एक्स्प्लोर

खादाडखाऊ : परफेक्ट दर्शन

80 च्या दशकाच्या सुरुवातीला पुणे शहरात चना-भटुरा सुरुवात करणारे दर्शन एकमेव हॉटेल असावे (कँपमध्ये बहुदा मोना फुड्स). सध्या या हॉटेलमध्ये मेक्सिकन, इटालियनबरोबरच चायनीज, लेबनीज, थाई डेलिकसी, त्याचबरोबर खास भारतीय चाट कॅटॅगरीमधले रगडा पॅटीस, पापडी चाट, राजमा कटलेट्स, दहीवडा यांना दर्शनमध्ये मानाचे पान मिळतं. शिवाय ताज्या फळांचे ज्युसेस, शेक्स, पल्प, डेझर्ट दर्शनची खासियत आहे.

सत्तरच्या दशकातलं पुणं हॉटेलमध्ये खाण्याच्या बाबतीत देखील बरंच बाळबोध म्हणायला हवं. हॉटेलात जावून खाणे हा प्रकार तोपर्यंत नवीन राहिला नसला; तरी त्या बाबतीत मात्र त्याला फारच मर्यादा होत्या. हॉटेलात जायचं म्हणजे मिसळ, पातळ रस्सा, पुरी-भाजी, भजीसारखे मराठी पदार्थ तरी खायचे. नाहीतर गिन्याचुन्या उडप्यांना भेट देवून इडली, डोसा तरी ‘चेपायचे’. कटलेट्स फक्त मटणची असतात आणि ती फक्त ‘कोरोनेशन दरबार’सारख्या इराणी हॉटेलमध्येच मिळतात, अशी भाबडी समजूत असण्याचा काळ संपूर्णपणे उलटलेला नव्हता. तरी इतर पदार्थांच्या चवी खुणावायला लागल्या होत्या. अशा काळात वयाची विशीही न पाहिलेल्या एका कॉलेजकुमारांनी डेक्कनच्या कोपऱ्यात असलेल्या प्रभात रोड नामक ‘शांत’ भागात एक ‘प्युअर व्हेज’ हॉटेल सुरु केलं. त्या कॉलेजकुमाराचे नाव होतं सीतल आहुजा. गेले एक्केचाळीस वर्ष सुरु असलेल्या त्यांच्या हॉटेलचे नाव आहे ‘दर्शन’. भारताच्या स्वातंत्र्याच्यावेळी झालेली फाळणी भारतीयांच्या मनावर कधी न विसरणारा एक ओरखडा उठवून गेली. विशेषतः उत्तरेकडच्या माणसांशी बोलताना मला त्याचा विशेष परिणाम जाणवत आला. फाळणीनंतर सर्वस्व गमावून भारतात आलेल्या असंख्य पंजाबी कुटुंबांपैकी असलेले एक सीतल अहुजा. फाळणीनंतरच्या धक्क्यातून अहुजा कुटुंब पूर्णपणे सावरलेले नव्हते. त्या ओढग्रतीच्या परिस्थितीनी कॉलेज शिक्षण सुरु झाल्यावर आहुजांना स्वतःचा व्यवसाय सुरु करायला भाग पाडलं. पण फक्त कमी वयात एकट्याने हॉटेल सुरु करण्याच्या धाडसाबरोबरच, आसपासची इतर हॉटेल्स जे देतात त्यापेक्षा ‘हटके’ पदार्थ ‘इंट्रोड्युस’ करणारे अहुजा इथेच वेगळे ठरतात. हॉटेलच्या मेन्यूची सुरुवात केली तो मेन्यूही पुण्याच्या तोपर्यंतच्या हॉटेलमध्ये खाण्याच्या समजुतीला तडा देणारा, म्हणजे व्हेज. कटलेट्स, बर्गर आणि सूप. त्याच्याबरोबर ताज्या फळांचे ज्यूस आणि मिल्क शेक्स. हा मेन्यू पुणेकरांच्या पसंतीला उतरायला फार वेळ गेला नाही. त्यातून आत्मविश्वास वाढलेल्या आहुजांनी त्यानंतर मेन्यूमध्ये ट्रायल्स घेत एकेक पदार्थांची भर घालायला सुरुवात केली. 80 च्या दशकाच्या सुरुवातीला पुणे शहरात चना-भटुरा सुरुवात करणारे दर्शन एकमेव हॉटेल असावे (कँपमध्ये बहुदा मोना फुड्स). पुरी-भाजी क्वचित खाणाऱ्यांच्या समोर जर चन्याबरोबर भलामोठा भटुरा आल्यावर, बहुतेकवेळा त्यांचा भटूऱ्या एवढाच वासला जायचा. आणि एक घास खाल्यावर न बोलता त्याचा आस्वाद घ्यायला सुरुवात होत असे. खादाडखाऊ : परफेक्ट दर्शन मी चुकत नसेन तर इटालीयन पिझा (आपल्या देशी उच्चारात पिझ्झा), मेक्सीकन टॅकोज, नॅशोज, स्फगेटी, बेक्ड व्हेज. सारखे पदार्थ पुणे शहरात आणण्यात, त्यावेळेच्या एकमेव स्टार हॉटेल ‘ब्ल्यू डायमंड’नंतर दर्शनचा नंबर कदाचित सगळ्यात पहिला लागेल. ‘हॉटेल सांभाळत सहज कॉलेज पूर्ण करू’, अशा समजुतीत असलेल्या आहुजा ह्यांची हॉटेल चालवत शिकताना मात्र दमछाक व्हायला लागली. अभ्यासाला वर्षभर वेळ मिळत नसला तरी; परीक्षेच्यावेळी दुपारपासून काम करत, हॉटेल बंद झाल्यावर अभ्यास करुन सकाळी पेपर देत त्यांनी आपले पोस्ट ग्रॅज्युएशनही पूर्ण