एक्स्प्लोर

चालू वर्तमानकाळ (४१) : वय स्वीकारण्यातली सहजता

वय लपवण्याची उठाठेव पुरुषांनाही असते, नाही असं नाही. त्यांनाही सहसा कुणा मुलीने वा तरुणीने ‘काका / अंकल / आजोबा’ म्हटलेलं आवडत नाही. मात्र कोणत्याही वयाच्या बाईला ‘आंटी’ म्हटलेलं आवडत नाही, हा समज सर्वश्रुत – सर्वमान्य आहे.

वाढत्या वयानं आता मी माझ्या आईसारखी दिसू लागले आहे. त्यामुळे वय वाढल्याचा मला आनंद वाटतोय. आयुष्यातला हा टप्पा खूप खास आहे. असं हॉलिवूडची अभिनेत्री अँजेलिना जोली हिनं नुकतंच एका मुलाखतीत सांगितलं. माणसं सेलिब्रेटी असली की, त्यांची विधानं नीट कान देऊन ऐकली जातात; मात्र ती आपल्या सोयीची असतील तरच... हे विधान आपल्याकडे तसं कुणाच्याच सोयीचं नव्हतं, त्यामुळे त्याची चर्चा तर सोडाच, उलट त्याकडे पूर्ण दुर्लक्ष करण्यात आलं. या ऐवजी ती जर एखाद्या सुरकुत्या गायब करणाऱ्या उपचार पद्धतीबाबत बोलली असती किंवा ओघळलेले स्तन पुन्हा घट्ट करण्यासाठीचा एखादा उपाय तिने सांगितला असता, तर सूर्य उगवताच सुर्यफुलांनी आपली तोंडं प्रकाशाच्या दिशेने वळवावीत, तसे लाखो स्त्रियांचे डोळे अँजेलिना जोलीकडे वळले असते. सेलिब्रेटी लोकांनी आपलं अनुकरण करता येईल, असे विचारसुद्धा खरंतर लोकांना प्रिय वाटतील असेच मांडले पाहिजेत. अँटी एजिंग गोष्टी उपयुक्त आणि तसे उपाय फसले तर असं काहीतरी तत्त्वज्ञान पाजळायचं! मध्यंतरी वृद्धत्वाकडे झुकलेल्या एका परिचित बाईंनी हजारो रुपये खर्च करून आपल्या चेहऱ्यावर असे उपचार करून घेतलेले पाहिजे. चेहऱ्याची त्वचा ताणल्यासारखी, निर्जीव दिसत होती. त्यावर एकही सुरकुती नव्हती, हे खरं; पण त्यामुळेच ती कृत्रिम मुखवट्यासारखी दिसत होती. या उपचारांनंतर त्यांच्या चेहऱ्यावर नैसर्गिकरीत्या उमटणारे हावभाव पूर्णत: नष्ट झाले होते. या उच्चपदस्थ बाई कचकड्याच्या बाहुलीसारख्या कृतक सुंदर दिसत होत्या. माझी एक सहकारी मैत्रीण आठवली. कुणीही सहजी कुरुपात जमा करायचं असा तिचा चेहरा होता. मात्र ती कायम प्रसन्न चेहऱ्याने वावरायची, तिचं काम तिला मनापासून आवडायचं आणि तिच्या वृत्तीत उपजत जिव्हाळा होता, तो बोलण्यात – एकूणच देहबोलीत उतरायचा. त्यामुळे तिच्याशी गप्पा मारायलाच काय, नुसतं तिच्याकडे बघायलाही आवडायचं. एक्सप्रेशन्सच गायब झालेली माणसं मात्र कुरूपाहून कुरूप वाटतात, हे या निमित्ताने पुन्हा जाणवलं. बाजाराने ठरवलेल्या सौंदर्याच्या व्याख्या, त्यानुसार सुंदर दिसण्यासाठीचे अगणित प्रयोग करणाऱ्या बायका, या प्रयोगांवर होणारी लाखोंची उधळपट्टी... या सगळ्यावर आजपर्यंत खूप चर्चा झाल्या आहेत. मात्र त्या चटकन विरून जातात, इतकं बाजाराचं स्वरूप अक्राळविक्राळ आहे. या चर्चांमध्ये ‘वय’ हा मुद्दा मात्र कधी कुणी फारसा अधोरेखित केला नाही. त्यामागे कदाचित ‘सगळ्यांनाच आपलं वाढतं वय लपवायचं असतं’ हे गृहीतक नकळत कबूल केलेलं असावं. वय लपवण्याची उठाठेव पुरुषांनाही असते, नाही असं नाही. त्यांनाही सहसा कुणा मुलीने वा तरुणीने ‘काका / अंकल / आजोबा’ म्हटलेलं आवडत नाही. मात्र कोणत्याही वयाच्या बाईला ‘आंटी’ म्हटलेलं आवडत नाही, हा समज सर्वश्रुत – सर्वमान्य आहे. त्यावर असंख्य विनोद नाटक-मालिका-सिनेमांत, प्रत्यक्ष आयुष्यातही घडत, फिरत असतात. वय लपवू पाहणाऱ्या बायकांची तर प्रचंड टिंगल केली जाते. ‘बुढी घोडी लाल लगाम’ सारख्या म्हणी बहुतेक