एक्स्प्लोर

BLOG: सेमी फायनलमध्ये आऊट, निवड समितीला गो आऊट; बीसीसीआयचं कडक पाऊल!

Ashvin Bapat Blog On  BCCI sacks selection committee: टीम इंडियाच्या टी-ट्वेन्टी वर्ल्डकपमधील सेमी फायनलच्या मानहानीकारक पराभवाला बीसीसीआयने अत्यंत गांभीर्याने घेतलंय. चेतन शर्मांच्या नेतृत्वाखालील अख्खी निवड समिती बदलण्याचा निर्णय आता बीसीसीआयने घेतलाय. या स्पर्धेत टीम इंडियाचा मुकाबला पाकिस्तान, दक्षिण आफ्रिका आणि इंग्लंड या तीन तगड्या संघांशी झाला होता. यापैकी पाकविरुद्धची लढत कशीबशी जिंकली होती, तर दक्षिण आफ्रिका आणि इंग्लंडविरुद्ध भारताला दोन मोठ्या पराभवांना सामोरं जावं लागलं होतं. यातील सेमी फायनलचा पराभव इतका जिव्हारी लागणारा होता की, इंग्लिश सलामीवीरांची जोडीही भारत फोडू शकला नव्हता. बटलरच्या टीमने चार ओव्हर्स आणि दहा विकेट्स राखत भारताला धूळ चारली. तर, अन्य सामन्यातील भारतीय कामगिरीचा विचार केल्यास बांगलादेशविरुद्धच्या लढाईत जिंकतानाही आपल्याला घाम फुटला होता. नेदरलँड्स आणि झिम्बाब्वे हे दोनच सामने आपण त्यातल्या त्यात कम्फर्टेबली जिंकलो होतो. पण, या दोघांची आंतरराष्ट्रीय स्तरावरील ताकद ही भारताच्या तुलनेत अगदीच नगण्य आहे. याउलट टी-ट्वेन्टी सांघिक क्रमवारीत टीम इंडिया अव्वल स्थानी आहे. त्यामुळे या लौकिकाला अव्वल संघांविरुद्धची कामगिरी नक्कीच साजेशी नाही. टी-ट्वेन्टी हा तरुण रक्ताचा, सळसळत्या तारुण्याचा आणि अव्वल फिटनेसचा खेळ आहे. अशा खेळात आपल्या संघातील काही खेळाडूंचं वय, फिटनेस यावरुन चर्चा सुरु झाल्या असतानाच आता बीसीसीआयने हे कठोर पाऊल उचललंय. 

क्रिकेटच्या तिन्ही फॉरमॅट्समध्ये आता आपल्याकडे वेगळे संघ आणि वेगळा कॅप्टन असावा, अशी चर्चा जोरात सुरु आहे. काही देशांनी याआधीच तिन्ही फॉरमॅट्सकरता ही तरतूद करुन ठेवलीय. इंग्लंडचंच उदाहरण घेऊया. त्यांनी मॉर्गन, स्टोक्स आणि बटलर अशा निरनिराळ्या खेळाडूंना कर्णधार म्हणून नियुक्त करत त्या त्या फॉरमॅटची तयारी उत्तम केली. आपण, कोहलीसह तिन्ही फॉरमॅट्समध्ये खेळणं आधी प्रिफर केलं होतं. कोहलीने कॅप्टन्सी सोडल्यावर आपण रोहित, राहुल असे पर्याय चाचपले. आता प्रमुख खेळाडूंना विश्रांती दिल्यावर आपण किवी दौऱ्यासाठी हार्दिक पंड्याकडे संघाचं सुकाणू दिलंय. खरं तर ही फक्त तात्पुरती अरेंजमेंट म्हणून न करता भारतीय क्रिकेटच्या म्हणजे टी-ट्वेन्टी क्रिकेटच्या भविष्यासाठी ही गुंतवणूक ठरावी‌, असं असलं तरीही भारताचे माजी कर्णधार सुनील गावसकर यांनी मात्र सावध पावलं टाकण्याचाच सल्ला दिलाय. भारताच्या सेमी फायनलमधील पराभवानंतर ते म्हणतात, संघात मोठ्या प्रमाणात बदल करुन काहीच साध्य होणार नाही. आपल्याकडे एखाद्या सामन्यात पराभूत झाल्यानंतर संघावर वाट्टेल तसे ताशेरे मारण्याची प्रथाच पडलीय. हा योग्य मार्ग नव्हे. निवड समितीला काही कठोर निर्णय घ्यावे लागतील, हे मान्य आहे. असं असलं तरीही याकरता आपल्याला काही वेळ द्यावाच लागेल. माझी खात्री आहे की, निवड समिती योग्य ती पावलं उचलेल.

एकाच पराभवाने सारं काही संपलं, असं मानण्याची गरज नसली तरीही पुढच्या टी-ट्वेन्टी वर्ल्डकपसाठी संघबांधणीची हीच खरी वेळ आहे. हार्दिक पंड्याला जर आपण दीर्घकालीन टी-ट्वेन्टी कॅप्टन म्हणून पाहत असू. तर त्याच्या हातात असा ग्रुप ऑफ प्लेअर्स द्यायला हवा, जो आपल्याला पुढची किमान पाच वर्षे या फॉरमॅटमध्ये उत्तम रिझल्ट देईल. याची सुरुवात बीसीसीआयने निवड समितीपासून केलीय. आता नव्याने निवड समिती निवडल्यानंतर ती कशी परफॉर्म करते हे पाहणं महत्त्वाचं ठरेल.