केलं. अशा परिस्थितीत शिक्षण पूर्ण करणाऱ्याला त्याची किंमत जास्ती चांगली समजू शकते. त्यामुळेच असेल कदाचित पण अहुजा ह्यांनी दर्शनच्या स्टाफमधे आर्थिक परिस्थिती चांगली नसतानाही शिक्षण घेत असलेल्या गरजू विद्यार्थ्यांना नोकऱ्या दिल्या. त्यापैकी अनेकजण आजही त्यांचे आभार मानतात. दर्शनमधला काही स्टाफ तर अगदी तीस वर्ष जुना आहे. त्यात आहुजा ह्यांच्या माणुसकी जपणाऱ्या ह्या स्वभावाचा मोठा वाटा आहे. खादाडखाऊ : परफेक्ट दर्शन दर्शनचं मेन्यूकार्ड जगभरातल्या वेगवेगळ्या पदार्थांनी भरायलाच लागलं. मेक्सिकन, इटालियनबरोबरच चायनीज, लेबनीज, थाई डेलिकसीजसाठी दर्शनची ख्याती वाढत गेली. त्याचबरोबर खास भारतीय चाट कॅटॅगरीमधले रगडा पॅटीस, पापडी चाट, राजमा कटलेट्स, दहीवडा यांना दर्शनमध्ये मानाचे पान मिळाले. त्याबरोबर ताज्या फळांचे ज्युसेस, शेक्स, पल्प, डेझर्ट दर्शनची खासियत बनले. त्यासाठी लागणारा बर्फदेखील दर्शन स्वतःच हॉटेलमध्ये बनवते ही गोष्ट नेहमी जाणाऱ्या अनेकांनाही कदाचित माहिती नसेल. दर्शनमधली स्वच्छता आणि टापटीप आपल्याकडच्या हॉटेलात अभावानेच पाहायला मिळते. खादाडखाऊ : परफेक्ट दर्शन एव्हाना दर्शनला नियमित जाणाऱ्या आता तीन पिढ्या झाल्या आहेत. मी स्वतःही लहानपणापासून साधारण गेले तीस वर्ष दर्शनमध्ये जात असल्याने, मला तिथे गेल्यावर आता नेमकं काय खायचं? हा यक्षप्रश्न पडतो. तो प्रश्न मी कधी पापडी चाट, दहीवडा घेऊन, कधी कोलस्लॉ सलाड, स्टफ्ड मश्रूम्स किंवा तसे नव्यानीच ‘इंट्रोड्युस’ केलेले जॅकेट पोटॅटो घेऊन सोडवतो. वरती दर्शन स्पेशल ‘गुड नाईट’ किंवा ‘मिक्स फ्रुट ट्रीफल’/ पल्प, कॅरॅमल कस्टर्ड (100% एगलेस) घेऊन दर्शनची सांगता करतो. माझ्यासारख्या अनेकांच्या आयुष्यातल्या कित्येक आनंदाच्या प्रसंगाचा ‘दर्शन’ साक्षीदार आहे. तिथल्या एकंदर वातावरणामुळे म्हणा किंवा लहानपणापासून दर्शनची सवय आहे म्हणून म्हणा; रात्री जेवण झाल्यावर सहज म्हणून फक्त ‘मोका’ किंवा ‘कॅप्युचिनो’ घेत गप्पा मारायलाही मला प्रचंड आवडतं. Darshan- custurd दर्शनशी असलेले भावनिक बंध बाजूला ठेऊन एक फुडी, एक निष्पक्ष ब्लॉगर म्हणून तटस्थपणे बघायला गेलं, तर जे पदार्थ खायला पब्लिकला पंचतारांकित हॉटेल्सची वाट धरायला लागायची. ते पदार्थ रेस्टॉरंट लेव्हलला आणणे हे माझ्यामते दर्शनकडून कळत-नकळत झालेले सगळ्यात मोठे काम. तसं पाहायला गेलं तर दर्शनमधले देशविदेशातील अनेक पदार्थ चवीला ‘ऑथेंटीक’ बिलकुल म्हणता येत नाहीत. पण दर्शननी ह्या पदार्थांना ‘इंडियनाईझ्ड’ करून लोकांपुढे पेश केलं, ही त्यांची मोठी खासियत. याबाबतीत जरा अतिशयोक्तीचा आधार घेत, दर्शनची तुलना मी एसडी, आरडी बर्मन, एसजे किंवा ओपी नय्यर ह्यांच्या सारख्या संगीतकारांच्या कामाशी करेन. विदेशी संगीत त्यांनीही कॉपी केलंच की? पण ती कॉपी कधी भ्रष्ट नव्हती. त्या संगीतावर त्यांचे स्वतःचे संस्करण करून विदेशी संगीतही त्यांनी भारतीय मातीतलं बनवून टाकलं. नंतर कॉप्या करणारे अनेक जण आले-गेले पण जुन्या लोकांच्या स्वतःच्या मेलडीमुळे त्याचं नाव आजही ‘लिजंडरी’ म्हणून घ्यावंच लागतं. त्यामुळे माझ्या दृष्टीने विचार केलात तर ‘दर्शन’ पुण्याच्या लेव्हलला कायम ‘लिजंडरी’ दर्जालाच राहील. त्यामुळेच इन्फोसिसचे फाउंडर नारायणमूर्ती,आमीर खान ह्यांच्या सारख्या अनेकांच्या मनात उमेदवारीच्या काळात दिलेल्या भेटी दर्शनच्या आठवणी अजूनही जाग्या आहेत. दर्शनमध्ये चालणारे पदार्थ बघून मेन्यू कॉपी करत अनेक हॉटेल्स पुढे पुण्यात सुरु झाली. पण त्यातल्या एकालाही दर्शनच्या चवीची मात्र कॉपी करता आली नाही. दर्शन इज जस्ट परफेक्ट !
View More