सर्व भारतीय भाषांमध्ये आहेत. ‘नेटकं राहावं, पण नखरा करू नये’ हा विचार त्यामागे दिसतो. नखरा करायचा तो फक्त पुरुषांना आकर्षित करून घेण्यासाठी किंवा आपला पुरुष दुसऱ्या बाईकडे जाऊ नये म्हणून त्याला कह्यात ठेवण्यासाठी... असा समज प्रचलित असल्याने, जिच्याकडे ‘हक्का’चा, ‘कायद्या’चा पुरुष नाही, त्या बाईच्या नटण्यामुरडण्यावर मर्यादा आल्याच. बायका जितकं जास्त शिकू लागल्या, नोकऱ्या-व्यवसाय करू लागल्या, आर्थिकदृष्ट्या स्वावलंबी बनू लागल्या, उच्चपदस्थ बनू लागल्या, प्रवास करू लागल्या; तितके त्यांच्यात वैचारिक बदल होत गेले. ‘मला आवडतं म्हणून, माझी निवड म्हणून, मला आवश्यक वाटतं म्हणून, माझी सवय आहे म्हणून...’ असे कोन मांडत त्या कपडे, दागिने, मेकअप अशा बाह्य गोष्टींबाबत आपले निर्णय आपण घेऊ लागल्या. दुकानदाराने घरी साड्या आणून दाखवणे, कासाराने घरी येऊन बांगड्या भरून जाणे असे प्रकार आजही खेड्यापाड्यांमध्ये – खासकरून ज्या जातींमध्ये पडदा पद्धत पाळली जाते तिथं, आजही आहे आणि दुसऱ्या बाजूचं चित्र हे सौंदर्योपचार म्हणून शस्त्रक्रिया करून घेण्याचं प्रमाण वाढत चालल्याचं आहे. यात सौंदर्यासोबतच, ‘आहोत त्या वयापेक्षा लहान दिसणं’ हा मुद्दा छुपा आहे. वय हा आपल्याकडचा एक मोठा पेच आहे. शिकण्याचं वय, नोकरीचं वय, प्रेमाचं वय, सेक्सचं वय, लग्नाचं वय, मुलं जन्माला घालण्याचं वय, बचत करण्याचं वय... एक ना दोन, हजार गोष्टींमध्ये वय काढलं जातं. ऐन पंचविशीतल्या तरुणी ‘आता या वयात कुठे अजून शिकायचं? आता लग्नाचं वय उलटून गेलं, तर मुलं जन्माला घालण्यात उशीर होणार; मग मुलांची शिक्षणे उशिरा संपणार, मग वेळेत निवृत्ती घेऊन आराम करता येणार नाही!’ असं एकदम म्हातारपणापर्यंत जाऊन ठेपतात. पन्नाशीतल्या बाईने राहूच द्या, पुरुषानेही प्रेम केलं की, त्याला ‘म्हातारचाळे’ म्हटलं जातं; साठीनंतर लग्न म्हणजे तर ‘बुद्धी नाठी’ असल्याचं लक्षण. बाईला मेनोपॉजनंतर देखील सेक्स हवा वाटतो म्हटलं तर ती अॅबनॉर्मलच! निवृत्तीनंतर एखादा राहून गेलेला छंद पूर्ण करायचा ठरवला, पीएचडी वगैरे करायचं ठरवलं, तर ‘या वयात काय उपयोग?’ असा मुद्दा निघतो. एकुणात वयाकडे बघण्याची आपली दृष्टी स्वच्छ नसल्याने अनेकांची कुचंबना होते, केली जाते. मन मारलेला समाज रोगट बनून राहतो. त्या रोगाचं लक्षण म्हणजेच वय लपवणे, कमी दाखवणे. अँजेलिना जोलीनं वाढत्या वयाचं स्वागत करण्याचं तिचं एक कारण दिलेलं आहे. त्याखेरीज इतर अनेक कारणं असू शकतात. वयानुसार येणारी प्रगल्भता, स्थैर्य – एकुणातच जगण्यावागण्यात आलेला ठहराव, शांतपणा, समजूतदारपणा, परिस्थितीची स्वीकारार्हता अशा कैक गोष्टी आहेत, ज्या आकर्षक, हव्याशा वाटू शकतात. एखाद्या ज्येष्ठ मैत्रिणीची – मित्राची नात ‘आपल्या आजीआजोबाची मैत्रीण म्हणून ही देखील आपली आजीच’ म्हणून मला आजी म्हणून हाक मारते; तेव्हा मला आनंदच वाटतो. आजी-नातींचं नातं किती सुंदर असतं, हे अनुभवलं असल्याने त्यात वयाचे मुद्दे आडवे येत नाहीत. आपले केस पांढरे होत जातात, त्वचेचं मधाचं पोळं बनत जातं, तेव्हा आपल्या लेकीबाळींचे बालपणाचे दिवस सरत त्या ऐन तारुण्यात पाउल ठेवतात, ते आपलंच रूप असतं की. ‘अजून यौवनात मी’ वगैरे टिपिकल घोळ न घालता, जितक्या लवकर आणि जितक्या सहजतेने वयाचा स्वीकार करता येईल, तितकी सहज शांतता वाट्याला येते हे नक्की.
अधिक पाहा..

