एक्स्प्लोर

BLOG | बनावट लशीची भीती?

फ्रान्स येथे मुख्यालय असलेल्या इंटरपोल या संस्थेनं सर्व देशांनी सतर्क राहण्याचा इशारा दिला आहे. या दृष्टीने ऑनलाईन प्लॅटफॉर्मवर लक्ष ठेवावे अशा सूचना देण्यात आल्या आहेत.

जगभरात एका बाजूला कोरोना या संसर्गजन्य आजार विरोधातील लस सर्वसामान्यांच्या वापरात आली आहे म्हणून लोकांना आशेचा किरण दिसत आहे. तर दुसऱ्या बाजूला या लशीला जगभरातून असणारी मागणी लक्षात घेता जगभरातील देशांनी बनावट लसीपासून सावध राहण्याचा इशारा इंटरपोल या आंतरराष्ट्रीय संस्थेने 194 देशांना दिला आहे.अलीकडच्या काळात या लस निर्मिती करत असलेल्या अनेक औषध कंपन्यांनी लस शेवटच्या टप्प्यात किंवा तयार असल्याचे दावे करण्यात आले आहे. विशेष म्हणजे इंग्लंड देशात या लसीकरणाची सुरुवात येणार आहे ही बातमी जाहीर झाली आणि जगभर त्याची चर्चा सुरु झाली. या जीवघेण्या आजारांपासून वाचण्यासाठी प्रत्येक देश आज ही लस मिळविण्याकरिता स्पर्धा करीत आहे. मागणी मोठ्या प्रमाणात आहे आणि पुरवठादार त्या तुलनेने कमी आहेत. अनेक देश ही लस मिळविण्याकरिता अन्य देशांवर अवलंबून आहे. या अशा आरोग्यच्या आणीबाणीच्या काळात संघटित गुन्हेगारी करणारी मंडळी सक्रिय होऊन ते बनावट किंवा काळाबाजार करून लस बाजारात आणण्याची शक्यता नाकारता येत नाही. या पार्श्वभूमीवर फ्रान्स येथे मुख्यालय असलेल्या इंटरपोल या संस्थेनं सर्व देशांनी सतर्क राहण्याचा इशारा दिला आहे. या दृष्टीने ऑनलाईन प्लॅटफॉर्मवर लक्ष ठेवावे अशा सूचना देण्यात आल्या आहेत.

सगळयांना प्रश्न पडला असेल अजून परिणामकारक लस बाजारात पोहचयाच्या आधीच इंटरपोलने या सूचना का दिल्या असतील. तर त्याला कारणही तसेच आहे या कोरोनाच्या संसर्गात जगातील 200 पेक्षा जास्त देश बाधित झाले आहे. अनेक देशात लाखो नागरिक या आजराने बाधित झाले असून हजारो नागरिकांचे बळी गेलेलं आहेत. या आजराला रोखण्याकरिता सध्या तरी कोणताही जालीम उपाय कुणाकडे नाही. एखादा जण आजरी झाला तर त्यावर उपचार करण्याकरिता औषध उपचारपद्धती आहे. मात्र हा आजाराचं होऊ नये या करिता सध्या तरी कोणती उपचारपदातही अस्तित्वात नाही. सध्या सगळ्यांचीच मदार ही लशीवर आहे. चार पाच कंपन्यांनी त्याची लस 90-95% परिणामकारक असल्याचा दावा केला आहे. पाश्चिमात्य देशात कोरोनाची दुसरी लाट आली आहे मोठ्या प्रमाणात नागरिक या आजाराने बाधित होत आहे. प्रत्येक देश ही लस किती लवकर आपल्याला मिळेल यासाठी प्रयत्न करीत आहेत. त्यामुळे ह्या लस मिळविण्याच्या स्पर्धेत काही अनुचित प्रकार घडू नये यासाठी इंटरपोलने हा इशारा दिला आहे.

