एक्स्प्लोर

BLOG | दार उघड बये... आता दार उघड

कोरोना ह्या आजाराचे संक्रमण रोखणे याकरिता प्रतिबंधात्मक उपायांमध्ये कायम सातत्य ठेवणे गरजेचे आहे. ज्या धारावीत कोरोना थांबविण्यात यश मिळविले असताना पुन्हा तेथे रुग्ण सापडण्यास सुरुवात झाली आहे. त्यामुळे एखाद्या ठिकाणचे रुग्ण सापडणे थांबणे म्हणजे कोरोना संपला असे म्हणणे उचित ठरणार नाही.

संतोष आंधळे

संपूर्ण मानवी विश्वाला हादरा देणाऱ्या आणि व्यवस्थेला आव्हान उभारणाऱ्या या संसर्गजन्य कोरोनासारख्या आजाराला रोखण्यासाठी शासन, प्रशासन आणि आरोग्य व्यवस्था सर्व प्रयत्न करीत आहे. मात्र कितीही प्रयत्न केले तरी ते अपुरेच पडत आहे. जगभरात मान्य असलेला एक यशस्वी प्रयोग तो म्हणजे प्रत्येकाच्या घरी जाऊन रुग्ण तपासणी, रुग्णशोध किंवा माहिती गोळा करून प्रतिबंधात्मक उपाय सुचविणे यावर आजपासून संपूर्ण राज्य पिंजून काढण्याची 'माझे कुटुंब, माझी जबाबदारी' ही महत्वाकांक्षी मोहीम सुरु करण्यात आली आहे. या मोहिमेचे यश हे नागरिकांवर अवलंबून आहे. दारात आलेल्या आरोग्य सेवकाला सहकार्य करून वस्तुनिष्ठ माहिती देणे आणि सांगितलेल्या सूचनांचे पालन केल्यास निश्चितच कोरोनाला काही प्रमाणात रोखणे शक्य होणार आहे. लोकसहभाग आणि आरोग्य शिक्षणाच्या माध्यमातून या आजारसंदर्भात जजागृती निर्माण करून अधिकच्या चाचण्यांची व्यस्था करण्यात येणार आहे. कोरोनाचा कायमचा बंदोबस्त करायचा असेल तर कोरोना विरोधी लोकचळवळ उभी करावी लागणार आहे. लोकांनी लोकांसाठी उभी करण्याची गरज असलेल्या या कोरोनाविरोधी चळवळीला बळ प्राप्त होण्यासाठी सकारात्मक संवादाची झालर असणे क्रमप्राप्त आहे.

राज्यातील रुग्णसंख्येचा आणि मृतांचा आकडा दिवसागणिक वाढत आहे. डॉक्टर आणि आरोग्य कर्मचारी जितके नवीन रुग्ण निर्माण होत आहे त्यांना योग्य उपचार मिळावेत म्हणून प्रयत्नांची पराकाष्टा करीत आहेत. आरोग्य व्यवस्थेवरचा ताण वाढत आहे. काही ठिकाणी व्यवस्थापनातील त्रुटी असल्यामुळे टीकेचे धनी ठरत आहे. खरे तर कोरोनाचे संक्रमण इतक्या झपाट्याने वाढू शकते याचा अंदाज वर्तविण्यास आरोग्य व्यवस्था कमी पडली की काय असे चित्र पाहायला मिळत आहे. आजपर्यंत कोरोना संदर्भातील अनेक वैद्यकीय तज्ञांनी भाकीत व्यक्त केली. मात्र कोरोनाने या सगळ्याचे दावे फोल ठरवलेत. कोरोना ह्या आजाराचे संक्रमण रोखणे याकरिता प्रतिबंधात्मक उपायांमध्ये कायम सातत्य ठेवणे गरजेचे आहे. ज्या धारावीत कोरोना थांबविण्यात यश मिळविले असताना पुन्हा तेथे रुग्ण सापडण्यास सुरुवात झाली आहे. त्यामुळे एखाद्या ठिकाणचे रुग्ण सापडणे थांबणे म्हणजे कोरोना संपला असे म्हणणे उचित ठरणार नाही. त्या ठिकाणी आयोजित केलेले प्रतिबंधात्मक उपाय कायम करतच राहणे हा त्यातला एकमेव आरोग्य मंत्र आहे. त्याशिवाय नागरिकांनी वावरताना सुरक्षिततेचे सर्व उपाय शासनाने सुचविले आहे त्याचे काटेकोरपणे पालन करणे अनिवार्य आहे.

