याचा प्रयत्नं केला.. पण त्यांच्या मते माझा गव्हाळ रंग देखील गोरा असल्याचा दावा त्या करत असतं. मुळात या चार –चौघींना सांगून असा काय बदल घडणार होता.. मुळात आपल्या समाजातच गोरी त्वचा असणं म्हणजे सुंदर असणं  हा विचार इतका खोलवर रुजलाय की तो पुसून काढायला अजून किती दशकं जातील सांगू शकत नाही. भारतातच नव्हे तर संपूर्ण जगात गोऱ्या रंगाला महत्वं दिलं गेलंय.. लहानपणापासूनच हे मनावर बिंबवलं जातं.. अगदी जन्माला आल्यापासून मालिशवाली बाई हळद आणि बेसनाचा लेप चोळत असतांना बाळाशी बोलत असते.. बघ आता कशी महिन्याभरात तुला गोरी करते की नाही.. शाळेत गेल्यावर गोऱ्या मुलींना शाळेच्या सांस्कृतिक कार्यक्रमात राणीचा परीचा प्रवेश दिला जातो.. आणि काळ्या मुला-मुलींना एकतर घेतच नाही आणि घेतलंच तर कोरसमध्ये किंवा फक्तं झाडू मारण्याकरीता. म्हणजे कामवाली बाई किंवा गडी माणसाचे प्रवेश.. एखादा तोही छोटासा. पुढे मुलं वयात आली की  गव्हाळी वर्ण असलेल्या मुला- मुलींना तशाच पद्धतीचे स्थळ आत्या मावशी माम्या सुचवू लागतात.. आजही एखादी सौंदर्य क्रिम बाजारात आली की, जाहिरातीमध्ये इतर गुणधर्म सांगण्याऐवजी एकच गुण जोर देऊन सांगितला जातो..  त्वचा गोरी करण्याचा.. आतातर काय पुरुषांसाठी देखील या फेअरनेस क्रिमवाल्यांनी अधिक प्रभावी क्रिम बाजारात आणली आहे. हे इतकं सगळं लिहिण्याचं कारण म्हणजे तो वाचलेला लेख. त्या लेखात एका फोटोचा आणि चित्राचा उल्लेख आहे. फोटो अतिशय सुंदर आणि एक वेगळा संदेश देणारा आहे. हा फोटो काढला आहे तो पाकिस्तानच्या पण कॅनडात स्थित एका स्त्री कलाकारानं.. झैनब अनवर . आणि याच फोटोग्राफवरुन प्रेरित होऊन बांगलादेशातल्या एका स्त्री कलाकाराने रेखाटलेलं चित्र देखील तितकंच प्रभावी आहे. वासेकर नहार असं या चित्रकाराचे नाव. या दोन्ही कलाकृतीत एका गव्हाळ रंगाच्या आणि रेखीव नाकी –डोळे असलेल्या स्त्रीच्या डोक्यावरून पदर दाखवण्यात आलाय.. ज्यातून देशाच्या  संस्कृतीशी नातं जोडलेलं दिसतं.. पण तिथेच या रुजलेल्या गोरेपणाच्या प्रथेवर आपली नाराजी ती हातात डार्क अँण्ड लव्हली अशी अक्षरं असलेली क्रिम घेऊन दर्शवतेय.. या चित्राकडे पाहिल्यावर आपण सगळेच  खाडकन फेअर अँण्ड लव्हली च्या स्वप्नातून जागं होतो आणि विचार करू लागतो येस ‘डार्क हेच व्युटिफुल’..
View More

ओपिनियन

Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

Personal Loan : वैयक्तिक कर्ज घेण्यापूर्वी 'या' गोष्टी लक्षात ठेवा, अन्यथा होईल मोठं नुकसान, जाणून घ्या
वैयक्तिक कर्ज घेण्यापूर्वी 'या' गोष्टी लक्षात ठेवा, अन्यथा होईल मोठं नुकसान, जाणून घ्या
Share Market : भारतीय शेअर बाजारातील विदेशी गुंतवणूकदारांचं विक्रीचं सत्र थांबेना, डिसेंबरमध्ये 15 दिवसात  22814 कोटी रुपये काढून घेतले
भारतीय शेअर बाजारातील विदेशी गुंतवणूकदारांचं विक्रीचं सत्र थांबेना, डिसेंबरमध्ये 15 दिवसात 22814 कोटी रुपये काढून घेतले
Baramati : बारामतीमध्ये मूळ मतदाराऐवजी दुसऱ्यानंच मतदान केलं, दिवसभरात तीन प्रकार समोर, मतदानावेळी धक्कादायक प्रकार
बारामतीमध्ये मूळ मतदाराऐवजी दुसऱ्यानंच मतदान केलं, दिवसभरात एक नव्हे तीन प्रकार समोर
S. Jaishankar : पांढरा चष्मा, काळा सुट! एस. जयशंकर यांची एक झलक पाहण्यासाठी पुण्यात मोठी गर्दी
पांढरा चष्मा, काळा सुट! एस. जयशंकर यांची एक झलक पाहण्यासाठी पुण्यात मोठी गर्दी
ABP Premium

