(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Vastu Tips : घरात पडलेल्या 'या' तीन गोष्टींमुळे होतात वास्तुदोष, घरात वाद आणि ऑफिसमध्ये खावे लागते बोलणे
vastu tips : वास्तुदोष दूर केल्याने घरात सुख, समृद्धी आणि शांती राहते, कुटुंब सुखी राहते आणि घरात सकारात्मक ऊर्जा संचारते. वास्तुशास्त्रानुसार अशा काही गोष्टी घरात पडून असतात ज्यामुळे घरामध्ये वास्तुदोष निर्माण होतात.
Vastu Tips : वास्तुशास्त्र अशी एक पद्धत आहे ज्यामध्ये घराच्या आत किंवा बाहेरील दोष दूर करण्यासाठी उपाय सांगितले आहेत. वास्तुदोष दूर केल्याने घरात सुख, समृद्धी आणि शांती राहते, कुटुंब सुखी राहते आणि घरात सकारात्मक ऊर्जा संचारते. वास्तुशास्त्रानुसार अशा काही गोष्टी घरात पडून असतात ज्यामुळे घरामध्ये वास्तुदोष निर्माण होतात. यामुळे घरामध्ये नकारात्मक ऊर्जा पसरते ज्यामुळे कुटुंबाची प्रगती थांबते, घरात अशांततेचे वातावरण निर्माण होते. चला जाणून घेऊया घरातील कोणत्या गोष्टींमुळे वास्तुदोष होतात.
फुलांची आवड असणारे बरेच लोक आहेत. ते आपले घर फुलांनी सजवतात. घरातील मंदिरात देवतांना फुलांचा हार घालतात किंवा त्यांना फुले अर्पण करतात. अशा वेळी या लोकांनी लक्षात ठेवावे की घरात कधीही कोमेजलेले फूल राहू नये. जी फुले सुकली आहेत किंवा सुकत आहेत, ती घरातून काढून टाकावीत. घरामध्ये नेहमी ताजी फुले ठेवा कारण सुकलेली फुले नकारात्मकता वाढवतात.
झाडे आणि फुले घरामध्ये सकारात्मक उर्जेचा कारक मानली जातात. तसेच ही झाडे घराचे सौंदर्य देखील वाढवतात. अशा परिस्थितीत घरातील झाडांची योग्य काळजी घेणे अत्यंत आवश्यक आहे. जर एखादे फूल सुकले तर ते काढून टाका.
घर असो वा ऑफिसमध्ये गुंजलेल्या तारा, खराब झालेले इलेक्ट्रॉनिक उपकरण ठेवू नका, कारण वास्तुशास्त्रात ते अशुभ मानले गेले आहे. वास्तुशास्त्रानुसार या गोष्टींमुळे नकारात्मक ऊर्जा वाढते, जी प्रगती आणि संपत्तीमध्ये अडथळा बनते.
वास्तुशास्त्रानुसार, हिंसक प्राणी किंवा ताजमहाल यांचे चित्र कधीही घरात ठेवू नये कारण यामुळे घरात तणाव आणि आपापसात दुरावा निर्माण होतो.
(टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही. यासाठी संबंधित तज्ज्ञाचा सल्ला घ्यावा.)
महत्वाच्या बातम्या :