ओपिनियन

Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

Dhule Accident: कांद्याचा ट्रॅक्टर विहिरीत कोसळला, मजुरांच्या चिमुरड्या लेकी पाण्याने तुडुंब भरलेल्या गडप झाल्या, साक्रीमध्ये मन हेलावणारा अपघात
कांद्याचा ट्रॅक्टर विहिरीत कोसळला, मजुरांच्या चिमुरड्या लेकी पाण्याने तुडुंब भरलेल्या गडप झाल्या, साक्रीमध्ये मन हेलावणारा अपघात
Marathi : मुंबईतील मराठी शाळा वाचवण्यासाठी मराठी अभ्यास केंद्र सरसावले, 14 डिसेंबर रोजी परिषद, ठाकरे बंधूंना निमंत्रण
मुंबईतील मराठी शाळा वाचवण्यासाठी मराठी अभ्यास केंद्र सरसावले, 14 डिसेंबर रोजी परिषद, ठाकरे बंधूंना निमंत्रण
Jay Pawar Photo : जय पवार-ऋतुजा पाटील यांचा शाही विवाह, बहरिनमधील खास फोटो समोर
जय पवार-ऋतुजा पाटील यांचा शाही विवाह, बहरिनमधील खास फोटो समोर
IndiGo flight cancellations: 1650 उड्डाणांचे टार्गेट, 138 पैकी 137 डेस्टिनेशन पूर्ववत; आज रात्री 8 पर्यंत रिफंड; इंडिगो संकटावर 10 मोठे अपडेट्स
1650 उड्डाणांचे टार्गेट, 138 पैकी 137 डेस्टिनेशन पूर्ववत; आज रात्री 8 पर्यंत रिफंड; इंडिगो संकटावर 10 मोठे अपडेट्स
ABP Premium