BLOG | महाराष्ट्रात 'दस्तक'

गणेशोउत्सवच्या काळात, मूळचे ठाण्याचे असणारे डॉ सचिन गुप्ते, जनऔषध वैद्यकशास्त्र (प्रिव्हेंटिव्ह आणि सोशल मेडिसिन) असून त्यांनी राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची भेट घेऊन उत्तरप्रदेशात राबवणाऱ्या आरोग्यच्या 'दस्तक' उपक्रमाविषयी माहिती दिली होती. डॉ गुप्ते सध्या 'पाथ' या बिगर सरकारी आंतराष्ट्रीय आरोग्य क्षेत्रात करणाऱ्या संस्थेत काम करत असून उत्तर प्रदेश राज्याचे प्रमुख म्हणून काम पाहत आहे. या राज्यात, अन्य संस्थांबरोबर आरोग्याशी निगडित विविध कार्यक्रम राबवून कोणत्याही आजाराच्या प्रतिबंधात्मक उपाय योजनांचे ते काम करीत आहेत.

दस्तक हा उत्तर प्रदेश सरकारचा उपक्रम असून पाथ, युनिसेफ, जागतिक आरोग्य परिषद या संस्था त्यांच्या या उपक्रमास सहकार्य करत आहोत. हा कार्यक्रम मूळ इतर आजाराच्या उद्देशाने आखण्यात आला असून त्यांची कार्यपद्धती कोरोनासारख्या संसर्गजन्य आजारात वापरल्यास कोरोनाला थांबविण्यात किंवा त्याचा प्रसार रोखण्यास मदत होऊ शकते ह्या उद्देशाने डॉ गुप्ते यांनी ही माहिती मुख्यमंत्री यांना दिली होती. महाराष्ट्रात अशा पद्धतीचा उपक्रम राबवताना आरोग्य सेवक किंवा आशा सेविका यांनी नागरिकांच्या घरोघरी जाऊन त्यांना या आजारासंदर्भातील सविस्तर माहिती, या आजारापासून कसे वाचता येईल, कोणत्या उपचारपद्धती सध्या उपलब्ध आहे. त्यात मुख्य उद्देश म्हणजे लोकांमध्ये विनाकारण घाबरण्याची कोणतीही गरज नसून त्यांच्यामध्ये आत्मविश्वास निर्माण करणे. तसेच या आजारातील संभाव्य त्यात सर्व गोष्टीशी नागरिकांना अवगत करणे. त्यांच्या मनातील शंकेचे निरसण करणे. त्याचप्रमाणे ट्रेसिंग, ट्रॅकिंग, टेस्टिंग आणि त्यासुमार उपचार करणे ह्या गोष्टीचा अवलंब केला पाहिजे. यामुळे आपणस रुग्ण सापडण्यास मदत होईल आणि वेळच्यावेळी उपचार दिल्याने तो रुग्ण आणखी काही लोकांना बाधित करणार नाही.

