Surya Grahan 2023: 20 एप्रिलला वर्षातील पहिले सूर्यग्रहण, या राशींना मिळतील शुभ परिणाम! ज्योतिषशास्त्रात म्हटलंय...
Solar Eclipse 2023: 2023 चे पहिले सूर्यग्रहण 20 एप्रिल रोजी सकाळी होणार आहे. हे ग्रहण काही राशीच्या लोकांसाठी खूप शुभ असणार आहे. जाणून घ्या त्या राशींबद्दल.

Solar Eclipse 2023: विज्ञानासोबतच ज्योतिषशास्त्रातही सूर्यग्रहण खूप महत्त्वाचे मानले गेले आहे. वर्षातील पहिले सूर्यग्रहण 20 एप्रिल रोजी होणार आहे. वैज्ञानिकदृष्ट्या, सूर्यग्रहण ही खगोलीय घटना आहे, परंतु ज्योतिषशास्त्रानुसार, या ग्रहणाचा सर्व राशींवर परिणाम होतो. 2023 चे पहिले सूर्यग्रहण 20 एप्रिल रोजी सकाळी 7.04 ते दुपारी 12.29 या वेळेत होणार आहे. हे ग्रहण काही राशीच्या लोकांसाठी खूप शुभ असणार आहे. जाणून घ्या त्या राशींबद्दल.
हे सूर्यग्रहण भारतात दिसणार का?
2023 चे पहिले सूर्यग्रहण 20 एप्रिल रोजी सकाळी 7.04 ते दुपारी 12.29 या वेळेत होणार आहे. हे ग्रहण कंबोडिया, चीन, अमेरिका, सिंगापूर, थायलंड, अंटार्क्टिका, ऑस्ट्रेलिया, व्हिएतनाम, तैवान, इंडोनेशिया, फिलीपिन्स, दक्षिण हिंद महासागर आणि न्यूझीलंडमध्ये दिसणार आहे. ज्योतिषशास्त्रानुसार हे सूर्यग्रहण भारतात दिसणार नाही. त्यामुळे त्याचा सुतक काळही भारतात वैध असणार नाही. हे ग्रहण गुरुवारी होणार असून ते कंकणाकृती सूर्यग्रहण असेल. वर्षातील पहिले ग्रहण मेष आणि अश्विनी नक्षत्रात होईल. मेष ही सूर्याची उच्च राशी आहे आणि अश्विनी हे केतूचे नक्षत्र आहे, त्यामुळे या ग्रहणाचा प्रभाव दिसून येईल. हे ग्रहण काही राशींसाठी शुभ असणार आहे.
सर्वाधिक परिणाम काही राशींवर दिसून येईल
वर्षातील पहिले सूर्यग्रहण ज्योतिषशास्त्राच्या दृष्टिकोनातून अत्यंत महत्त्वाचे मानले जाते. हे सूर्यग्रहण खग्रास सूर्यग्रहण असेल. सूर्यग्रहणानंतर गुरू या शुभ ग्रहाच्या राशीत बदल होईल, ज्यामुळे सूर्यग्रहणाचा प्रतिकूल प्रभाव कमी होईल, परंतु त्याचा सर्वाधिक परिणाम काही राशींवर दिसून येईल. जाणून घ्या
वृषभ
वृषभ राशीच्या लोकांसाठी सूर्यग्रहण खूप शुभ परिणाम घेऊन येत आहे. वृषभ राशीच्या लोकांना सूर्यग्रहणाचे सकारात्मक परिणाम पाहायला मिळतील. तुमचा पगार वाढण्याची शक्यता आहे. तसेच तुमच्या कार्यक्षेत्रात पदोन्नती मिळण्याची शक्यता आहे.
मिथुन
वर्षातील पहिले सूर्यग्रहण मिथुन राशीच्या लोकांसाठी खूप चांगले असणार आहे. या राशीच्या राशीच्या लोकांना अचानक आर्थिक लाभ होण्याची शक्यता आहे. या राशीचे लोक जे व्यवसाय करतात, त्यांच्या व्यवसायात वाढ होऊ शकते.
धनु
धनु राशीच्या लोकांबद्दल बोलायचे झाले तर हे सूर्यग्रहण तुमचे नशीब उजळविणारे ठरेल. या ग्रहणात तुम्हाला नशिबाची पूर्ण साथ मिळेल. क्षेत्र आणि व्यवसायात लाभाच्या नवीन संधी मिळू शकतात. यासोबतच तुमचे वैवाहिक आणि कौटुंबिक जीवनही आनंदी राहील.
(टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही. यासाठी संबंधित तज्ज्ञाचा सल्ला घ्यावा.)
इतर बातम्या
Mahashivratri 2023: महाशिवरात्रीला महादेवाला बेलपत्र अर्पण केल्याने काय होते? ज्योतिषतज्ज्ञांकडून जाणून घ्या
महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज
