Vastu Tips : घरामध्ये चुकूनही असे फोटो लावू नका, कुटुंबात होतात वाद
Vastu Tips : घरामध्ये प्रत्येक गोष्ट ठेवण्यासाठी निश्चित दिशा देण्यात आली आहे. वास्तूनुसार, विशिष्ट प्रकारची चित्रे आणि फोटो घरात आशीर्वाद आणण्याचे काम करतात, तर काही चित्रे अशुभ मानली जातात.
Vastu Tips : प्रत्येक जण आपले घर सुंदर दिसण्यासाठी ते विविध वस्तूंनी सजवण्याचा प्रयत्न करत असतो. त्यासाठी आपण प्राणी, पक्षी यांच्यासह विविध कलाकृतींचे फोटो घरामध्ये लावत असतो. परंतु, या वस्तू जर योग्य ठिकाणी ठेवल्या नाहीत तर त्याचा आपल्या जीपणावर वाईट परिणाम होतो, असे म्हटले जाते.
वास्तुशास्त्रानुसार घरात ठेवलेल्या प्रत्येक गोष्टीचा परिणाम व्यक्तीच्या जीवनावर होतो. घरामध्ये प्रत्येक गोष्ट ठेवण्यासाठी निश्चित दिशा देण्यात आली आहे. वास्तूनुसार, विशिष्ट प्रकारची चित्रे आणि फोटो घरात आशीर्वाद आणण्याचे काम करतात, तर काही चित्रे अशुभ मानली जातात. वास्तूनुसार घराच्या भिंतींवर हे लावल्याने नकारात्मक शक्ती घरात राहतात. चला जाणून घेऊया घरात कोणती चित्रे अजिबात लावू नयेत.
अशी चित्रे घरी ठेवू नका
- बरेच लोक प्रेमाचे प्रतीक म्हणून ताजमहालचा फोटो किंवा शो पीस घरात लावतात. परंतु, ताजमहालचा फोटो घरात लावणे अशुभ मानले जाते. वास्तूनुसार ज्या घरात ताजमहालचा फोटो ठेवला जातो, त्या घरात नकारात्मक उर्जेचा संचार होतो.
- घरामध्ये असे कोणतेही चित्र लावू नये की ज्यामध्ये युद्ध आणि हिंसा दिसत असेल. यामुळे घरामध्ये महाभारताचे चित्र लावणे अशुभ मानले जाते. ज्या घरात महाभारताचे चित्र असते, त्या घरातील सदस्यांमध्ये दुरावा कायम असतो.
- घरामध्ये अशी चित्रे लावणे टाळा ज्यामध्ये काहीतरी बुडताना दिसत आहे. उदाहरणार्थ, मावळतीचा सूर्य, बुडणारी बोट किंवा जहाज. अशा चित्रांमुळे घरातील सदस्यांच्या मनात दुःख येते आणि घरातून सकारात्मक ऊर्जा निघून जाते.
- वास्तूनुसार घरामध्ये जंगली प्राण्यांची चित्रे लावणे देखील टाळावे. अशी चित्रे घरात हिंसाचार वाढवण्याचे काम करतात. ज्या घरात अशी चित्रे असतात, त्या घरात नेहमी अशांती आणि कलह राहतो. या घरातील सदस्यांचे वर्तनही हिंसक होते.
- वास्तूनुसार धबधब्यांची चित्रे घराच्या आर्थिक स्थितीवर वाईट परिणाम करतात. वाहत्या पाण्याप्रमाणे पैसाही घराबाहेर जाऊ लागतो आणि घरात उधळपट्टी वाढते असे म्हणतात.
(टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.)
संबंधित बातम्या