याप्रकरणी मुंबई महानगरपालिकेचे अतिरिक्त आयुक्त सुरेश काकाणी यांनी एबीपी माझा डिजिटलशी बोलताना सांगितले की, "मुंबई महापालिकेच्या हद्दीतील प्रत्येक घरात आरोग्य सेवक जाऊन घरोघरी तपासणी करण्यात येणार आहे. नागरिकांशी आरोग्य संवाद साधला जाणार आहे. त्यांना कोरोनाशी संबंधित काही शंका असतील तर त्या सोडवण्याचा प्रयत्न करण्यात येणार आहे. तसेच त्यांना या आजाराविषयी शास्त्रशुद्ध पद्धतीने माहिती देऊन जनजागृती करण्यात येणार आहे. त्यामुळे योग्य ती माहिती नागरिकांपर्यंत पोहोचवली जाणार आहे. पहिला टप्पा 25 दिवसाचा असणार आहे."

BLOG | कोरोना विरोधी लोकचळवळ!

27 जुलैला 'कोरोना विरोधी लोकचळवळ !' या शीर्षकाखाली कोरोनाला हरवायचं असेल तर लोकसहभाग महत्त्वाचा आहे. तसेच नागरिकांनी आता या विरोधात लोकचळवळ उभी केली पाहिजे असे सविस्तर लेखन मांडण्यात आले होते. त्यामध्ये , देशभरात कोरोनाच्या साथीने थैमान घातलं असून केवळ शासन, प्रशासन आणि कोविडयोद्धे यांनी कोरोना विरोधातील लढाई लढून चालणार नाही. या वैश्विक महामारीला आळा घालायचा असेल तर लोकसहभाग फार महत्तवाचा आहे, नागरिकांनी आता कोरोनाविरोधी लोकचळवळ उभी करायची गरज आहे. ही चळवळ करीत असताना मात्र कोणत्याही गोष्टीचा अतिरेक न करता प्रशासनाने आखून दिलेल्या नियमाचे पालन करणे अपेक्षित असून वाड्या-वस्त्यांवर, गाव-शिवारात, गृहनिर्माण संकुलात, चाळ -कमिट्यांनी या संसर्गजन्य आजाराविरोधात आता आवाज पुकारण्याची हीच ती वेळ. आपला देश गेली सहा महिन्यापेक्षा अधिक काळ कोरोनाविरोधात लढा लढत आहे. तर, राज्यातील व्यवस्था गेली पाच महिने दिवस-रात्र काम करत आहे. सरकारी आणि आरोग्य व्यवस्थेवर दिवसागणिक ताण वाढतच आहे. त्या व्यवस्थेवरील ताण कमी करण्यासाठी कोणते उपाय आखता येतील हेच या चवळीचे उद्दिष्ट ठेवून काम करत पुढे जावे लागणार आहे.

त्यामुळे कोरोना विरोधातील लोक चळवळ म्हणजे काय हे आपण आधी लक्षात घेतलं पाहिजे. आपल्या जवळच्या परिसरातील एखाद्या व्यक्तीस आजाराची कोणती लक्षणं असतील तर त्याच्या कुटुंबियांना किंवा त्या रुग्णाला सोशल डिस्टनसिंगचे पालन करून त्यांना नजीकच्या दवाखान्यात जाण्यास उद्युक्त करणे. कारण या आजारावर सुरुवातीच्या काळातच उपचार करणे फायदेशीर ठरल्याचे आतापर्यंतच्या परिस्थितीवरून दिसून आले आहे. कारण अनेक जण लक्षणं लपवून घरीच अंगावर दुखणं काढतात, आणि जेव्हा ते गंभीर होतात तेव्हा धावपळ करण्यास सुरवात करतात. त्यामुळे बराच रुग्ण बरा करता येऊ शकत असलेला 'गोल्डन पिरियड' कालावधी निघून गेलेला असतो. आतापर्यंत जे रुग्ण दगावलेत त्यामध्ये शेवटच्या क्षणी जे गंभीर रुग्ण आलेत त्यांची संख्या बऱ्यापैकी आहे, वैद्यकीय तज्ञांनी या गोष्टीला दुजोरा दिला आहे. त्यामुळे कुठेही आजाराची लक्षणे असलेला रुग्ण आढळला तर तात्काळ जमल्यास आरोग्य सेवेशी त्यांचा संपर्क करून द्यावा कींवा त्या संदर्भात मार्गदर्शन करावे, त्यामुळे मृत्यू दर रोखण्यास मदत होऊ शकते.

