एक्स्प्लोर

SIP : 20 हजार रुपये पगार मिळतो, 4000 रुपयांच्या गुंतवणुकीनं 1.38 कोटींचा फंड कसा जमा करायचा?     

SIP : छोट्या रकमेपासून सुरु करण्यात आलेली गुंतवणूक मोठा फंड तयार करते. काही लोकांचं मत असतं की त्यांचा पगार कमी आहे मात्र छोट्या रकमेनं गुंतवणूक सुरु केल्यास मोठा कॉर्पस तयार होऊ शकतो.  

Financial Planning For Low Income मुंबई: भारतात एसआयपीद्वारे म्युच्युअल फंडमध्ये गुंतवणूक करण्याऱ्यांची संख्या वाढत आहे. एसआयपीद्वारे गुंतवणूक करताना दीर्घकालीन गुंतवणुकीचा विचार करुन ती सुरु करणं आवश्यक असतं. मोठ्या रकमेची गुंतवणूक फायदेशीर असतेच. मात्र, कमी पगार असलेल्या व्यक्ती देखील गुंतवणूक सुरु करु शकतात. आता 500 रुपयांपासून गुंतवणूक सुरु करता येते. 

छोट्या रकमेची गुंतवणूक सुरु करुन देखील तुम्ही मोठा कॉर्पस तयार करु शकता. काही लोक म्हणतात त्याचं उत्पन्न कमी आहे, पगार कमी आहे. कोट्यवधि रुपयांचा कॉर्पस बनवू शकत नाही. मात्र, 50-30-20 चा फॉर्म्युला वापरुन गुंतवणूक केल्यास चांगला कॉर्पस तयार होऊ शकतो. 

समजा तुम्ही नियमितपणे गुंतवणूक करत आहात. तर, तुम्ही चांगला कॉर्पस बनवू  शकता. उदा. जर तुमचा पगार 20 हजार रुपये असेल तर तुम्ही 50-30-20 फॉर्म्युला वापरुन कोट्यधीश होऊ शकता.  

50-30-20 फॉर्म्युला काय?

50-30-20 फॉर्म्युल्यामध्ये तुमचा पगार किंवा उत्पन्न खर्चाच्या आधारावर विभाजित करायचं असतं.  50 टक्क्यात घराचं भाडं, जेवणाचा खर्च आणि दुसऱ्या आवश्यक गोष्टींवर खर्च करता येतो. राहिलेल्या 50 टक्क्यांपैकी 30 टक्के रक्कम मनोरंजन आणि पर्यटन यासारख्या गोष्टींवर खर्च करावा. राहिलेली 20 टक्के रक्कम म्हणजेच  20 हजार रुपये पगार असेल तर 4000 रुपये एसआयपीद्वारे गुंतवले पाहिजेत.  

4000 रुपयांच्या एसआयपीनं कोटींचा कॉर्पस किती वर्षात?  

सर्वसाधारणपणे दरमहा 4000 रुपयांची एसआयपी सुरु केली आणि त्यावर 12 टक्के प्रतिवर्ष सीएजीआर अपेक्षित धरल्यास 28 वर्षात 1.38 कोटी रुपयांचा निधी जमा होऊ शकतो. तर, 4000 रुपयांची एसआयपी सुरु करुन दरवर्षी 10 टक्के स्टेपअप केल्यास 22 वर्षात 1 कोटी 1 लाख रुपये जमा होऊ शकतात. 

दरम्यान, म्युच्युअल फंडातून मिळणारा परतावा शेअर बाजारातील घडामोडींवर अवलंबून असतो. ज्यावेळी शेअर बाजारात घसरण झालेली असते तेव्हा म्युच्युअल फंडसचे यूनिट कमी किमतीत गुंतवूकदारांना मिळतात. आता स्टॉक्समध्ये देखील एसआयपीची सुविधा सुरु झाली आहे. 2025 मध्ये विदेशी गुंतवणूकदारांनी भारतीय शेअर बाजारातून पैसे काढून घेतले जात असताना एसआयपीतून शेअर बाजारात येणाऱ्या पैशांमुळं भारतीय शेअर बाजाराला आधार मिळाला आहे. 

(टीप- शेअर बाजार, म्यूच्यूअल फंड हे जोखमीच्या अधीन असतात. या लेखात दिलेली माहिती ही प्राथमिक स्वरुपाची असून आम्ही कोणताही दावा करत नाही. या लेखामागचा गुंतवणुकीसाठी शिफारस, सल्ला देण्याचा उद्देश नाही. तुम्हाला गुंतवणूक करायची असेल तर या क्षेत्रातील तज्ज्ञांचा सल्ला घ्या.)

