एक्स्प्लोर

संतोष देशमुख प्रकरणाचा तपास थांबवलाय, गृह खात्याने थांबवला की अन्य कोणी थांबवला हे बघितलं पाहिजे; खासदार बजरंग सोनवणेंची मागणी

मनोज जरांगे पाटलांना जीवे मारण्याच्या कटात धनंजय मुंडे यांना सहआरोपी करावे का? या प्रश्नाच्या उत्तरात खासदार बजरंग सोनवणे बोलले आहेत.

Bajrang sonawane: गेल्या वर्षभरात बीडचं नाव सातत्याने नकारात्मक घटनांमुळे लक्षात राहिलेय. सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरण, औष्णिक वीज केंद्राच्या राखेचे खेळ, दिवसाढवळ्या होणाऱ्या हाणामारीच्या घटना चर्चेत आहे. आता स्थानिक स्वराज्य निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर बीडचं राजकारण पुन्हा तापण्याची शक्यताय. आज सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येला एक वर्ष पूर्ण झालंय.  खासदार बजरंग सोनवणे यांनी संतोष देशमुख प्रकरणावर बोलत धनंजय मुंडेंच्या या प्रकरणातील सहभागावर पुन्हा प्रश्नचिन्ह उपस्थित केलंय . मनोज जरांगे पाटलांना जिवे मारण्याच्या कटात धनंजय मुंडे यांना सहआरोपी करावे का? यावरही त्यांनी उत्तर दिलंय. या प्रकरणात अजितदादा, धनंजय मुंडे यांच्या मागे आहेत की मुख्यमंत्री आहेत, हे बघितलं पाहिजे. त्यांना येणारे फोन हे लोकांच्या समस्या असल्यावर येतात की टोळीच्या समस्या असल्यावर येतात हे बघितलं पाहिजे. लोकांनी किती प्रेम केलं आहे हे नगरपालिका निवडणुकीत कळेलच, असंही ते म्हणाले.

गेल्या काही दिवसांपासून राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे आमदार धनंजय मुंडे आणि राष्ट्रवादी शरद पवार गटाचे खासदार बजरंग सोनवणे यांच्यात शाब्दिक चकमकी होताना दिसतायत. काही दिवसांपूर्वीच आमदार धनंजय मुंडे यांनी खासदाराचे काम आहे तुतारी वाजवणे, ते वाजवत आहेत.  त्यांचे पोट दुखत आहे असं म्हणत बजरंग सोनवणेंवर टीका केली होती. 

काय म्हणाले बजरंग सोनवणे ?

गेल्या वर्षभरापासून बीडमध्ये संतोष देशमुख प्रकरणावरून खळबळ उडाली असताना वर्षभरानंतर या घटनेकडे कसं पाहता विचारल्यानंतर बजरंग सोनवणे म्हणाले," पहिल्यांदा मी संतोष देशमुख यांना श्रद्धांजली अर्पण करतो. त्यांना जाऊन एक वर्ष झालं असं आम्हाला वाटत नाहीये.ही घटना कालचीच ताजी आहे असं वाटतंय.  धनंजय देशमुख अजूनही पाहिल्यानंतर, धीर दिल्यानंतर रडतोय. त्याच्या मुलीला धीर द्यायला तर मी जाऊच शकत नाही. मी धनंजयला तेच सांगत होतो की आता आपण सावरलं पाहिजे. तू स्वतःला सावर, घराला आधार दे. अजूनही डोळ्यासमोर तो व्हिडिओ दिसतो. त्याला अन्नाचा कण जात नाही. या संवेदना आहेत. जो संवेदनशील माणूस आहे.त्याच्या हृदयाला या घटनेमुळे निश्चितच पीळ पडला असेल. इतिहासामध्ये एवढी क्रूर घटना घडली नसेल ती बीड जिल्ह्यात घडली आहे. जनहि हत्या केली त्या नराधमाला फाशी झाल्याशिवाय आम्हाला चैन पडणार नाही. या प्रकरणावर समाधान हा विषयच नाही. ही हत्या करणाऱ्याच्या मागं पडद्यामागं जे कोणी आहेत त्या सर्वांना शिक्षा झाली पाहिजे.