याप्रकरणी मुंबई शहराच्या कोरोना मृत्यू विश्लेषण समितीचे अध्यक्ष डॉ अविनाश सुपे सांगतात, की, " नक्कीच इंटरपोलने दिलेला हा इशारा गांभीर्याने घेणे गरजेचे आहे. कारण लशीला सध्या मोठ्या प्रमाणात मागणी आहे, त्यामुळे यामध्ये काळाबाजार किंवा बनावट लस निर्माण केल्याची शक्यता येत नाही. सुरवातीच्या काळात रेमेडिसवीर औषधाच्या बाबतीत घडलं हे आपण सगळ्यांनीच पहिल आहे. त्याकाळात या औषधाच्या काळाबाजाराच्या बातम्या सगळ्यांनीच पाहायला आहेत. त्यामुळे लसीचे अचूक नियोजनाची जबाबदारी सरकारची आहे. लसीकरणाच्या काळात मोठ्या प्रमाणावर व्यवस्थापन करावे लागणार आहे. आपला पोलिओ लसीकरणासाठी जेवढे नियोजन केले होते त्याच धर्तीवर याचे नियोजन करावे लागणार आहे. सरकरची मोठी यंत्रणा याकामासाठी वापरावी लागणार आहे. याप्रकरणी जनजागृती घडवून आणावी लागणार आहे. नागरिकांनी सुद्धा सरकारच्या व्यतिरिक्त किंवा नेमून व्यतिरिक्त कुणा कडूनही लस घेऊ नये. या सगळ्या विश्वासहर्ता फार महत्त्वाची आहे." इंग्लंडच्या लसीकरणाची बातमी येताच रशियाचे अध्यक्ष व्लादिमीर पुतिन यांनीही त्यांच्या देशात पुढील आठवड्यात लसीकरणास सुरवात केली जाणार असल्याचे जाहीर केले आहे. त्यामुळे लवकरच येत्या काळात आता हळू हळू काही देशात अशा पद्धतीच्या लसीकरणाचे कार्यक्रम हाती घेतली आहे. या सगळ्या प्रकारात अमेरिका देशात मोठ्या प्रमाणात नवीन रुग्ण निर्माण होत आहे. दिवसागणिक हजारो नागरिकांचा या आजाराने त्या देशात बळी जात आहे. त्याच देशात मॉडर्ना कंपनीचे लस अंतिम टप्प्यात आहे. त्यामुळे आता अनेक देशात लसीकरणासाठी स्पर्धा सुरु होण्याची शक्यता नाकारता येत नाही. भारतातही जानेवारीच्या पहिल्या आठवड्यात लस उपलब्ध होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

ऑगस्ट 11 ला, ' लस आली रे ... पण ! ' या शीर्षकाखाली सविस्तर लिखाण करण्यात आले होते. त्यामध्ये, रशियाने पहिल्यांदा लस तयार झाल्याचा दावा केला होता. मात्र त्यावेळी या लशीबाबत तज्ञांकडून विविध मतांतरे व्यक्त केली होती. त्यात, गेली अनके महिने जगाच्या पाठीवर एकच चर्चा सुरु होती ती म्हणजे कोरोनाविरोधात लस बाजारात कधी येणार? अनेक देश या कामांमध्ये जुंपले होते काही जण मानवी चाचण्यांच्या शेवटच्या टप्प्यात असल्याचे दावे करत होते. जणू काही जगामध्ये ही लस काढण्यावरून एक मोठी स्पर्धा सुरु झाली होती. त्यात आपला भारत देशही मागे नव्हता. मात्र या संसर्गजन्य आजारावरील कोरोनाविरोधात लस निर्माण करताना सगळे नियम पाळावेत अशी ओरड जगातील सगळ्याच तज्ज्ञाकडून होत आहे. लस निर्माण करण्याची एक शास्त्रीय पद्धत असते, अनेक कंपन्यांना एक लस बनविण्याकरिता खूप वर्ष खर्ची करावी लागत असल्याचा इतिहास आहे. या अशा परिस्थितीत काही महिन्यातच रशिया देशाने कोरोनाविरोधातील लस निर्माण केल्याचा दावा केला असून विशेष म्हणजे या देशाचे अध्यक्ष व्लादिमीर पुतिन यांच्या मुलीने ही लस टोचून घेतल्याचे जाहीर करण्यात आले आहे. मात्र लस निर्माण होण्याचा आनंद व्यक्त होत असतानाच या लशींची उपयुक्तता किती आहे ती बघूनच त्याचे अंदाज बांधणे योग्य ठरणार असल्याचे मत आपल्या देशातील वैद्यकीय तज्ञांनी व्यक्त केले आहे.

