एक्स्प्लोर
अमळनेरच्या घटनेतून : भाजपानेच अंतर्गत गटबाजीतून उभी केली पक्षासमोर आव्हाने
१९९१ पासून जळगाव जिल्ह्यात लोकसभा निवडणुकीत विजय मिळविण्याचा भारतीय जनता पार्टीचा इतिहास आहे. मात्र अशा फ्रीस्टाइल होत असतील तर याचा याचा निवडणुकीवर परिणाम होऊ शकतो असे भाजपाचे जिल्हाध्यक्ष, पदाधिकारी आणि कार्यकर्ते यांना वाटलं नसेल इतके ते अज्ञानी नाहीत.
अमळनेर येथे भारतीय जनता पार्टीचा मेळावा घेण्यात आला. लोकसभा निवडणूक असल्याने प्रचार सभा, भव्य मांडवातील व्यासपीठावर पक्षाचे मंत्री गिरीश महाजन, मित्र पक्ष शिवसेनेचे आमदार आणि मंत्री गुलाबराव पाटील, अमळनेरचे आमदार शिरीष चौधरी, भाजपाचे माजी आमदार डॉ.बी एस पाटील, भाजपाचे उमेदवार उन्मेष पाटील, जिल्हा अध्यक्ष उदय वाघ, शिवसेनेचे संपर्क प्रमुख संजय सावंत शिवसेना जिल्हा प्रमुख गुलाबराव वाघ इतर आमदार, पदाधिकारी आणि कार्यकर्ते आवर्जून उपस्थित होते.
इतके सर्व पदाधिकारी व्यासपीठावर उपस्थित असताना व्यासपीठावर खालून स्मिता वाघ आगे बढोच्या घोषणा दिल्या जातात भाजपाचे माजी आमदार बी एस पाटील यांना व्यासपीठाखाली उतरवण्यासाठी कार्यकर्ते ओरडतात आणि तितक्यात जिल्हा अध्यक्ष उदय वाघ उठतात आणि माजी आमदार डॉ.बी एस पाटील यांना मारहाण करण्यास सुरुवात करतात. नेता मारतोय म्हणून कार्यकर्तेही व्यासपीठावर चढून मारहाणीत सहभागी होतात.
2019 च्या लोकसभा निवडणुकीतून खासदार ए टी पाटील यांचे तिकीट कापले गेले आणि जळगाव लोकसभा मतदारसंघातून स्मिता वाघ यांना तिकीट देण्यात आले. तिकीट कापले गेल्यानंतर ए टी पाटिल त्यांनी पारोळा येथे मेळावा घेतला. त्याचवेळी अमळनेर येथील वादाची ठिणगी पडली होती. मेळाव्यात गिरीश महाजन यांचेवरसुद्दा आरोप करण्यात आले होते, तसेच उदय वाघ यांचा आरोप आहे की माजी आमदार डॉ.बी एस पाटिल यांनी पारोळा येथील मेळाव्यात स्मिता वाघ यांच्याविषयी गैर उद्गार काढले होते. स्मिता वाघाचे लोकसभेचे फॉर्म भरले गेले असताना, (विशेष म्हणजे भाजपाच्या ए.बी. फॉर्म वर) स्मिता वाघ यांचे तिकीट रद्द करून चाळीसगावचे आमदार उन्मेष पाटिल यांना उमेदवारी देण्यात आली आणि स्मिता वाघ यांच्या कार्यकर्त्यांमध्ये राग वाढला.
स्मिता वाघ यांचे तिकीट कापले गेल्याने वाघ समर्थकानी भाजपाचे संकटमोचक मानले जाणारे गिरीश महाजन यांचे जळगाव येथील कार्यालयात त्यांच्याशीसुद्धा वाद घातला होता. परंतु अमळनेरच्या मेळाव्याआधी गिरीश महाजन यांनी स्मिता वाघ यांचे पती आणि भाजपाचे जळगाव जिल्हा अध्यक्ष उदय वाघ आणि माजी आमदार डॉ.बी एस पाटील यांचेत समेट घडवून आपल्या गाडीतच बसवून दोघांना मेळाव्या ठिकाणी आणले होते.
