एक्स्प्लोर

France Violence: वंशभेदाची ठिणगी आणि अशांत फ्रान्स

आठवडा झाला फ्रान्स धुमसतंय. हिंसक आंदोलनांमुळे देशांत अशांतता पसरलीय. एका अल्पवयीन मुलावर पोलिसांनी गोळी झाडल्यानंतर फ्रान्स अक्षरश: पेटलंय. पण हा प्रक्षोभ केवळ एका मुलाला पोलिसांनी जीवे मारल्याचा नाही तर वंशवादावरून केल्या भेदाविरुद्ध असल्याचं वास्तव आहे.

फ्रान्समध्ये नक्की काय घडलं?

27 जून रोजी फ्रान्समध्ये अघटीत घडलं. पोलिसांनी 17 वर्षांच्या मुलावर गोळी झाडली. त्या मुलाचं नाव होतं नाहेर आणि ही घटना घडली पॅरिसमधील नॅनतेरे या उपनगरात. काय घडलं, या बाबतही खूप काही सांगितलं जातंय. पिवळ्या रंगाची मर्सिडिज चालवणाऱ्या नाहेरकडे ड्रायव्हिंग लायसन्स नाही म्हणून पोलिसांनी त्याला गोळी झाडल्याची चर्चा आहे. तर नाहेर सिग्नल तोडून पळून जात असल्याने त्याला गोळी झाडल्याचं पोलीस सांगतात. या संदर्भात व्हायरल झालेल्या व्हिडीओत दोन पोलीस चालकाच्या बाजूला उभे होते आणि त्यांना नाहेरकडून कोणताही धोका नसताना पोलिसांनी त्याच्यावर गोळी झाडली, असं दिसतंय. नंतर असं सांगण्यात आलं की, कार कुणालाही धडक देईल, अशा पद्धतीने तो कार चालवत होता म्हणून त्याच्यावर गोळी झाडण्यात आली.

फ्रान्स अशांत

एक गोष्ट नक्की पोलिसांनी अल्पवयीन नाहेरची हत्या केली आणि नाहेर हा अल्जेरियन वंशाचा होता. यात तो अल्जेरियन वंशाचा होता हे खूप महत्त्वाचं. कारण यातच दंगलीची बिजे पेरली गेलीत. या घटनेनंतर फ्रान्समध्ये रातोरात आंदोलन उभं राहिलं. लोक हिंसक झाले. हे आंदोलन इतकं हिंसक झालं की तब्बल 1 हजार 919 वाहनांची जाळपोळ करण्यात आली, तर 493 सरकारी इमारतींचं नुकसान करण्यात आलंय. हे कमी म्हणून की काय हिंसक झालेल्या आंदोलकांनी रविवारी थेट कार पेटवून तिची धडक पॅरिसच्या महापौराच्या घराला धडक दिली. देशात उसळलेल्या या हिंसक आंदोलकांवर नियंत्रण मिळवताना 249 पोलीस जखमी झालेत. पोलिसांनी आतापर्यंत 667 दंगलखोरांना अटक केलीय तर तीन हजार लोकांना ताब्यात घेतलंय. त्यामुळे परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी फ्रान्समध्ये तब्बल 40 हजार पोलीस तैनात आहेत, तर एकट्या पॅरिसमध्ये आजही पाच हजार पोलीस डोळ्यात तेल घालून खडा पहारा देत आहेत.

वंशभेदाचा परिणाम

फ्रान्समध्ये अनेक जाती धर्मांचे लोक राहतात. असं असलं तरी गोऱ्यांव्यतिरिक्त इतर लोकांना नेहमी पोलिसांच्या दादागिरीला तोंड द्यावं लागतं, असा सर्वसाधारण आरोप आहे. अनेक मानव अधिकार संघटनांनी पोलिसांवर यापूर्वी वंशभेदाचा आरोप केलाय. आणि यावेळी पोलिसांनी गोळी झाडून हत्या केली तो मुलगा अल्जेरियन वंशाचा होता. यात बरंच काही येतं.दंगलीमुळे फ्रान्समधील सर्व आंदोलनांवर बंदी घालण्यात आलीय. अगदी प्रवासावरही निर्बंध घालण्यात आलेत.

अध्यक्ष मॅक्रॉन यांना झटका

फ्रान्समधील दंगलीमुळे अध्यक्ष इम्यॅन्युअल मॅक्रॉन अस्वस्थ झालेत. कारण दंगल चिघळल्याचा ठपका अप्रत्यक्ष का होईना त्यांच्यावर पडलाय. या वर्षाच्या सुरुवातालीलाच पेन्शन सुधारणाविरोधात फ्रान्समध्ये आंदोलन पेटलं होतं. पेन्शन सुधारणा करताना निवृत्तीचं वय 62 वरून 64 केल्यामुळे देशात संतापाची लाट उसळळी होती.  हे आंदोलन अगदी मार्च-एप्रिलपर्यंत सुरू होतं. त्यामुळेच आताचं आंदोलन कुठल्याही परिस्थितीत चिघळू न देण्याचं मोठं आव्हान मॅक्रॉन यांच्यासमोर होतं. यासाठी मॅक्रॉन यांनी ब्रुसेल्समधील नियोजित युरोपीयन काउन्सील परिषदेचा गेल्या आठवड्यातील दौरा रद्द केला. विशेष म्हणजे 2005 मध्येही अशाच प्रकारची घटना घडली होती. तेव्हा लपू पाहणाऱ्या दोन अल्पवयीन मुलांना पोलिसांनी मारलं होतं. त्यानंतर तीन आठवडे फ्रान्स दंगलीत होरपळत होता.

नाहेरच्या आजीचं आवाहन

फ्रान्स पेटलेलं असताना नाहेरच्या आजीनं दंगल थांबवण्याचं आवाहन केलंय. गोळी झाडणाऱ्या पोलिसाला दोष देताना सरसकट सर्व पोलिसांवर राग का काढायचा, अशी समजूतदारपणाची भूमिका नाहेरच्या आजीने घेतलीय.

View More

ओपिनियन

Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

Solapur Crime News : झोपेतून उठवल्याचा राग, बिहारी साथिदाराला हातोड्याने वार करुन संपवलं, करमाळ्यातील धक्कादायक घटना
झोपेतून उठवल्याचा राग, बिहारी साथिदाराला हातोड्याने वार करुन संपवलं, करमाळ्यातील धक्कादायक घटना
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 13 ऑगस्ट 2026 | गुरुवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 13 ऑगस्ट 2026 | गुरुवार
Shiv Sena Symbol Case : चंद्रचूड यांच्या घटनापीठाने दिलेल्या शिवसेनेच्या निकालाचा फेरविचार व्हावा, ठाकरेंच्या वकिलांची मोठी मागणी
चंद्रचूड यांच्या घटनापीठाने दिलेल्या शिवसेनेच्या निकालाचा फेरविचार व्हावा, ठाकरेंच्या वकिलांची मोठी मागणी
Sukhbir Badal News:मोठी बातमी, पंजाबचे माजी उपमुख्यमंत्री सुखबीर सिंह बादल यांच्यावर नांदेडमध्ये हल्ला, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे चौकशीचे आदेश 
सुखबीर सिंह बादल यांच्यावर नांदेडमध्ये हल्ला, आरोपीला अटक; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे चौकशीचे आदेश 

व्हिडीओ

Buldhana Khamgaon Ajji on FDA : तुकाराम मुंढेंना विनंती करणाऱ्या खामगावातील व्हायरल आजी 'माझा'वर
Sanjay Raut on Amit Shah: अमित शाहांना तातडीने उपपंतप्रधान व्हायचंय, पण मोदींनी नकार दिलाय
Manoj Jarange Patil: आआथातू अरअरअर...अ‍ॅक्शन केली, डायलॉग बोलले; जरांगेंनी बावनकुळेंची बाहुबलीमधील कालकेयशी केली तुलना
Sanjay Raut Vs Naresh Mhaske Special Report : नरेश म्हस्केंची पत्रं, संजय राऊतांच्या बैठका, कोण खरं?
Sanjay Raut PC : शिवसेना सुनावणी, शिंदेंवर हल्लाबोल ते गडचिरोली प्रकरण; संजय राऊतांचा हल्लाबोल!