याप्रकरणी सुरेश धस या सत्तेमधल्या आमदाराने आमची एवढी थांब बाजू लावून धरली. याबद्दल त्यांचे कौतुक आहे. पण शेवटी ते सत्तेतील आहेत त्यांच्यावरही काही बंधन असतील ,मला माहित नाही . त्यांचं समाधान झालं असेल पण माझं झालेलं नाही. मी समाधानी नाही . माझं म्हणणं आहे की तुम्ही मोकळ्या वातावरणात एकदा तपास करा. शेवटच्या टोकापर्यंत जा . एका साध्या माणसाला दगड मारला डोकं फोडलं त्यालाच पळून जायला साथ दिली. एवढं सगळं झालं किती माणसांनी पळून जायला साथ दिली? त्या लोकांचं काय केलं तुम्ही? त्यांना नोटीशी तरी पाठवल्या का ? ते सगळे सोडून दिले. 

दुसरीकडे मनोज जरांगे पाटील यांना जीवे मारण्याच्या कटात धनंजय मुंडे यांना सहआरोपी करावे अशी मागणी जरांगे यांनी केल्यानंतर खासदार बजरंग सोनवणे म्हणाले,"कोणी सहमती दर्शवली कोणी मागणी केली हे बोलायचे वेळच का यावी? हे वेळेतच शासनाने करायला हवं. या प्रकरणात कोण कोण दोषी आहे त्यांच्यावर कारवाई झालीच पाहिजे हीच आमची मागणी आहे.जर तुम्ही तपासाच थांबवत असाल तर अवघड आहे. एसआयटी, सीआयडी यांचा तपास सुरू असतानाही तपासावर एक कॅप टाकली आहे. ही कॅप  काढा आणि खुलेआम तपास करा. असंही ते म्हणालेत.

गेल्या काही दिवसांपासून राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार धनंजय मुंडे आणि मराठा आंदोलन मनोज जरांगे पाटील यांचा वादही रंगलाय.  मनोज जरांगे पाटलांना जीवे मारण्याच्या कटात धनंजय मुंडे यांना सहआरोपी करावे का? या प्रश्नाच्या उत्तरात खासदार बजरंग सोनवणे बोलले आहेत.  सरपंच संतोष देशमुख प्रकरणाचा तपास खोलात जाऊन करा. तपासाला कॅप टाकली आहे ती कॅप काढा.

महत्त्वाच्या बातम्या

शिंदे-फडणवीसांनी चूक सुधारावी, अन्यथा कधी न बघितलेले दिवस बघावे लागतील; मनोज जरांगे पुन्हा भडकले
शिंदे-फडणवीसांनी चूक सुधारावी, अन्यथा कधी न बघितलेले दिवस बघावे लागतील; मनोज जरांगे पुन्हा भडकले
Gatari Amavasya News : 'जास्त गटार-बिटारात लोळू नका'; गटारीच्या शुभेच्छा देत शिंदेंच्या मंत्र्यांचा कार्यकर्त्यांना अजब सल्ला
'जास्त गटार-बिटारात लोळू नका'; गटारीच्या शुभेच्छा देत शिंदेंच्या मंत्र्यांचा कार्यकर्त्यांना अजब सल्ला
बावनकुळेंना टार्गेट करणं योग्य नाही, कोणाचंही प्रमाणपत्र रद्द केलेलं नाही, जरांगे पाटलांच्या टिकेनंतर मुख्यमंत्र्यांचं मोठं वक्तव्य
बावनकुळेंना टार्गेट करणं योग्य नाही, कोणाचंही प्रमाणपत्र रद्द केलेलं नाही, जरांगे पाटलांच्या टिकेनंतर मुख्यमंत्र्यांचं मोठं वक्तव्य
न्यायालय एकनाथ शिंदेंच्याच बाजूने निर्णय देणार, धनुष्यबाण पेलण्याची ताकद फक्त शिंदेंसाहेबांमध्येच, बच्चू कडूंचा दावा
न्यायालय एकनाथ शिंदेंच्याच बाजूने निर्णय देणार, धनुष्यबाण पेलण्याची ताकद फक्त शिंदेंसाहेबांमध्येच, बच्चू कडूंचा दावा

