एक्स्प्लोर
जिभेचे चोचले : जिवाची मुंबई – पंचतारांकित रेनेसॉंचा संडे ब्रंच
एकेका पदार्थांचा आस्वाद घेत निवांद रविवारचे तीन चार तास घालवत एक छोटीसी पिकनिक करणं म्हणजे खरंतर रेनेसॉंचा संडे ब्रंच ... रोजच्या कटकटीच्या रुटीनमधून हा छोटासा ब्रंच ब्रेक कुटुंबातल्या सगळ्यांसाठीच एक प्लेझंट सरप्राईज ठरु शकतं...
‘जिवाची मुंबई करणे’ हा वाकप्रचार आपण मुंबईकर सर्रास वापरतो..जिवाची मुंबई करण्यासाठी प्रत्येकजण नक्कीच काहीतरी वेगळं करेल, कुणी मुंबईच्या एक टोकापासून दुसऱ्या टोकापर्यंत फिरुन जिवाची मुंबई करेल, तर कुणी चौपाटीची सैर करुन समुद्राचा नंद घेईल, मुंबईतल्या स्ट्रीट फुड ची चव चाखत कुणी जिवाची मुंबई करेल, तर मुंबईत मोठ्या प्रमाणात असलेल्या पंचतारांकित हॉटेलात जगभरातील खाद्यसंस्कृतीची चव चाखत कुणी जिवाची मुंबई करेल.. अशी जिवाची मुंबई करता यावी म्हणून खरं तर ही पंचतारांकित हॉटेलंसुद्धा इतकी सोय करतात की निवांत बसून, चवींचा खजिना उलगडत जिवाची मुंबई कऱण्याची संधी सहसा कुणी सोडू शकत नाही...तर अशी जिवाची मुंबई करण्याची, ऐश करण्याची संधी दर रविवारी रेनेसॉ या पवईतल्या पंचतारांकित हॉटेलमध्ये दर रविवारी मिळते ती त्यांच्या अतिशय प्रसिद्ध असलेल्या संडे ब्रंचच्या माध्यमातून..
खरं तर उपनगरांसाठी आयकॉनिक असं ताजच्या नंतर कुठलं हॉटेल असेल तर ते नक्कीच रेनेसॉं ठरेल, कारण कुलाब्याच्या ताजपासून ताज लॅण्डस एण्डपर्यंत सगळी ताजची पंचतारांकित हॉटेल्स मुंबईच्या विविध समुद्रकिनाऱ्यांवर आहेत, तर रेनेसॉं पवई तलावाच्या किनाऱ्यावर आहे..
जोगेश्वरी विक्रोळी लिंक रोडने पवईला पोचल्यावर उजव्या बाजूला दिसतो तो निळाशार पवई तलाव आणि त्याच्या दुसऱ्या टोकाला अतिशय आकर्षक अशी पांढऱ्या शुभ्र रंगाची अर्धगोलाकार रेनेसॉंची इमारत.. कितीतरी चित्रपटातही लेक व्हू असलेलं हे रेनेसॉं आपल्याला मुंबईची ओळख म्हणून बघायला मिळतं..
पवईच्या मुख्य रस्त्यावरुन पाहिलं की तलावाच्या दुसऱ्या टोकाला अगदी निर्जन ठिकाणी डोंगराच्या पायथ्याशी हे हॉटेल असावं असं वाटतं..मात्र एलएण्डटीच्या आतल्या रस्त्यावरुन या रेनेसॉंला गेलं की लक्षात येतं की मुख्य रस्त्यावरुन दिसत असलं तरी चांगल्या गजबजलेल्या भागातच हे पंचतारांकित हॉटेल आहे..
