एक्स्प्लोर

मोठी बातमी! 8 फेब्रुवारीची परीक्षा रद्द, शिष्यवृत्ती परीक्षेची नवी तारीख जाहीर; राज्य परीक्षा परिषदेचा निर्णय

केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळ (सीबीएसई) तर्फे केंद्रीय शिक्षक पात्रता परीक्षा (सीटीईटी) देखील 8 फेब्रुवारी 2026 रोजी आयोजित करण्यात आलेली आहे.

मुंबई : महाराष्ट्र राज्य परीक्षा (Exam) परिषद, पुणे यांच्यामार्फत घेण्यात येणाऱ्या पूर्व उच्च प्राथमिक (इयत्ता 5 वी) व पूर्व माध्यमिक (इयत्ता 8 वी) शिष्यवृत्ती परीक्षा 2026 च्या तारखेत बदल करण्यात आला आहे. आता ही परीक्षा 8 फेब्रुवारी 2026 ऐवजी 22 फेब्रुवारी 2026 रोजी राज्यभर एकाच दिवशी घेण्यात येणार आहे. त्यामुळे, शिष्यवृत्ती (Scholarship) परीक्षा देणाऱ्या विद्यार्थ्यांच्या पालकांनी नव्या वेळापत्रकानुसार आपल्या पाल्यांसाठी परीक्षाचे नियोजन करणे गरजेचे आहे. 

केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळ (सीबीएसई) तर्फे केंद्रीय शिक्षक पात्रता परीक्षा (सीटीईटी) देखील 8 फेब्रुवारी 2026 रोजी आयोजित करण्यात आलेली आहे. राज्यातील अनेक प्राथमिक व माध्यमिक शिक्षक सीटीईटी परीक्षेला बसणार असल्याने त्यांच्याकडून शिष्यवृत्ती परीक्षेची तारीख बदलण्याची मागणी करण्यात आली होती. त्या पार्श्वभूमीवर परिषदेने शिष्यवृत्ती परीक्षेचा दिवस बदलत नवीन तारीख 22 फेब्रुवारी 2026 जाहीर केली आहे. सर्व संबंधित विद्यार्थ्यांनी, पालकांनी, शाळांनी व परीक्षा केंद्रांनी या बदलाची नोंद घ्यावी, असे आवाहन महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेच्या आयुक्त अनुराधा ओक यांनी केले आहे.

शिष्यवृत्ती परीक्षा काय असते?

महाराष्ट्र राज्य शिक्षण विभागामार्फत शिष्यवृत्ती परीक्षा घेण्यात येते. शिष्यवृत्ती परीक्षा म्हणजे विद्यार्थ्यांसाठी आर्थिक मदत मिळवण्याची एक स्पर्धाच. ज्या विविध स्तरांवर घेतल्या जातात. या परीक्षांच्या आधारे विद्यार्थ्यांना पुढील शिक्षणासाठी किंवा इतर गरजांसाठी आर्थिक मदत मिळते. महाराष्ट्रात, राज्य शिक्षण विभागातर्फे चौथी आणि आठवीच्या विद्यार्थ्यांसाठी शिष्यवृत्ती परीक्षा घेतल्या जातात, तर राष्ट्रीय स्तरावर राष्ट्रीय शिष्यवृत्ती परीक्षा (NICE) आणि इतर अनेक राष्ट्रीय योजनांद्वारे शिष्यवृत्ती दिल्या जातात. 

हेही वाचा

भाजप उमेदवारांना निवडून द्या, तुमचा 'तो' प्रश्न मार्गी लावतो; बावनकुळेचं फोनवरुन लोणावळ्यात आश्वासन

एबीपी माझा वृत्तवाहिनीमध्ये मागील 7 वर्षांपासून कार्यरत
Read More
आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

Mumbai News : फक्त फ्लॅटच्या भाड्यासाठी तब्बल 18 कोटींचा करार! मुंबईच्या रिअल इस्टेटमध्ये पुन्हा चकित करणारा व्यवहार; घर खरेदीपेक्षा भाड्याचा खर्चच अधिक चर्चेत
फक्त फ्लॅटच्या भाड्यासाठी तब्बल 18 कोटींचा करार! मुंबईच्या रिअल इस्टेटमध्ये पुन्हा चकित करणारा व्यवहार; घर खरेदीपेक्षा भाड्याचा खर्चच अधिक चर्चेत
Ramdas Athawale: आठवले कुठेही जाणार नाहीत, ते दगा करत नाहीत याचा अर्थ मला गृहीत धरावे असा नाही; रामदास आठवलेंचा निर्वाणीचा इशारा
आठवले कुठेही जाणार नाहीत, ते दगा करत नाहीत याचा अर्थ मला गृहीत धरावे असा नाही; रामदास आठवलेंचा निर्वाणीचा इशारा
Tukaram Mundhe News: 21 वर्षांत 25 वी बदली, तुकाराम मुंढेंच्या 4 शब्दांनी धाबे दणाणले, राज्यभर FDA ची 40 ठिकाणी छापेमारी
21 वर्षांत 25 वी बदली, तुकाराम मुंढेंच्या 4 शब्दांनी धाबे दणाणले, राज्यभर FDA ची 40 ठिकाणी छापेमारी
BJP Shivsena NCP Mahayuti Candidate List Vidhan Parishad Election 2026: शिवसेनेपासून भाजप, राष्ट्रवादी काँग्रेसपर्यंत...; विधान परिषदेच्या 17 पैकी 17 उमेदवारांची यादी, एका क्लिकवर
शिवसेनेपासून भाजप, राष्ट्रवादी काँग्रेसपर्यंत...; विधान परिषदेच्या 17 पैकी 17 उमेदवारांची यादी, एका क्लिकवर

