Vastu Tips: घरातील नकारात्मकता दूर करण्याठी घरी आणा 'या' वस्तू; होईल धनलाभ, सुख-शांति नांदेल
Vastu Tips: आर्थिक लाभासाठी, प्रगतीसाठी, कलह दूर करण्यासाठी आणि घरातील सकारात्मकतेसाठी वास्तू शास्त्रात काही उपाय सांगितले गेले आहेत. काही वस्तू घरात आणून तुम्ही नकारात्मकरता दूर करू शकता.

Vastu Tips: घरातील नकारात्मकता दूर करण्यासाठी फेंगशुई ही एक प्राचीन चीनी परंपरा फॉलो केली जाते. फेंग-शुईचा वापर घरात केल्याने जीवनात अनेक चांगल्या गोष्टी घडायला लागतात. फेंग-शुईमध्ये दिलेल्या टिप्स खूप प्रभावी मानल्या जातात, यामुळे घरातील नकारात्मकता दूर होते. यात काही वस्तूंचा वापर करून सकारात्मक ऊर्जा निर्माण केली जाते.
लकी बांबू
बांबूचं झाड घरासाठी शुभ मानलं जातं. काचेच्या ग्लासातील छोटे लकी बांबू हे नशिबासाठी चांगले मानले जातात. घराच्या पूर्व कोपऱ्यात बांबूचं झाड ठेवल्याने घरात सुख-समृद्धी टिकून राहते आणि घरात सकारात्मक ऊर्जा पसरते. जर तुम्हाला कुटुंबात सुख-समृद्धी नांदावी असं वाटत असेल तर हे लकी बांबू पूर्वेकडे ठेवा आणि जर तुम्हाला कुटुंबाकडे पैसे आकर्षित करायचे असतील तर आग्नेय दिशेला ठेवा.
लाफिंग बुद्धा
चेहऱ्यावर हास्य आणण्यासाठी लाफिंग बुद्धाकडे एक नजर पुरेशी आहे. आनंदी दिसणारा हा फेंग शुई आयटम जीवनात सकारात्मकता वाढवतो. तुमच्या करिअरमध्ये प्रगती करण्यासाठी आणि पदोन्नतीसाठी तुम्ही लाफिंग बुद्धा घरी आणला पाहिजे. कार्यालयात किंवा घरात दोन्ही हात वर करुन असलेली लाफिंग बुद्धाची मूर्ती स्थापल्याने घरात सुख-समृद्धी कायम राहते आणि प्रगतीचा मार्ग खुला होतो. हे लाफिंग बुद्धा ऑनलाईन आणि ऑफलाईन मिळतात.
विंड चाईम
घरात नेहमी कलहाचं वातावरण असेल आणि घरातील सदस्यांमध्ये भांडणं होत असतील, तर याचं एक कारण घरात असलेली नकारात्मक ऊर्जा असू शकतं. म्हणून तुमच्या घरात सकारात्मक ऊर्जा आकर्षित करण्यासाठी तुम्ही विंड चाईम आणू शकतात. विंड चाईम हे लहान झुंबरासारखं असतं, यातून सकारात्मक ऊर्जा प्रवाहित होते, घरात सुख-समृद्धी नांदते.
मनी टॉड (फेंगशुई बेडूक)
जर तुम्ही आर्थिक समस्यांनी घेरलेले असाल तर आजच घरी फेंगशुई बेडूक आणा. फेंगशुई बेडूक घरात ठेवणं खूप भाग्याचं समजलं जातं, जे घरातील आर्थिक समस्या सोडवतं. या बेडकाच्या तोंडात किंवा आजूबाजूला पसरलेली अशी पैशांची नाणी असतात. या बेडकामुळे धन प्राप्ती होते, कुटुंबावरील दरिद्री कमी होते, असं मानलं जातं.
(टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.)
हेही वाचा:
Shani Margi: 2024 मध्ये 'या' राशींना बसणार शनीची झळ; चुकूनही करू नका 'हे' काम




