महत्त्वाच्या बातम्या

ऑटोचालकाच्या घरात सापडले 3 कोटी रुपये, दोन दिवस झाले तरी कोणीच केला नाही दावा, नेमके पैसे कोणाचे?  
ऑटोचालकाच्या घरात सापडले 3 कोटी रुपये, दोन दिवस झाले तरी कोणीच केला नाही दावा, नेमके पैसे कोणाचे?  
Mobile Recharge Price Hike : मोबाईल रिचार्ज पुन्हा महागणार! जिओ आणि एअरटेलच्या ग्राहकांना धक्का बसण्याची शक्यता
मोबाईल रिचार्ज पुन्हा महागणार! जिओ आणि एअरटेलच्या ग्राहकांना धक्का बसण्याची शक्यता
देशातील 'या' बँकेचा मोठा निर्णय, नियमांमध्ये केला बदल, ग्राहकांच्या खिशाला लागणार कात्री? तुमच खातं कोणत्या बँकेत?
देशातील 'या' बँकेचा मोठा निर्णय, नियमांमध्ये केला बदल, ग्राहकांच्या खिशाला लागणार कात्री? तुमच खातं कोणत्या बँकेत?
सणासुदीच्या काळात ग्राहकांना झटका! साखरेच्या दरात मोठी उसळी! 18 दिवसात 18 रुपयांची वाढ, दर वाढण्याचं नेमकं कारण काय? 
सणासुदीच्या काळात ग्राहकांना झटका! साखरेच्या दरात मोठी उसळी! 18 दिवसात 18 रुपयांची वाढ, दर वाढण्याचं नेमकं कारण काय? 

व्हिडीओ

Pawar Family Special Report : बारामतीकडे लक्ष द्या, बारामतीकरांनी थेट लिहलं पवार कुटुंबाला पत्र
Shiv Sena Hearing Special Report : राहुल नार्वेकरांच्या निर्णयावर आक्षेप, ठाकरेंच्या नेत्यांचा हल्लाबोल
Shiv Sena Hearing : तर धनुष्यबाण चिन्ह गोठवा, ठाकरेंची मागणी | Special Report ABP Majha
Vidit Gujrathi Arjuna Award : अर्जुन पुरस्कार जाहीर झाल्यानंतर बुद्धिबळपटू विदित गुजरातीची 'माझा'वर मुलाखत
Sanjay Raut Mumbai PC : विधानसभेचे अध्यक्ष बौद्धिक नक्षलवादी, संजय राऊतांचा हल्लाबोल

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Mobile Recharge Price Hike : मोबाईल रिचार्ज पुन्हा महागणार! जिओ आणि एअरटेलच्या ग्राहकांना धक्का बसण्याची शक्यता
मोबाईल रिचार्ज पुन्हा महागणार! जिओ आणि एअरटेलच्या ग्राहकांना धक्का बसण्याची शक्यता
Ravindra Jadeja : 'या' नको असलेल्या रेकॉर्डसह रवींद्र जडेजा निवृत्त, कधीच हा सोपा टप्पा गाठू शकला नाही
'या' नको असलेल्या रेकॉर्डसह रवींद्र जडेजा निवृत्त, कधीच हा सोपा टप्पा गाठू शकला नाही
Dharashiv School : म्हशीच्या गोठ्यात मुलांचं अन्न अन् दुर्गंधीचं साम्राज्य; धाराशिवमधील दिव्यांग निवासी शाळेचे विदारक वास्तव उघड
म्हशीच्या गोठ्यात मुलांचं अन्न अन् दुर्गंधीचं साम्राज्य; धाराशिवमधील दिव्यांग निवासी शाळेचे विदारक वास्तव उघड
तीन तासांचे प्रयत्न, दोन जेसीबींचे खोदकाम; बोअरवेलमध्ये पडलेला अदनान बाहेर येताच ग्रामस्थांचा जल्लोष
तीन तासांचे प्रयत्न, दोन जेसीबींचे खोदकाम; बोअरवेलमध्ये पडलेला अदनान बाहेर येताच ग्रामस्थांचा जल्लोष
Junnar Pimpalwandi Case: सायकल शिकवण्याच्या बहाण्याने पिंपळवंडीत 9 वर्षांच्या चिमुरडीवर अत्याचार, नराधमाला 13 दिवसांची पोलीस कोठडी
सायकल शिकवण्याच्या बहाण्याने पिंपळवंडीत 9 वर्षांच्या चिमुरडीवर अत्याचार, नराधमाला 13 दिवसांची पोलीस कोठडी
Ind vs Pak Hockey: जय हो... 'वर्ल्ड कप' सामन्यात भारताने पाकिस्तानला धूळ चारली, 16 वर्षानंतर आमने-सामने; पाकिस्तान स्पर्धेतून बाहेर
जय हो... 'वर्ल्ड कप' सामन्यात भारताने पाकिस्तानला धूळ चारली, 16 वर्षानंतर आमने-सामने; पाकिस्तान स्पर्धेतून बाहेर
5000 कोटींचा जमीन घोटाळा, अखेर वर्षभरानंतर बिवलकरांविरुद्ध FIR; रोहित पवारांचा आता संजय शिरसाटांकडे मोर्चा
5000 कोटींचा जमीन घोटाळा, अखेर वर्षभरानंतर बिवलकरांविरुद्ध FIR; रोहित पवारांचा आता संजय शिरसाटांकडे मोर्चा
थलापती विजय मुख्यमंत्री होताच पहिल्यांदाच टीकेच्या रडारवर; घेतलेला निर्णय अवघ्या काही तासात मागे घेण्याची पाळी, नेमकं घडलं तरी काय?
थलापती विजय मुख्यमंत्री होताच पहिल्यांदाच टीकेच्या रडारवर; घेतलेला निर्णय अवघ्या काही तासात मागे घेण्याची पाळी, नेमकं घडलं तरी काय?
Embed widget