रेनेसॉंचं लोकेशन आणि इमारत जितकी आकर्षक अगदी तितकाच आकर्षक आणि प्रसिद्ध झालाय तो त्यांचा संडे ब्रंच.. निवांत आसनव्यवस्था आणि देशविदेशातील शोकडो चवदार खाद्यपदार्थांचा भलामोठा बुफे हे या संडे ब्रंचचं वैशिष्ट्य..पण नुसता लग्नातल्यासारखा बुफे लावला तर त्या बुफेसाठी कोणी पंचतारांकित हॉटेलात का जाईल आणि दोन हजाराच्या आसपास किंमत का मोजेल, बुफेत मांडलेले पदार्थ खाण्यापेक्षा खवय्ये इतर कुठल्या तरी रेस्टॉरन्टमध्ये जाऊन आपल्याला आवडणारा एखादा पदार्थ मनसोक्त खातील, म्हणूनच तर पंचतारांकित हॉटेलचा ब्रंच खरंच किती चांगला हे तिथल्या लाईव्ह काऊंटर्सच्या संख्येवर ठरतं..
लाईव्ह काऊंटर्स म्हणजे इतर पदार्थांचा बुफे लावलेला असताना काही पदार्थ थेट आपल्यासमोरच तयार करुन आपल्या हातात दिले जातात..पंचतारांकित हॉटेलातले नामवंत शेफ्सचे गाडेच म्हणता येईल त्यांना.. मग एखाद्या कोपऱ्यात चाट काऊंटर असतं..ते टेबल विविध आकारचे डबे त्यात रंगिबेरंगी पदार्थ असं सजवलेलं असतं..आणि त्या टेबलामागे पांढऱ्या शुभ्र पोशाख आणि टोपीच्या पेहरावात अभा असतो तो शेफ..तो चाट काऊंटरवरचा शेफ चाटचा हवा तो पदार्थ आपल्याला आपल्या चवीनुसार आपल्या पुढ्यातच करुन देतो..
भेळ, पाणीपुरी, शेवपुरी, कचोरी चाट, दही वडा, रगडा पॅटीस, असा कुठलाही चाट या सदरात मोडणारा पदार्थ झटपट मिळतो.. असे जास्तीत जास्त लाईव्ह काऊंटर्स ही रेनेसॉंमधल्या संडे ब्रंचची खासियत..
एक डोसा काऊंटर असतं.. तिथे डोसा, उत्तपम, अप्पम असे सगळे दक्षिण भारतीय पदार्थ आपल्यासमोरच तयार करुन दिले जातात..
अगदी दरवेळी रेनेसॉंतल्या बुफेत दिसणारं आणखी एक लाईव्ह काऊंटर म्हणजे मोमोज आणि चायनिजचं काऊंटर वेताचियी झीकणं असलेल्या टोपल्यांमध्ये मोमोजही आपल्यासमोरच गरमगरम शिजवले जातात आणि चायनिज तर तयार होताना बघणंही मोठं मनोरंजक असतं..भल्या मोठ्या काळ्या कढईत तो शेफ भाज्या किंवा चिकन आणि नुडल्स अक्षरश: हवेत उडवत उडवत तयार करतो..
त्याशिवाय भारतीय पदार्थांमध्ये छोले कुलछा, मासांहारात माशांचे विविध प्रकार, वेगवेगळ्या पद्धतीनं केलेलं चिकन, नॉनव्हेज सॅण्डिविचेस याचे लाईव्ह काऊंटर्स हे लहान मोठ्या सगळ्यांसाठी खास आकर्षण असतं संडेब्रंचदरम्य़ान, तसंच वेगवेगळ्या फ्लेवरचा वुड फायर पिझ्झा तो ही मिळतो लाईव्हच..
पण रेनेसॉंच्या बुफेची खरी मजा असते ती तिथल्या डेझर्टसमध्ये, खरं तर पंचतारांकित हॉटेलमध्ये गेल्यावर तिथली लक्झरी आणि त्याचबरोबर अगदी मिस करायलाच नको असं काही असेल तर त्यांचे डेझर्टस... त्यातही रेनेसॉंचे डेझर्टस तर इतर पंचातारांकित हॉटेलापेक्षाही एक दोन पावलं पुढे.. मुळात अशा हायफाय हटेलांचे डेझर्ट म्हणजे केक, पेस्ट्रीज, चॉकलेट्स डोळ्यापुढे येतात, इथे रेनेसॉंला केक आणि पेस्ट्रीज, चॉकलेट यांचे कितीतरी प्रकार इथल्या बुफेमध्ये ठेवलेले असतात, त्याशिवायही वेगवेगळ्या देशांच्या नॅशनल डिश असलेल्या गोड पदार्थांचीही इथे रेलचेल असते..