राज्यातील सर्व यंत्रणा कोरोनाला थोपविण्यासाठी शर्तीचे प्रयत्न करत आहे. यामध्ये नागरिकांनी सहभाग नोंदविण्याची गरज आहे. तो सहंभाग नोंदवायचा म्हणजे त्यांनी विनाकारण घराबाहेर पडू नये आणि पडलात तर तोंडावर व्यवस्थित मास्क लावावा. सोशल डिस्टंसिंगचे पालन करावे. जगभरात ह्याच नियमांचे काटेकोर पणे पालन केले जाते. त्यामुळे आपल्याकडे वेगळे असे काही नियम केलेले नाहीत. प्रत्येक छोट्या गोष्टी सांगण्यासाठी प्रशासनाची गरज लागत कामा नये. कारण सध्याची जी कोरोनाविरोधात जी लढाई सुरु आहे ती या देशातील आणि राज्यातील नागरिक आरोग्यसंपन्न, निरोगी आणि या आजारांपासून सुरक्षित राहावे म्हणूनच सुरु आहे. त्यामुळे आपल्या सुरक्षिततेची काळजी स्वतः घेतली पाहिजे. नागरिकांनी स्वतःला सुरक्षित ठेवण्याबरोबर आपल्या आजूबाजूचे लोकं कसे सुरक्षित राहतील याची दक्षता घेणे गरजेचे आहे. आपल्या परिसरातील आजारी कुटुंबाविषयी कींवा त्या व्यक्तीविषयी आरोग्य यंत्रणेला माहिती देऊन योग्य ती मदत करणे आता सध्याच्या परिस्थितील गरज बनली आहे. त्यामुळे येत्या काळात आरोग्य व्यवस्थेतील कर्मचारी तुमच्या दारावर आले तर त्यांना सहकार्य करून कोरोना हद्दपार करण्यासाठी गळ्यांनी सज्ज होण्याची हीच ती वेळ, त्यामुळे हे लक्षात ठेवा दार उघड बये ... दार उघड कोण आलय बघ, आरोग्यकर्मचारी.

संतोष आंधळे यांचे अन्य ब्लॉग

अधिक पाहा..

ओपिनियन

Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

VIDEO : वसईवाल्यांना वसईतच ठेवू, डहाणूपर्यंत येऊ देणार नाही, देवेंद्र फडणवीसांचा इशारा; तर हितेंद्र ठाकुरांचाही पलटवार
वसईवाल्यांना वसईतच ठेवू, डहाणूपर्यंत येऊ देणार नाही, देवेंद्र फडणवीसांचा इशारा; तर हितेंद्र ठाकुरांचाही पलटवार
दिल्लीनं लखनौच्या नवाबांचा खेळ बिघडवला, राजस्थानच्या रजवाड्यांना फायदा! 2 जागा, 3 संघ, कुणाला मिळणार प्लेऑफचं तिकिट?
दिल्लीनं लखनौच्या नवाबांचा खेळ बिघडवला, राजस्थानच्या रजवाड्यांना फायदा! 2 जागा, 3 संघ, कुणाला मिळणार प्लेऑफचं तिकिट?
दिल्लीचा शेवट गोड, लखनौचा 19 धावांनी पराभव, अर्शदची एकाकी झुंज
दिल्लीचा शेवट गोड, लखनौचा 19 धावांनी पराभव, अर्शदची एकाकी झुंज
Prakash Ambedkar : ठाकरेंचा शिंदेंशी समझोता, म्हणूनच कल्याण लोकसभेत नूरा कुस्ती; प्रकाश आंबेडकरांचा आरोप
ठाकरेंचा शिंदेंशी समझोता, म्हणूनच कल्याण लोकसभेत नूरा कुस्ती; प्रकाश आंबेडकरांचा आरोप
Advertisement
for smartphones
and tablets