मंत्री गिरीश महाजन यांना भाजपा महाराष्ट्रात संकटमोचक मानते. मंत्री गिरीश महाजन यांनी भाजपाचे जळगाव जिल्हा अध्यक्ष उदय वाघ आणि माजी आमदार डॉ.बी एस पाटील यांच्यात समेट घडवून आणला होता. मग व्यासपीठावर हा हंगामा झाला कसा? महाराष्ट्रात भाजपाचे संकट मोचक ठरलेले गिरीश महाजन यांना त्यांच्याच जिल्ह्यात पदाधिकारी जुमानत नसतील आणि त्यामुळे येणाऱ्या काळात नेमकी जळगावचीच भाजपाची लोकसभेची सीट पडली तर संकटमोचकच संकटात येऊ शकत नाहीं का?
अमळनेरातील महायुतीच्या मेळाव्याच्या व्यासपीठावर झालेला हाणामारीचा प्रकार हा जिल्ह्याच्या राजकीय इतिहासातील एक लज्जास्पद अध्याय म्हणून गणला जाणार आहे. राजकारण ही विचारांची लढाई मानली जाते. येथे विचाराचा प्रतिकार विचारानेच करणे अपेक्षित असते. अगदी विरोधकांसोबतही शालिन, सुसंस्कृतपणे वागणे अभिप्रेत असते. मात्र जिथे स्वकीयच लाथा-बुक्क्यांवर उतरतात आणि लोकशाही ही ठोकशाहीत परिवर्तित होते; तिथे नैतिक पतनाचा प्रारंभ होतो. अलीकडच्या काही घटना या भाजपच्या नैतिक र्हासपर्वाची नांदी ठरल्या होत्या. अमळनेरातील धुडगुस हा यावर शिक्कामोर्तब करणारा ठरला आहे.
गत सुमारे अडीच दशकांपासून जळगाव जिल्हा हा भाजपचा बालेकिल्ला आहे. यामुळे २०१४ च्या विधानसभा निवडणुकीनंतर पक्षाने एकनाथराव खडसे आणि गिरीश महाजन यांना महत्वाची खाती दिली. मात्र मुख्यमंत्र्यांना डोईजड झालेल्या खडसे यांना हटविण्यासाठी त्यांच्यासमोर महाजन यांना समोर करण्यात आले. यातून निर्माण झालेले सूडचक्र आता गटबाजीच्या पलीकडे जात अश्लील क्लिपमार्गे मारहाणीपर्यंत येऊन ठेपले आहे. खरं तर, खडसे आणि महाजन यांनी एकत्रितपणे प्रयत्न केले असते तर जिल्ह्यात विकासगंगा नव्हे तर किमान विकासाची तापी/गिरणा नदी तरी वाहिली असती. मात्र आजही महापालिकेच्या सतराव्या मजल्यावरून जरी दुर्बिण घेऊन पाहिले तर फक्त विकासाचा नालाच वाहतांना दिसतो. अर्थात, काँग्रेसी पॅटर्ननुसार भाजपच्या वरिष्ठांनी जिल्ह्यातील नेत्यांचा वापर करून म्हणजेच त्यांना एकमेकांसमोर उभे करून स्वत:चा स्वार्थ साधून घेतला. नेते भांडणांमध्ये मग्न तर जनता कामे होत नसल्यामुळे त्रस्त असा हा सर्व प्रकार सध्या सुरू आहे.
व्यासपीठावर दोन मंत्री, आमदार विविध पक्षाचे जिल्हाध्यक्ष, पदाधिकारी असतांना वादाला हे सर्व मिलवून थांबवू कसे शकले नाही? का हे घड़णे पूर्वनियोजित होते? प्रश्न जरी अनुत्तरित असले तरी आपसातील वाद जाहीर करायला व्यासपीठ हा नक्कीच पर्याय नव्हता, एक शिस्त प्रिय पक्षाच्या महत्वाच्या पदावरील लोकांकडून ऐन निवडणुकीच्या तोंडावर झालेले हे फ्री स्टाईल एका वरिष्ठ आणि आपल्याच पक्षाच्या माजी आमदारास लोकांसमोर केलेली मारहाण हीच भाजपाची शिस्त आता राहिली का ?
१९९१ पासून जळगाव जिल्ह्यात लोकसभा निवडणुकीत विजय मिळविण्याचा भारतीय जनता पार्टीचा इतिहास आहे. मात्र अशा फ्रीस्टाइल होत असतील तर याचा याचा निवडणुकीवर परिणाम होऊ शकतो असे भाजपाचे जिल्हाध्यक्ष, पदाधिकारी आणि कार्यकर्ते यांना वाटल नसेल इतके ते अज्ञानी नाहीत.
असो
मात्र या वादाने भाजपाची प्रतिमा मलिन होत आहे हे वेगळे सांगायला नको.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
महाराष्ट्र
राजकारण
महाराष्ट्र
नागपूर
Advertisement