व्हिडीओ

Maharashtra Winter Session Nagpur : उद्यापासून हिवाळी अधिवेशन, तापलं वातावरण Special Report
Jain Muni Kabutarkhana : कबुतरामुळे बिघडलं धर्मकारण, राजकारण Special Report
Maharashtra Politics : महाराष्ट्राच्या दोन्ही सभागृहात विरोधी पक्षनेता का नाही? Special Report
Pune NCP : पुण्यात शरद पवारांची राष्ट्रवादी अजितदादांसोबत जाणार का? Special Report
Smruti & Palash Marriage : स्मृती मानधना- पलाश मुच्छलचं लग्न का मोडलं? Special Report

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Dhule Accident: कांद्याचा ट्रॅक्टर विहिरीत कोसळला, मजुरांच्या चिमुरड्या लेकी पाण्याने तुडुंब भरलेल्या गडप झाल्या, साक्रीमध्ये मन हेलावणारा अपघात
कांद्याचा ट्रॅक्टर विहिरीत कोसळला, मजुरांच्या चिमुरड्या लेकी पाण्याने तुडुंब भरलेल्या गडप झाल्या, साक्रीमध्ये मन हेलावणारा अपघात
Marathi : मुंबईतील मराठी शाळा वाचवण्यासाठी मराठी अभ्यास केंद्र सरसावले, 14 डिसेंबर रोजी परिषद, ठाकरे बंधूंना निमंत्रण
मुंबईतील मराठी शाळा वाचवण्यासाठी मराठी अभ्यास केंद्र सरसावले, 14 डिसेंबर रोजी परिषद, ठाकरे बंधूंना निमंत्रण
Jay Pawar Photo : जय पवार-ऋतुजा पाटील यांचा शाही विवाह, बहरिनमधील खास फोटो समोर
जय पवार-ऋतुजा पाटील यांचा शाही विवाह, बहरिनमधील खास फोटो समोर
IndiGo flight cancellations: 1650 उड्डाणांचे टार्गेट, 138 पैकी 137 डेस्टिनेशन पूर्ववत; आज रात्री 8 पर्यंत रिफंड; इंडिगो संकटावर 10 मोठे अपडेट्स
1650 उड्डाणांचे टार्गेट, 138 पैकी 137 डेस्टिनेशन पूर्ववत; आज रात्री 8 पर्यंत रिफंड; इंडिगो संकटावर 10 मोठे अपडेट्स
सरकार मुजोर आणि बेमुर्वतखोर, विरोधी पक्षनेता नेमला, तर पापं बाहेर येण्याची भीती; विरोधी आमदारांना रुपयाही न देता अर्धा महाराष्ट्र विकलांग केला, भास्कर जाधवांनी महायुतीचे वाभाडे काढले
सरकार मुजोर आणि बेमुर्वतखोर, विरोधी पक्षनेता नेमला, तर पापं बाहेर येण्याची भीती; विरोधी आमदारांना रुपयाही न देता अर्धा महाराष्ट्र विकलांग केला, भास्कर जाधवांनी महायुतीचे वाभाडे काढले
Eknath Shinde : मस्क्युलर डिस्ट्रॉफीग्रस्त मुलांसाठी सरकारचा पाठपुरावा; उपमुख्यमंत्री शिंदेंची 100 इलेक्ट्रिक व्हीलचेअर देण्याची घोषणा
मस्क्युलर डिस्ट्रॉफीग्रस्त मुलांसाठी सरकारचा पाठपुरावा; उपमुख्यमंत्री शिंदेंची 100 इलेक्ट्रिक व्हीलचेअर देण्याची घोषणा
Smriti Mandhanna And Palash Muchhal: लग्न मोडलं, सगळं संपलं! पहिले स्मृतीची पोस्ट, मग पलाशही सगळं बोलून गेला; एकमेकांना अनफॉलोही केलं, नेमकं काय काय घडलं?
सगळं संपलं! पहिले स्मृतीची पोस्ट, मग पलाशही सगळं बोलून गेला; एकमेकांना अनफॉलोही केलं, काय घडलं?
Palash Muchhal: 'त्यांच्यावर कडक कायदेशीर कारवाई करणार'! पलाश मुच्छलकडूनही स्मृतीशी लग्न मोडल्याचं जाहीर, पण जाता जाता गंभीर इशारा कोणाला दिला?
'त्यांच्यावर कडक कायदेशीर कारवाई करणार'! पलाश मुच्छलकडूनही स्मृतीशी लग्न मोडल्याचं जाहीर, पण जाता जाता गंभीर इशारा कोणाला दिला?
Embed widget