अधिक पाहा..

ओपिनियन

Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Maharashtra Budget 2025: मुंबईसाठी महायुती सरकारचा मोठ्ठा प्लॅन, रोजगार आणि गुंतवणूक खटाखट वाढणार, अर्थमंत्री अजित पवार यांची महत्त्वाची घोषणा
मुंबईसाठी महायुती सरकारचा मोठ्ठा प्लॅन, रोजगार आणि गुंतवणूक खटाखट वाढणार, अर्थमंत्री अजित पवार यांची महत्त्वाची घोषणा
Tips For Car Driving: घाटात गाडी चालवताना काय काळजी घ्यायची?
Tips For Car Driving: घाटात गाडी चालवताना काय काळजी घ्यायची?
Maharashtra Budget 2025: महाराष्ट्राचा अर्थसंकल्प सादर; फडणवीस सरकारच्या 10 मोठ्या घोषणा
Maharashtra Budget 2025: महाराष्ट्राचा अर्थसंकल्प सादर; फडणवीस सरकारच्या 10 मोठ्या घोषणा
पुण्यात निवृत्त PSI च्या घरी गुंडांचा धुडगूस; किरकोळ कारणावरुन 8 ते 10 जणांकडून कुटुंबीयांना मारहाण
पुण्यात निवृत्त PSI च्या घरी गुंडांचा धुडगूस; किरकोळ कारणावरुन 8 ते 10 जणांकडून कुटुंबीयांना मारहाण
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

ABP Majha Marathi News Headlines 02.00 PM TOP Headlines 02.00 PM 10 March 2025Maharashtra Budget Session 2025 | महायुतीचा बजेट मांडताना अजितदादांसमोर कोणती आव्हानं? ABP MajhaABP Majha Marathi News Headlines 01.00 PM TOP Headlines 01.00 PM 10 March 2025Chhagan Bhujbal on Onion : कांदा प्रश्नावरून भुजबळ विधानसभेत आक्रमक, उपमुख्यमंत्र्यांनी कांदाप्रश्न केंद्रांसमोर मांडावा

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Maharashtra Budget 2025: मुंबईसाठी महायुती सरकारचा मोठ्ठा प्लॅन, रोजगार आणि गुंतवणूक खटाखट वाढणार, अर्थमंत्री अजित पवार यांची महत्त्वाची घोषणा
मुंबईसाठी महायुती सरकारचा मोठ्ठा प्लॅन, रोजगार आणि गुंतवणूक खटाखट वाढणार, अर्थमंत्री अजित पवार यांची महत्त्वाची घोषणा
Tips For Car Driving: घाटात गाडी चालवताना काय काळजी घ्यायची?
Tips For Car Driving: घाटात गाडी चालवताना काय काळजी घ्यायची?
Maharashtra Budget 2025: महाराष्ट्राचा अर्थसंकल्प सादर; फडणवीस सरकारच्या 10 मोठ्या घोषणा
Maharashtra Budget 2025: महाराष्ट्राचा अर्थसंकल्प सादर; फडणवीस सरकारच्या 10 मोठ्या घोषणा
पुण्यात निवृत्त PSI च्या घरी गुंडांचा धुडगूस; किरकोळ कारणावरुन 8 ते 10 जणांकडून कुटुंबीयांना मारहाण
पुण्यात निवृत्त PSI च्या घरी गुंडांचा धुडगूस; किरकोळ कारणावरुन 8 ते 10 जणांकडून कुटुंबीयांना मारहाण
Crime News: रत्नागिराच्या चिमुकलीचा गोव्यात गेला जीव! खून की नरबळी? घराच्या परिसरात गाडलेल्या अवस्थेत सापडला मृतदेह अन्...पोलीस तपास सुरू
रत्नागिराच्या चिमुकलीचा गोव्यात गेला जीव! खून की नरबळी? घराच्या परिसरात गाडलेल्या अवस्थेत सापडला मृतदेह अन्...पोलीस तपास सुरू
सोने-चांदीचे भाव पुन्हा कडाडले, होळीपूर्वीचा सोन्याचा दर किती?
सोने-चांदीचे भाव पुन्हा कडाडले, होळीपूर्वीचा सोन्याचा दर किती?
Beed Crime : खोक्या भाईने मारहाण केलेल्या ढाकणे पिता-पुत्रावर विनयभंग अन् अ‍ॅट्रोसिटीचा गुन्हा दाखल, मुला-मुलीला शेतात बोलावलं अन्...
खोक्या भाईने मारहाण केलेल्या ढाकणे पिता-पुत्रावर विनयभंग अन् अ‍ॅट्रोसिटीचा गुन्हा दाखल, मुला-मुलीला शेतात बोलावलं अन्...
Nitesh Rane : मोठी बातमी : आता मटण दुकानांना मल्हार सर्टिफिकेट,  हिंदू खाटीकांसाठी नितेश राणेंचं नवं धोरण
मोठी बातमी : आता मटण दुकानांना मल्हार सर्टिफिकेट, हिंदू खाटीकांसाठी नितेश राणेंचं नवं धोरण
Embed widget