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Solapur Crime News : झोपेतून उठवल्याचा राग, बिहारी साथिदाराला हातोड्याने वार करुन संपवलं, करमाळ्यातील धक्कादायक घटना
झोपेतून उठवल्याचा राग, बिहारी साथिदाराला हातोड्याने वार करुन संपवलं, करमाळ्यातील धक्कादायक घटना
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 13 ऑगस्ट 2026 | गुरुवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 13 ऑगस्ट 2026 | गुरुवार
Shiv Sena Symbol Case : चंद्रचूड यांच्या घटनापीठाने दिलेल्या शिवसेनेच्या निकालाचा फेरविचार व्हावा, ठाकरेंच्या वकिलांची मोठी मागणी
चंद्रचूड यांच्या घटनापीठाने दिलेल्या शिवसेनेच्या निकालाचा फेरविचार व्हावा, ठाकरेंच्या वकिलांची मोठी मागणी
Sukhbir Badal News:मोठी बातमी, पंजाबचे माजी उपमुख्यमंत्री सुखबीर सिंह बादल यांच्यावर नांदेडमध्ये हल्ला, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे चौकशीचे आदेश 
सुखबीर सिंह बादल यांच्यावर नांदेडमध्ये हल्ला, आरोपीला अटक; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे चौकशीचे आदेश 
IND Vs SL Galle Test: त्रिमूर्ती रिंगणात उतरवत श्रीलंकेला फिरकीच्या जाळ्यात अडकवण्याची तयारी; गोलंदाज प्रशिक्षकांकडून स्पष्ट संकेत
त्रिमूर्ती रिंगणात उतरवत श्रीलंकेला फिरकीच्या जाळ्यात अडकवण्याची तयारी; गोलंदाज प्रशिक्षकांकडून स्पष्ट संकेत
बिहारमध्ये महिलांना भर निवडणुकीत 10-10 हजार वाटल्यानंतर आता उत्तर प्रदेशात 50-50 हजार वाटण्याची तयारी; निवडणुकीच्या तोंडावर 20-20 हजार खात्यात सोडणार?
बिहारमध्ये महिलांना भर निवडणुकीत 10-10 हजार वाटल्यानंतर आता उत्तर प्रदेशात 50-50 हजार वाटण्याची तयारी; निवडणुकीच्या तोंडावर 20-20 हजार खात्यात सोडणार?
Shiv Sena Name & Symbol Dispute: 'पण निवडणूक आयोग शिंदे गटाला धनुष्यबाण चिन्ह देऊ शकत नाही..' अत्यंत कळीचा मुद्दा उपस्थित करत कपिल सिब्बलांकडून पुन्हा आयोगाच्या कारभाराची खरडपट्टी
'पण निवडणूक आयोग शिंदे गटाला धनुष्यबाण चिन्ह देऊ शकत नाही..' अत्यंत कळीचा मुद्दा उपस्थित करत कपिल सिब्बलांकडून पुन्हा आयोगाच्या कारभाराची खरडपट्टी
Joe Root: नवा गडी, नवं राज्य!
नवा गडी, नवं राज्य! "तुम्हाला बिअर प्यायची असेल तर प्या, पण..." कॅप्टन होताच जो रूट इंग्लंड संघाचा नाइट कर्फ्यू उठवत काय काय म्हणाला?
Embed widget