व्हिडीओ

Shiv Sena Merger Talks : दोन्ही शिवसेना पुन्हा एकत्र येणार? चर्चांना नवं इंधन | ABP Majha
Vidhan Parishad Election 2026 : अर्जाच्या शेवटच्या दिवशी बंडखोरीचा स्फोट, महायुती-मविआत धुसफूस! | ABP Majha
LPG Price Hike Impact : सिलेंडर दरवाढीचा फटका! वडापाव-मिसळ ते तांबडा रस्सा महागणार? | ABP Majha
Pune Vidhan Parishad : काकडेंच्या एन्ट्रीने टिंगरेंना धक्का? NCP तील नाराजीनाट्य | Special Report
Abdul Sattar on Shiv Sena Merger : दोन्ही शिवसेना एकत्र आल्या पाहिजे; शिंदेंचा आमदार खूप काही बोलला

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Vikram Kakade Pune Vidhan Parishad Election 2026: सुनील टिंगरेंना डावलले, पुण्यात विक्रम काकडेंना उमेदवारी कशी मिळाली?, पडद्यामागील राजकारण
सुनील टिंगरेंना डावलले, पुण्यात विक्रम काकडेंना उमेदवारी कशी मिळाली?, पडद्यामागील राजकारण
Vidhan Parishad Election 2026: 'पक्षाने शब्द पाळला नाही!' परिचारक समर्थकांचा भाजपवर तीव्र संताप; स्वतः प्रशांत परिचारकांकडून मात्र 'सबुरी'चा सल्ला, सोलापूर विधान परिषद उमेदवारीवरून खदखद
'पक्षाने शब्द पाळला नाही!' परिचारक समर्थकांचा भाजपवर तीव्र संताप; स्वतः प्रशांत परिचारकांकडून मात्र 'सबुरी'चा सल्ला, सोलापूर विधान परिषद उमेदवारीवरून खदखद
Tukaram Mundhe FDA: तुकाराम मुंढेनी एफडीएचा चार्ज घेताच भेसळखोरांवर आभाळ कोसळलं; दोन दिवसांत आणखी 40 छापे, पुणे आणि कोकणात मोठी कारवाई
तुकाराम मुंढेनी एफडीएचा चार्ज घेताच भेसळखोरांवर आभाळ कोसळलं; दोन दिवसांत आणखी 40 छापे, पुणे आणि कोकणात मोठी कारवाई
Ramdas Athawale: आठवले कुठेही जाणार नाहीत, ते दगा करत नाहीत याचा अर्थ मला गृहीत धरावे असा नाही; रामदास आठवलेंचा निर्वाणीचा इशारा
आठवले कुठेही जाणार नाहीत, ते दगा करत नाहीत याचा अर्थ मला गृहीत धरावे असा नाही; रामदास आठवलेंचा निर्वाणीचा इशारा
K Annamalai: तमिळनाडूत भाजपला बस्तान बसण्यापूर्वीच भगदाड, माजी प्रदेशाध्यक्ष अण्णामलाईंचा पक्षाला रामराम, कारवरचा झेंडा सुद्धा काढून टाकला
तमिळनाडूत भाजपला बस्तान बसण्यापूर्वीच भगदाड, माजी प्रदेशाध्यक्ष अण्णामलाईंचा पक्षाला रामराम, कारवरचा झेंडा सुद्धा काढून टाकला
Maratha Reservation: मराठा आरक्षण आंदोलन; मृत आंदोलकांच्या वारसांसाठी फडणवीस सरकारचा मोठा निर्णय
मराठा आरक्षण आंदोलन; मृत आंदोलकांच्या वारसांसाठी फडणवीस सरकारचा मोठा निर्णय
Gokul Kolhapur: 'गोकुळ'मधील प्रशासक काळात पहिला दणका; विभागीय दुग्ध निबंधकाकडून 427 संस्थांवर सर्जिकल स्ट्राईक
'गोकुळ'मधील प्रशासक काळात पहिला दणका; विभागीय दुग्ध निबंधकाकडून 427 संस्थांवर सर्जिकल स्ट्राईक
Raveena Tandon Mother Jewelry Worth 25 Lakhs Stolen: बॉलिवूड अभिनेत्री रवीना टंडनच्या आईचे 25 लाखांचे दागिने चोरीला; घरकाम करणाऱ्या महिलेनंच मारला डल्ला, पोलिसांनी ठोकल्या बेड्या
बॉलिवूड अभिनेत्री रवीना टंडन यांच्या आईचे 25 लाखांचे दागिने घरातूनच लंपास; खळबळजनक प्रकार उघड
Embed widget