लहान मुलांना खुणावणारं चॉकलेट फाऊंटन असतं..त्यात बुडवून खाण्यासाठी फळं, कपकेक्सही असतात.. पण खरी गंमत असते..ती गोड पदार्थांच्या लाईव्ह काऊंटर्सवर, एका गाड्यावर गरमागरम जिलब्या तळणारा बल्लवाचार्य आणि समोर त्या जिलबीवर टाकून खाण्यासाठी घट्टशी रबडी, सोबतच पिस्ता आणि बदामाचा चुरा असा शाही अंदाज पाहिल्यावर मात्र प्रत्येक भारतीय मनाला खरा फाईव्ह स्टार आनंद होतो.. आणि सहाजिकच मनसोक्त जेवल्यानंतरही या जिलबी स्टॉलवर गरमागरम जिलबी खाण्यासाठी जरा जास्तच घुटमळायला होतं..असे भारतीय डेझर्टस ही रेनेसॉंच्या ब्रंचची एक मोठी खासियत..गुलाबजाम, वेगवेगळ्या चवींच्या बर्फीचे प्रकार, रसमलाई, रेंगबिरंगी रसगुल्ले आणि अगदी बुशाहीसारखे पदार्थही या बुफेत आपल्याला चाखायला मिळतात..
रेनेसॉंच्या संडे ब्रंचला किती लाईव्ह काऊंटर्स आहेत याचं वर्णन तर केलं..पण त्याशिवायही बुफेत मांडलेल्या पदार्थआंची व्हेरायटी जबरदस्त असते..
20-22 प्रकारचे व्हेज आणि नॉनव्हेज सॅलड्स, लेबनिज पिटा ब्रेड,आणि हुमसचेही विविध प्रकार, ब्रेडचे वेगवगेळे प्रकार आणि त्या ब्रेडस बरोबर खायला विविध देशातलं स्पेशालिटी चिज जर चाखायचं असेल तर अशा पंचतारांकित हॉटेलच्या बुफेला हजेरी लावावीच लागेल..बरं इतक्याने तो बुफे संपतो थोडाच तीन चार प्रकारचे सूप, पापडांचेही ८-१० प्रकार, आणि मग मेन कोर्सच्या बुफेला सुरुवात होते, व्हेज आणि नॉनव्हेज भाज्यांचे तऱ्हेतऱहेचे प्रकार मग त्यात पनीरची एखादी खास शेफ स्पेशल भाजी असते किंवा भारताच्या विविध भागातल्या खाद्यसंस्कृतींचं दर्शन घडवणाऱ्या भाज्याही असतात, दालचेही विविध प्रकार त्या बुफेत चाखायला मिळतात..
तसंही प्रत्येक मुंबईकर सोमवार ते शनिवार कामाच्या निमित्ताने नुसता धावत असतो, पण रविवार मात्र त्याच्या हक्काचा आणि त्याच्या कुटुंबियांचा असतो, लहान मुलांचा असतो, ती गरज ओळखूनच रेनेसॉंच्या संडे ब्रंचला रेस्टॉरन्टचा एक भाग चिल्ड्रन प्ले एरिया म्हणून सजवला जातो...
वेगवेगळ्या आकाराचे फुगे फुगवून दोन विदूषक बच्चेकंपनीला हसवत खोळवत असतात..एक मोठा सापसिडीचा खेळ एका मॅटवर आंथरलेला दिसतो, छोट्या खुर्चीएवढ्या सोंगट्या पाहून तर बच्चे कंपनी हरखून जाते..