ओपिनियन

Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Latur Fire : स्कूल व्हॅनमध्ये एलपीजी गॅस भरताना आग, लातूरमध्ये दोन गाड्या जळून खाक, एक जण गंभीर जखमी 
स्कूल व्हॅनमध्ये एलपीजी गॅस भरताना आग, लातूरमध्ये दोन गाड्या जळून खाक, एक जण गंभीर जखमी 
शेतजमिनीचा निकाल देण्यासाठी 55 हजार रुपयाची लाच, लिपिकासह शिपाई लाच लुचपत विभागाच्या जाळ्यात
शेतजमिनीचा निकाल देण्यासाठी 55 हजार रुपयाची लाच, लिपिकासह शिपाई लाच लुचपत विभागाच्या जाळ्यात
अल्कोहोलिक स्टीटोहेपेटायटिस आजाराला हटवा, बिग बिंनी उचलला विडा; अमिताभ बच्चन ब्रँड ॲम्बेसिडर
अल्कोहोलिक स्टीटोहेपेटायटिस आजाराला हटवा, बिग बिंनी उचलला विडा; अमिताभ बच्चन ब्रँड ॲम्बेसिडर
उपमुख्यमंत्री नाराज होऊन कोणत्या गावाला गेले ते शोधा, आदित्य ठाकरेंचा एकनाथ शिंदेंना टोला
उपमुख्यमंत्री नाराज होऊन कोणत्या गावाला गेले ते शोधा, आदित्य ठाकरेंचा एकनाथ शिंदेंना टोला
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

