Numerology : कॉन्फिडन्स आणि मेहनतीचं कॉम्बिनेशन असतात 'या' जन्मतारखेचे लोक; वयाच्या चाळीशीनंतर गाठतात यशाचं शिखर, पदरात पडतं पुण्य
Numerology of Mulank 1 and 9 : प्रत्येक व्यक्तीचा मूलांक हा एका स्वामी ग्रहाशी जोडला जातो. तसेच, आज आपण मूलांक 1 आणि 9 च्या व्यक्तींविषयी बोलणार आहोत.

Numerology of Mulank 1 and 9 : अंकशास्त्रात (Ank Shastra) सांगितल्याप्रमाणे, प्रत्येक व्यक्तीची आपली एक खासियत असते. व्यक्तीचं हे वैशिष्ट्य त्याच्या जन्मतारीख, राशी आणि ग्रहांच्या स्थितीवरुन ओळखता येतं. जेव्हा या सगळ्या गोष्टींचा ताळमेळ जुळून येतो तेव्हा व्यक्तीचं रातोरात नशीब पालटतं. अशाच मूलांकाविषयी (Mulank) आपण जाणून घेणार आहोत.
मूलांकाचा प्रत्येक व्यक्तीच्या जीवनावर वेगवेगळा प्रभाव दिसून येतो. त्यानुसार, प्रत्येक व्यक्तीचा मूलांक हा एका स्वामी ग्रहाशी जोडला जातो. तसेच, आज आपण मूलांक 1 आणि 9 च्या व्यक्तींविषयी बोलणार आहोत.
कोणत्याही महिन्याच्या 1, 10, 19 आणि 28 तारखेला जन्मलेल्या लोकांचा मूलांक 1 असतो. तर, कोणत्याही महिन्याच्या 9, 18 आणि 27 तारखेला जन्मलेल्या लोकांचा मूलांक 9 असतो. मूलांक 1 चा स्वामी ग्रह सूर्य आहे. तर, मूलांक 9 चा स्वामी ग्रह मंगळ आहे. ज्योतिषशास्त्रात हे दोन्ही ग्रह फार शक्तिशाली मानले जातात. त्यानुसार, या जन्मतारखेच्या लोकांचा स्वभाव नेमका कसा असतो या संदर्भात अधिक माहिती जाणून घेऊयात.
प्रचंड मेहनती आणि आत्मविश्वासू असतात
अंकशास्त्रात सांगितल्याप्रमाणे, मूलांक 1 आणि 9 च्या लोकांची पर्सनालिटी फार चांगली असते. यांच्यात प्रचंड प्रमाणात आत्मविश्वास असतो. तसेच, हे लोक फार मेहनती आणि हुशार असतात. आपल्या मेहनतीच्या जोरावर हे यश संपादन करतात.
कधीच हार मानत नाहीत
अंकशास्त्रानुसार, मूलांक 1 आणि 9 असलेले लोक योद्धा असतात. हे लोक कधीच हार मानत नाहीत. तसेच, या जन्मतारखेच्या लोकांनी कोणत्याही क्षेत्रात पाऊल ठेवलं तरी ते आपली वेगळी ओळख निर्माण करतात. समाजात देखील चारचौघांत वावरताना याचा हटके स्वभाव दिसून येतो. या जन्मतारखेचे लोक अपयशाला कवटाळून न धरता सकारात्मक विचारसरणीवर भर देतात. तसेच, मेहनतीवर लक्ष केंद्रित करण्यात यांचा फोकस असतो.
वयाच्या चाळीशीनंतर मिळतं यश
या जन्मतारखेचे लोक हे हुशार, आत्मविश्वासू आणि मेहनती जरी असले तरी यांना वयाच्या एका टप्प्यानंतर भरभरुन यश मिळतं. अनेकदा वयाच्या चाळीशीनंतर यांच्या नशिबाचे दार उघडतात आणि लोकांच्या मनावर राज्य करतात.
हे ही वाचा :
(टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.)




