उड्या मारायला मऊमऊ कल्लाच उभारलेला दिसतो, तर चित्र रंगवायला हवे तेवढे स्केचपेन, क्रेयॉन्स आणि चित्र असा हा प्ले एरिया म्हणजे लहानगी मुलं आणि त्याचे आईबाबा सगळ्यांसाठीच मोठा आनंद ठरतो..बरं या छोट्या खवय्यांची इथे वेगळी काळजी घेतलेली असते त्यामुळे बुढ्ढी के बाल किंवा कॅन्डी फ्लॉसचं अख्खं मशीन तिथे असतं आणि हव्या त्या रंगाचे कॅन्डी फ्लॉस मुलं शेफकडून तयार करुन घेत असतात.. त्याच्या शेजारीच पॉपकॉर्नचंही मशीन, कागदी कोनमध्ये पॉपकॉर्न घेऊन प्लेएरियामध्ये निवांत फिरणारी मुलं पाहून आईबाबाही आणखीच रिलॅक्स होतात..
एकेका पदार्थांचा आस्वाद घेत निवांद रविवारचे तीन चार तास घालवत एक छोटीसी पिकनिक करणं म्हणजे खरंतर रेनेसॉंचा संडे ब्रंच ... रोजच्या कटकटीच्या रुटीनमधून हा छोटासा ब्रंच ब्रेक कुटुंबातल्या सगळ्यांसाठीच एक प्लेझंट सरप्राईज ठरु शकतं...
संबंधित ब्लॉग :
जिभेचे चोचले : वाह ताज !– मसाला क्राफ्ट
जिभेचे चोचले : पारंपरिक जेवणाचा थाट – भगत ताराचंद
जिभेचे चोचले: बोटीच्या थीमचं हार्बर ओ फोर
जिभेचे चोचले : डोशासारख्या क्रेप्ससाठी ‘डी क्रेप्स’ कॅफे जिभेचे चोचले : लिजेंडरी क्रिम सेंटर जिभेचे चोचले : तरुणाईचा ‘चिजी’ अड्डा, प्युअर मिल्क सेंटर जिभेचे चोचले: उडुपी संस्कृतीचा पारंपारिक थाट जिभेचे चोचले : आस्वादचा ‘आस्वाद’ जिभेचे चोचले : स्पेशल सिझलरसाठी ‘फुड स्टुडियो’ जिभेचे चोचले : ‘फ’ से फ्यूजन… ‘फ’ से फूड जिभेचे चोचले : ढाब्याची आठवण – चौबारा 601 जिभेचे चोचले : ग्लोबल एशियन फ्युजन जिभेचे चोचले : हम काले है मगर… आईस्क्रीमचा भन्नाट फ्लेवर जिभेचे चोचले : महाराष्ट्राचा काठ आणि घाट जिभेचे चोचले: केक चॉकलेट पेस्ट्रीचं रोलिंग पिन जिभेचे चोचले : पाणीपुरी – ‘तोंडभर’ आनंद जिभेचे चोचले: पावभाजी – विथ लव्ह फ्रॉम मुंबई जिभेचे चोचले: इराणी हॉटेलांचा मॉडर्न अवतार जिभेचे चोचले : मुंबईतलं मिनी दक्षिण भारत : इडली-डोशाचं गाव जिभेचे चोचले : मुंबईचं मॉडर्न कॅन्टीन जिभेचे चोचले : कुटुंबसंस्थेचं सेलिब्रेशन जिभेचे चोचले : सफर विस्मरणातल्या खाद्यसंस्कृतीची जिभेचे चोचले : हवाहवासा प्रवास जिभेचे चोचले : गल्लीतला ‘खाऊ’ जिभेचे चोचले : पंचतारांकित रसनातृप्ती जिभेचे चोचले : चमचमीत ग्रील आणि बार्बेक्यू जिभेचे चोचले : तरुणाईची हँगआऊट प्लेस जिभेचे चोचले : टूमदार, चटकदार घराची ‘स्टोरी’ जिभेचे चोचले: विलक्षण पाहुणचार जिभेचे चोचले – खाद्यपदार्थांची न्यारी दुनिया ! जिभेचे चोचले : मुंबईतला नवा ट्रेण्ड- मॉडर्न फुड विथ ट्विस्टअधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
भारत
व्यापार-उद्योग
क्राईम
विश्व
Advertisement