ABP Majha Marathi News Headlines 11PM TOP Headlines 11 PM 20 January 2025Donald Trump oath Ceremony | अमेरिकेत पुन्हा डोनाल्ड ट्रम्प पर्व, 47वे राष्ट्राध्यक्ष म्हणून घेतली शपथSpecial Report Akshay Shinde Case | अक्षय शिंदेच्या एन्काऊंटरप्रकरणी पोलीस गोत्यातJalgoan Crime News : जळगावात 'सैराट', पूजा-मुकेशच्या लव्हस्टोरीचा रक्तरंजित शेवट

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Latur Fire : स्कूल व्हॅनमध्ये एलपीजी गॅस भरताना आग, लातूरमध्ये दोन गाड्या जळून खाक, एक जण गंभीर जखमी 
स्कूल व्हॅनमध्ये एलपीजी गॅस भरताना आग, लातूरमध्ये दोन गाड्या जळून खाक, एक जण गंभीर जखमी 
शेतजमिनीचा निकाल देण्यासाठी 55 हजार रुपयाची लाच, लिपिकासह शिपाई लाच लुचपत विभागाच्या जाळ्यात
शेतजमिनीचा निकाल देण्यासाठी 55 हजार रुपयाची लाच, लिपिकासह शिपाई लाच लुचपत विभागाच्या जाळ्यात
अल्कोहोलिक स्टीटोहेपेटायटिस आजाराला हटवा, बिग बिंनी उचलला विडा; अमिताभ बच्चन ब्रँड ॲम्बेसिडर
अल्कोहोलिक स्टीटोहेपेटायटिस आजाराला हटवा, बिग बिंनी उचलला विडा; अमिताभ बच्चन ब्रँड ॲम्बेसिडर
उपमुख्यमंत्री नाराज होऊन कोणत्या गावाला गेले ते शोधा, आदित्य ठाकरेंचा एकनाथ शिंदेंना टोला
उपमुख्यमंत्री नाराज होऊन कोणत्या गावाला गेले ते शोधा, आदित्य ठाकरेंचा एकनाथ शिंदेंना टोला
अक्षय शिंदेच्या वडिलांनी घराच्या दुरुस्तीसाठी घेतले कर्ज; दारावर कर्जाची नोटीस, फायनान्सची रक्कम किती?
अक्षय शिंदेच्या वडिलांनी घराच्या दुरुस्तीसाठी घेतले कर्ज; दारावर कर्जाची नोटीस, फायनान्सची रक्कम किती?
ABP माझा इम्पॅक्ट; अखेर 87 विद्यार्थ्यांना घरपोच जात प्रमाणपत्र; दणक्यानंतर महसूल प्रशासन गदागदा हललं
ABP माझा इम्पॅक्ट; अखेर 87 विद्यार्थ्यांना घरपोच जात प्रमाणपत्र; दणक्यानंतर महसूल प्रशासन गदागदा हललं
पंढरीच्या गर्दीचं नियोजन अन् नियंत्रणासाठी AI तंत्रज्ञानचा वापर; कोट्यवधी रुपयांचा प्रस्ताव सादर
पंढरीच्या गर्दीचं नियोजन अन् नियंत्रणासाठी AI तंत्रज्ञानचा वापर; कोट्यवधी रुपयांचा प्रस्ताव सादर
दोस्तीत कुस्ती... किरकोळ वादातून मित्रानेच केला मित्राचा खून; पोलिसांकडून फरार आरोपीचा शोध सुरू
दोस्तीत कुस्ती... किरकोळ वादातून मित्रानेच केला मित्राचा खून; पोलिसांकडून फरार आरोपीचा शोध सुरू
Embed widget