व्हिडीओ

Assam Elephant Death : रुळ ओलांडताना हत्तीच्या कळपाला रेल्वेची धडक, 7 हत्तींचा मृत्यू Special Report
Special Report Ukkalgaon MPSC Success Story : एकाच कुटुंबातील 3 सख्ख्या भावांना एमपीएससीत लखलखीत यश
Bangladesh बांगलादेशात पुन्हा भारतविरोधी, हिंदूविरोधी हिंसा, हिंदू तरुणाला पेटवले Special Report
Epstein Files America एपस्टीन फाईल्सचा जगभरात धुमाकूळ,लाखो गोपनीय कागदपत्रं सार्वजनिक Special Report
Barack Obama Pasaydan Special Reportमाऊलींच्या पसायदानाची ओबामांना भुरळ,सोशल मीडियावर प्लेलिस्ट शेअर

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Personal Loan : वैयक्तिक कर्ज घेण्यापूर्वी 'या' गोष्टी लक्षात ठेवा, अन्यथा होईल मोठं नुकसान, जाणून घ्या
वैयक्तिक कर्ज घेण्यापूर्वी 'या' गोष्टी लक्षात ठेवा, अन्यथा होईल मोठं नुकसान, जाणून घ्या
Share Market : भारतीय शेअर बाजारातील विदेशी गुंतवणूकदारांचं विक्रीचं सत्र थांबेना, डिसेंबरमध्ये 15 दिवसात  22814 कोटी रुपये काढून घेतले
भारतीय शेअर बाजारातील विदेशी गुंतवणूकदारांचं विक्रीचं सत्र थांबेना, डिसेंबरमध्ये 15 दिवसात 22814 कोटी रुपये काढून घेतले
Baramati : बारामतीमध्ये मूळ मतदाराऐवजी दुसऱ्यानंच मतदान केलं, दिवसभरात तीन प्रकार समोर, मतदानावेळी धक्कादायक प्रकार
बारामतीमध्ये मूळ मतदाराऐवजी दुसऱ्यानंच मतदान केलं, दिवसभरात एक नव्हे तीन प्रकार समोर
S. Jaishankar : पांढरा चष्मा, काळा सुट! एस. जयशंकर यांची एक झलक पाहण्यासाठी पुण्यात मोठी गर्दी
पांढरा चष्मा, काळा सुट! एस. जयशंकर यांची एक झलक पाहण्यासाठी पुण्यात मोठी गर्दी
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 20 डिसेंबर 2025 | शनिवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 20 डिसेंबर 2025 | शनिवार
मोदी सरकारने 'मनरेगा'वर बुलडोझर चालवला, लाखो शेतकरी, कामगार, भूमिहीन ग्रामीण गरिबांच्या हितावर हल्ला, या काळ्या कायद्याविरुद्ध लढू; सोनिया गांधींचा हल्लाबोल
मोदी सरकारने 'मनरेगा'वर बुलडोझर चालवला, कोणाला किती रोजगार मिळणार ते आता दिल्लीत बसून ठरणार, या काळ्या कायद्याविरुद्ध लढू; सोनिया गांधींचा हल्लाबोल
Team India squad For T20 World Cup: शुभमन गिलचा करेक्ट कार्यक्रम, पण कॅप्टन असूनही चाचपडत असलेल्या सूर्याचे सुद्धा कोणी कान उपटले?
शुभमन गिलचा करेक्ट कार्यक्रम, पण कॅप्टन असूनही चाचपडत असलेल्या सूर्याचे सुद्धा कोणी कान उपटले?
China Vs India : चीनकडून भारताला मोठा धक्का! एका वर्षात दुसऱ्यांदा WTOचे दार ठोठावले; जाणून घ्या संपूर्ण वाद
चीनकडून भारताला मोठा धक्का! एका वर्षात दुसऱ्यांदा WTOचे दार ठोठावले; जाणून घ्या संपूर्ण वाद
Embed widget