Vastu Tips For Mirror : उत्तर की पूर्व घरातील आरसा नेमका कोणत्या दिशेला असावा? जाणून घ्या वास्तूशास्त्रात काय म्हटलंय...
Vastu Tips For Mirror : असं म्हणतात की, वास्तूनुसार आरसा लावल्याने घरात सुख-समृद्धीसह आरोग्यही चांगलं राहते. त्यामुळेच, वास्तूनुसार घरातील आरसा लावण्याची योग्य पद्धत आणि योग्य दिशा कोणती ते जाणून घेऊयात.
Vastu Tips For Mirror : आरसा ही एक अशी वस्तू आहे जी जवळपास प्रत्येक घरात असतेच. खरंतर आरश्याचा वापर अनेक कामांसाठी केला जातो. कला आणि मनोरंजन क्षेत्रात, सजावटीसाठी , आपलं स्वत:चं प्रतिबिंब बघण्यासाठी या सगळ्या कामांसाठी केला जातो. पण, तसं बघाला गेलं तर प्रामुख्याने आरश्याचा वापर प्रतिबिंब पाहण्यासाठी केला जातो.
वास्तूशास्त्रात सांगितल्याप्रमाणे, घरातील आरश्याच्या संदर्भात अनेक मान्यता आहेत. असं म्हणतात की, वास्तूनुसार आरसा लावल्याने घरात सुख-समृद्धीसह आरोग्यही चांगलं राहते. त्यामुळेच, वास्तूनुसार घरातील आरसा लावण्याची योग्य पद्धत आणि योग्य दिशा कोणती ते जाणून घेऊयात.
आरश्याची योग्य दिशा कोणती?
आपल्या सर्वांनाच माहीत आहे की, वास्तूशास्त्रात आरश्याच्या दिशेला फार महत्त्व आहे. वास्तूशास्त्रानुसार, सकारात्मक ऊर्जेचा प्रवाह नेहमी पूर्व आणि उत्तर दिशेपासून येतो. घरात आरसा लावताना नेहमी एका गोष्टीची काळजी घेणं गरजेचं आहे की आरसा हा कधीच एकमेकांसमोर नसावा. असे केल्याने घरात नकारात्मक ऊर्जेचा वावर होतो.
तसेच, घरात आरसा लावताना तो 4 ते 5 फीट उंचीवर असावा. या व्यतिरिक्त तुमच्या बेडशेजारी मोठा आरसा किंवा साईड टेबल लावणं फार शुभ मानलं जातं. तसेच, एका गोष्टीची काळजी घेतली पाहिजे की, झोपताना तुमचा कोणताही अवयव आरश्यात दिसता कामा नये.
बेडरूममध्ये आरसा लावू नका
वास्तूशास्त्रानुसार, कधीही बेडरूममध्ये आरसा लावू नये. असे केल्याने वैवाहिक जीवनात एकमेकांप्रति विश्वास कमी होतो. तसेच, पती-पत्नीमध्ये अनेक गोष्टींवरून मतभेद वाढतात. तसेच, पती-पत्नीला स्वास्थ्यासंबंधित समस्या देखील उद्भवू लागतात.
आरश्याचा आकार कसा असावा?
आरसा विकत घेताना नेहमी त्याच्या आकाराकडे विशेष लक्ष देणं गरजेचं आहे. मान्यतेनुसार, तुम्ही चौकोन किंवा आयताकार आकाराचा आरसा वापरू शकता.
आरसा लावताना 'या' गोष्टींची काळजी घ्या
- आरसा नियमित स्वच्छ करत राहा. जेणेकरून, तुमचा चेहरा अगदी स्पष्ट दिसेल.
- तुमच्या घरात उत्तर किंवा पूर्व दिशेला आरसा किंवा काचेची वस्तू ठेवा.
- तुमच्या घरातील आरशाची उंची कमीत कमी चार ते पाच फीट उंच असेल याची खात्री करा.
- मुलांच्या स्टडी टेबलजवळ आरसा लावू नका. यामुळे त्यांचं अभ्यासाकडे दुर्लक्ष होऊ शकतं.
(टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.)
हेही वाचा :