लशीच्या उपलबद्धतेबाबत ' मागणी तसा पुरवठा' हे सूत्र अंगी करण्यासाठी फार मोठा काळ जावा लागणार आहे. कारण सर्वच नागरिक ह्या लसीच्या प्रतीक्षेत आहेत. ती लस देण्यासाठी प्रत्येक देशाला एक प्राधान्यक्रम ठरवावा लागणार आहे. त्या नियोजनानुसार त्या लशीचे वाटप करावे लागणार आहे. जर नियोजनात कुठेही ढिलाई आढळल्यास मोठा गोंधळ उडण्याची शक्यता नाकारता येत नाही. विशेष म्हणजे या काळात लुटारू लोकांचा सुळसुळाट होऊ शकतो. कुणी लस उपलब्ध करून देण्याचे खोटे अमिश देऊ शकतो, तर कुणी बनवत लस विकू शकतो असे विविध अनॆतिक मार्गाने आळस देणाऱ्याचे आगामी काळात पेव फुटू शकते. त्यामुळे नागरिकांनी सावधान राहणे गरजेचे आहे. याकरिता इंटरपोलने जगातील सर्व देशांना इशारा देऊन ठेवलेलाच आहे. त्यात नागरिकांनी सुद्धा सतर्क राहणे गरजेचे आहे, कुठल्याही लशीच्या उपलब्धतेच्या ऑनलाईन भुलथापांना बळी पडता कामा नये. कुठेही संशायास्पद गोष्ट आढळून आल्यास पोलिसांना संपर्क करावा. लस उपलब्ध झाल्यावर ती सगळ्यांनाच टप्प्या-टप्प्याने दिली जाणार आहे.

संतोष आंधळे यांचे आणखी काही महत्वाचे ब्लॉग 

अधिक पाहा..

ओपिनियन

Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Kash Patel : तर कोणत्याही ग्रहावर असला, तरी आम्ही शोधून काढून 'शिकार' करु! एफबीआय संचालक होताच काश पटेलांचा नेमका इशारा कोणाला?
तर कोणत्याही ग्रहावर असला, तरी आम्ही शोधून काढून 'शिकार' करु! एफबीआय संचालक होताच काश पटेलांचा नेमका इशारा कोणाला?
PHOTO: बॉलीवूडचा संगीतकार थेट योगी आदित्यनाथांना भिडला, म्हणाला, 'हिंमत असेल तर गंगेतील पाण्याचा एक घोट पिऊन दाखवा'
बॉलीवूडचा संगीतकार थेट योगी आदित्यनाथांना भिडला, म्हणाला, 'हिंमत असेल तर गंगेतील पाण्याचा एक घोट पिऊन दाखवा'
Sharad Pawar : वाजपेयींचं सरकार एक मताने पाडलं, ते एक मत कसं मिळवलं, शरद पवारांनी पहिल्यांदाच किस्सा सांगितला!
वाजपेयींचं सरकार एक मताने पाडलं, ते एक मत कसं मिळवलं, शरद पवारांनी पहिल्यांदाच किस्सा सांगितला!
Eknath Shinde Death Threat: एकनाथ शिंदेंना जीवे मारण्याची धमकी, पोलिसांनी तपासाची चक्र फिरवली, मामा भाच्याच्या जोडीला अटक
एकनाथ शिंदेंना जीवे मारण्याची धमकी, पोलिसांनी तपासाची चक्र फिरवली, मामा भाच्याच्या जोडीला अटक
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

ABP Majha Marathi News Headlines 11 AM TOP Headlines 11 AM 21 February 2025Ideas of India 2025 : एबीपी नेटवर्कचे मुख्य संपादक Atideb Sarkar यांचं भाषणABP Majha Marathi News Headlines 10 AM TOP Headlines 10 AM 21 February 2025Jalna CIDCO Project News | जालन्यातील चौकशीचे आदेश दिलेल्या सिडकोचा प्रकल्प नेमका आहे तरी काय?