व्हिडीओ

Manoj Jarange Mumbai Protest : मनोज जरांगेंची पुन्हा मुंबईकडे कूच? भगवं वादळ मुंबईत घडकणार?
Rahul Gandhi Amit Shah Special Report : संसदेच्या अधिवेशनात विद्यार्थ्यांच्या मुद्यावरुन घमासान
Manoj Jarange Patil Defender Car : 2 कोटींची आलिशान डिफेंडर गाडी कोणाची? मनोज जरांगे काय म्हणाले...
Manoj Jarange Patil Sangli : मराठा आमदार-खासदारांचे फोन; गुपचूप पाठिंबा असल्याचा जरांगेंचा दावा
Manoj Jarange On Maratha Protest: मराठा समाजाचा पुन्हा एकदा मुंबईकडे कूच करण्याचा विचार; मनोज जरांगे काय काय म्हणाले?

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Dombivli Shastrinagar Hospital : पालकांची परवानगी न घेता 17 वर्षीय मुलीच्या गर्भधारणा तपासणीवरून गोंधळ; पालिका रुग्णालयात तीन वेळा रिपोर्ट पॉझिटिव्ह तर खासगीत निगेटिव्ह!
पालकांची परवानगी न घेता 17 वर्षीय मुलीच्या गर्भधारणा तपासणीवरून गोंधळ; पालिका रुग्णालयात तीन वेळा रिपोर्ट पॉझिटिव्ह तर खासगीत निगेटिव्ह!
शासकीय वाहनांसाठी VIP नंबर घेण्यावर अखेर बंदी; अर्थ खात्याचा आदेश जारी, मुख्यमंत्र्यांनी अधिकाऱ्यांचे कान टोचले
शासकीय वाहनांसाठी VIP नंबर घेण्यावर अखेर बंदी; अर्थ खात्याचा आदेश जारी, मुख्यमंत्र्यांनी अधिकाऱ्यांचे कान टोचले
Navi Mumbbai : 15 लाखांची लाच मागितली, आठ लाख स्वीकारले; GST उपायुक्तावर गुन्हा दाखल
15 लाखांची लाच मागितली, आठ लाख स्वीकारले; GST उपायुक्तावर गुन्हा दाखल
Gatari Amavasya News : 'जास्त गटार-बिटारात लोळू नका'; गटारीच्या शुभेच्छा देत शिंदेंच्या मंत्र्यांचा कार्यकर्त्यांना अजब सल्ला
'जास्त गटार-बिटारात लोळू नका'; गटारीच्या शुभेच्छा देत शिंदेंच्या मंत्र्यांचा कार्यकर्त्यांना अजब सल्ला
तब्बल 98 लाख रुपयांच्या बनावट नोटांचा साठा जप्त; एकाला अटक, 30 लाखांच्या बदल्यात 1 कोटींचा भाव
तब्बल 98 लाख रुपयांच्या बनावट नोटांचा साठा जप्त; एकाला अटक, 30 लाखांच्या बदल्यात 1 कोटींचा भाव
Bharat Gogawale : रायगडच्या पालकमंत्रिपदी भरत गोगावलेंची बाजी? आजच नाव जाहीर होणार, गोगावलेंचा मोठा दावा
रायगडच्या पालकमंत्रिपदी भरत गोगावलेंची बाजी? आजच नाव जाहीर होणार, गोगावलेंचा मोठा दावा
तुकाराम मुंढेंचा मोर्चा बस स्थानकांकडे; संभाजीनगर जिल्ह्यात FDA ची कारवाई, सिल्लोडमधील कँटीन सील
तुकाराम मुंढेंचा मोर्चा बस स्थानकांकडे; संभाजीनगर जिल्ह्यात FDA ची कारवाई, सिल्लोडमधील कँटीन सील
पायलट नशेत होता, एअर इंडियाच्या दिल्ली-फुकेट विमानातील कॅप्टन इन कमांडची दुसरी डोप टेस्टही पॉझिटीव्ह
पायलट नशेत होता, एअर इंडियाच्या दिल्ली-फुकेट विमानातील कॅप्टन इन कमांडची दुसरी डोप टेस्टही पॉझिटीव्ह
Embed widget