व्हिडीओ

Devendra Fadnavis on Hitendra Thakur : वसईवाल्यांना तिथेच निपटावू, फडणवीसांचा हितेंद्र ठाकूरांना इशाराJaipur 17 Crore Injection : लोक वर्गणीतून उभारले पैसे, 23 महिन्याच्या बाळाला दिलं 17 कोटींचं इंजेक्शनABP Majha Headlines : 11 PM : 14 May 2024 : Maharashtra News : एबीपी माझा हेडलाईन्सTOP 25 : टॉप 25 बातम्यांचा वेगवान आढावा : टॉप 25 न्यूज : 10 PM : 14 May 2024: ABP Majha

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
VIDEO : वसईवाल्यांना वसईतच ठेवू, डहाणूपर्यंत येऊ देणार नाही, देवेंद्र फडणवीसांचा इशारा; तर हितेंद्र ठाकुरांचाही पलटवार
वसईवाल्यांना वसईतच ठेवू, डहाणूपर्यंत येऊ देणार नाही, देवेंद्र फडणवीसांचा इशारा; तर हितेंद्र ठाकुरांचाही पलटवार
दिल्लीनं लखनौच्या नवाबांचा खेळ बिघडवला, राजस्थानच्या रजवाड्यांना फायदा! 2 जागा, 3 संघ, कुणाला मिळणार प्लेऑफचं तिकिट?
दिल्लीनं लखनौच्या नवाबांचा खेळ बिघडवला, राजस्थानच्या रजवाड्यांना फायदा! 2 जागा, 3 संघ, कुणाला मिळणार प्लेऑफचं तिकिट?
दिल्लीचा शेवट गोड, लखनौचा 19 धावांनी पराभव, अर्शदची एकाकी झुंज
दिल्लीचा शेवट गोड, लखनौचा 19 धावांनी पराभव, अर्शदची एकाकी झुंज
Prakash Ambedkar : ठाकरेंचा शिंदेंशी समझोता, म्हणूनच कल्याण लोकसभेत नूरा कुस्ती; प्रकाश आंबेडकरांचा आरोप
ठाकरेंचा शिंदेंशी समझोता, म्हणूनच कल्याण लोकसभेत नूरा कुस्ती; प्रकाश आंबेडकरांचा आरोप
रोहित-आगरकरला पांड्या नको होता, बीसीसीआयच्या दबावामुळे विश्वचषकाच्या संघात स्थान
रोहित-आगरकरला पांड्या नको होता, बीसीसीआयच्या दबावामुळे विश्वचषकाच्या संघात स्थान
व्हिएतनाममध्ये भारतीय खेळाडूंचा डंका; रूपा बायोरने मिळवून दिले पहिले ऐतिहासिक पदक  
व्हिएतनाममध्ये भारतीय खेळाडूंचा डंका; रूपा बायोरने मिळवून दिले पहिले ऐतिहासिक पदक  
ऑन कॅमेरा कर्णधाराला झाप झापलं; दिल्लीविरुद्धच्या सामन्याआधी गोयंकांनी राहुल घरी बोलवले, फोटो व्हायरल 
ऑन कॅमेरा कर्णधाराला झाप झापलं; दिल्लीविरुद्धच्या सामन्याआधी गोयंकांनी राहुल घरी बोलवले, फोटो व्हायरल 
काय सांगता? नवऱ्याने 5 रुपयाचे कुरकुरे आणले नाहीत, म्हणून पत्नीचं धक्कादायक पाऊल
काय सांगता? नवऱ्याने 5 रुपयाचे कुरकुरे आणले नाहीत, म्हणून पत्नीचं धक्कादायक पाऊल
Embed widget