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Kash Patel : तर कोणत्याही ग्रहावर असला, तरी आम्ही शोधून काढून 'शिकार' करु! एफबीआय संचालक होताच काश पटेलांचा नेमका इशारा कोणाला?
तर कोणत्याही ग्रहावर असला, तरी आम्ही शोधून काढून 'शिकार' करु! एफबीआय संचालक होताच काश पटेलांचा नेमका इशारा कोणाला?
PHOTO: बॉलीवूडचा संगीतकार थेट योगी आदित्यनाथांना भिडला, म्हणाला, 'हिंमत असेल तर गंगेतील पाण्याचा एक घोट पिऊन दाखवा'
बॉलीवूडचा संगीतकार थेट योगी आदित्यनाथांना भिडला, म्हणाला, 'हिंमत असेल तर गंगेतील पाण्याचा एक घोट पिऊन दाखवा'
Sharad Pawar : वाजपेयींचं सरकार एक मताने पाडलं, ते एक मत कसं मिळवलं, शरद पवारांनी पहिल्यांदाच किस्सा सांगितला!
वाजपेयींचं सरकार एक मताने पाडलं, ते एक मत कसं मिळवलं, शरद पवारांनी पहिल्यांदाच किस्सा सांगितला!
Eknath Shinde Death Threat: एकनाथ शिंदेंना जीवे मारण्याची धमकी, पोलिसांनी तपासाची चक्र फिरवली, मामा भाच्याच्या जोडीला अटक
एकनाथ शिंदेंना जीवे मारण्याची धमकी, पोलिसांनी तपासाची चक्र फिरवली, मामा भाच्याच्या जोडीला अटक
Satara News : साताऱ्यात माजी नगराध्यक्षांच्या मुलानेच दिली खुनाची सुपारी; इचलकरंजीमधील जर्मनी गँगच्या सातारा पोलिसांना मुसक्या आवळल्या, खुनाचा कट उधळला
साताऱ्यात माजी नगराध्यक्षांच्या मुलानेच दिली खुनाची सुपारी; इचलकरंजीमधील जर्मनी गँगच्या सातारा पोलिसांना मुसक्या आवळल्या, खुनाचा कट उधळला
अमेझॉनचे मालक जेफ बेजोस यांच्या घटस्फोटित पत्नीकडून 164550 कोटींचं दान, मॅकेंझी स्कॉटकडे किती संपत्ती राहिली?
अमेझॉनच्या मालकाच्या घटस्फोटित पत्नीकडून दीड लाख कोटींचं दान, मॅकेंझी स्कॉटकडे इतकी संपत्ती शिल्लक
Sanjay Raut : अजित पवार सोडा, फडणवीसांनीच मुंडे, कोकाटेंचा राजीनामा घ्यावा; संजय राऊत कडाडले, सुरेश धसांनाही डिवचलं
अजित पवार सोडा, फडणवीसांनीच मुंडे, कोकाटेंचा राजीनामा घ्यावा; संजय राऊत कडाडले, सुरेश धसांनाही डिवचलं
अल्पसंख्याक शैक्षणिक संस्थांना फडणवीस सरकारचा दणका, नव्याने अर्ज सादर करण्याचे आदेश, नेमकं कारण काय?
अल्पसंख्याक शैक्षणिक संस्थांना फडणवीस सरकारचा दणका, नव्याने अर्ज सादर करण्याचे आदेश, नेमकं कारण काय?
Embed widget