Surya Grahan 2025 : सूर्यग्रहणाच्या दिवशी 'या' वस्तूंचं दान करणं शुभ मानतात; वाचा ज्योतिष शास्त्रानुसार धार्मिक महत्त्व
Surya Grahan 2025 : हिंदू धर्मात सूर्यग्रहणाचा काळ हा अशुभ काळ मानला जातो. याचा अनेकदा नकारात्मक प्रभाव अनेकदा पडण्याची शक्यता असते. यासाठीच, या दिवशी शुभ कार्य आणि पूजा, विधी करणं गरजेचं आहे.

Surya Grahan 2025 : हिंदू धर्मशास्त्रानुसार, सध्या पितृपक्ष (Pitru Paksha 2025) पंधरवडा सुरु आहे. या दरम्यान सर्वपित्री अमावस्येच्या दिवशी म्हणजेच पितृपक्षाच्या शेवटच्या दिवशी 2025 वर्षातलं शेवटचं सूर्यग्रहण (Surya Grahan 2025) लागणार आहे. हिंदू धर्मात सूर्यग्रहणाचा काळ हा अशुभ काळ मानला जातो. याचा अनेकदा नकारात्मक प्रभाव अनेकदा पडण्याची शक्यता असते. यासाठीच, या दिवशी शुभ कार्य आणि पूजा, विधी करणं गरजेचं आहे. ज्योतिष शास्त्रानुसार, सूर्यग्रहणातकाही गोष्टींचं दान करणं शुभ मानलं जातं.
सूर्यग्रहणाच्या दिवशी दिन करण्याचं महत्त्व (Importance of fasting on the day of a Solar Eclipse)
धार्मिक मान्यतेनुसार, ग्रहण काळात वातावरणात नकारात्मतक शक्ती सक्रिय होऊ शकतात. या नकारात्मक शक्ती कमी करण्यासाठी जीवनात सुख शांती आणण्यासाठी दान करणं गरजेचं आहे. असे केल्याने नकारात्मक प्रभावांपासून मुक्ती मिळते.
पापांपासून मुक्ती मिळते
ज्योतिष शास्त्रानुसार, ग्रहण काळात केलेल्या दानाने मागच्या जन्माच्या पापांपासून मुक्ती मिळते. यामुळे तुमचा आत्मा पवित्र राहतो.
ग्रहदोषांपासून मुक्ती
अनेकदा व्यक्तीच्या कुंडलीत सूर्य किंवा चंद्राशी संबंधित दोष असतात. ग्रहण काळात सूर्याशी संबंधित वस्तूंचं दान केल्याने दोषांपासून मुक्ती मिळते. आणि जीवनात सकारात्मकता येते.
आर्थिक समृद्धी
मान्यतेनुसार, ग्रहण काळात केलेल्या दानाने व्यक्ती आर्थिकदृष्ट्या समृद्ध होतो. तसेच, दान केल्याने देवी लक्ष्मी प्रसन्न होते.
पुण्याचं फळ मिळतं
धार्मिक शास्त्रात सांगितल्याप्रमाणे, ग्रहण काळात केलेल्या दानाने हजारो वर्षांचे यज्ञ आणि तीर्थ यात्रेच्या बरोबर पुण्य देते.
सूर्यकाळात कोणत्या वस्तूंचं दान करणं शुभ असतं?
गहू आणि गूळ - या दोन्ही गोष्टी सूर्याचं प्रतिनिधीत्व करतात. हे दान केल्याने तुमच्या मान-सन्मानात वाढ होते. तसेच, नोकरी-व्यवसायात प्रगती होते.
तांब्याची भांडी - तांबे हे सूर्याचं धातू मानलं जातं. तांब्याच्या नाण्याचं दान केल्याने कुंडलीतील सूर्याची स्थिती मजबूत होते. तसेच, आरोग्याशी संबंधित समस्यांपासून मुक्ती मिळते.
लाल वस्त्र - लाल रंग हा सूर्याचा प्रिय रंग आहे. लाल वस्त्र, विशेषत: गरीब आणि गरजूंना दान केल्याने व्यक्तीच्या आत्मविश्वासात वाढ होते.
काळे तीळ - ज्योतिष शास्त्रानुसार, ग्रहण काळात तिळाचं दान राहू-केतू आणि शनीच्या अशुभ परिणामांना कमी करता येते.
(टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.)
हे ही वाचा :




















