एक्स्प्लोर

Surya Grahan 2022: वर्षातील शेवटच्या सूर्यग्रहणाचा या दिवाळी आणि गोवर्धन पूजेवर काय परिणाम होईल? जाणून घ्या

Surya Grahan 2022: सूर्यग्रहणाचा सुतक कालावधी सूर्यग्रहण सुरू होण्याच्या 12 तास आधी सुरू होतो आणि सूर्यग्रहण संपल्यानंतर संपतो.

Surya Grahan 2022: यंदाचे सूर्यग्रहण 25 ऑक्टोबरला होणार आहे. त्याच वेळी, दिवाळी सण 24 ऑक्टोबर 2022 रोजी येत आहे आणि गोवर्धन पूजा 25 ऑक्टोबर रोजी येत आहे. ज्योतिषांच्या मते, सूर्यग्रहण भारतीय वेळेनुसार 25 ऑक्टोबर रोजी दुपारी 04:29 पासून सुरू होईल आणि 05:24 पर्यंत राहील.

दिवाळी 2022 आणि गोवर्धन पूजा 2022 कधी आहे?
दिवाळी दरवर्षी कार्तिक अमावस्येला साजरा केला जाते. पंचांगानुसार, कार्तिक अमावस्या तिथी 24 ऑक्टोबर 2022 रोजी संध्याकाळी 05:29 पासून सुरू होईल आणि 25 ऑक्टोबर 2022 रोजी दुसऱ्या दिवशी 04:20 पर्यंत राहील. यंदा दिवाळीचा सण 24 ऑक्टोबरला साजरा होणार आहे. दिवाळीच्या दुसऱ्या दिवशी कार्तिक शुक्ल प्रतिपदेला गोवर्धन पूजा आणि अन्नकूट उत्सव साजरा केला जातो. याला पाडवा असेही म्हणतात. पंचांगानुसार या दिवशी प्रदोष व्रतही पाळले जाते. प्रदोष व्रत पूजेची वेळ संध्याकाळी 05:50 ते रात्री 08:22 पर्यंत आहे. यावेळी भक्त प्रदोष व्रताची पूजा करू शकतात.

सूर्यग्रहण 2022 चा सुतक कालावधी

25 ऑक्टोबर रोजी होणारे या वर्षातील शेवटचे सूर्यग्रहण सुतक कालावधीसाठी वैध राहणार नाही. कारण हे सूर्यग्रहण भारतात दिसणार नाही. तसे, सूर्यग्रहणाचा सुतक कालावधी सूर्यग्रहण सुरू होण्याच्या 12 तास आधी सुरू होतो आणि सूर्यग्रहण संपल्यानंतर संपतो. त्यामुळे दिवाळीच्या रात्री 2 वाजल्यापासून सूर्यग्रहणाचा सुतक कालावधी सुरू होणार आहे.

वर्षातील शेवटचे सूर्यग्रहण कुठे दिसणार?
2022 वर्षातील दुसरे आणि शेवटचे सूर्यग्रहण युरोप, आफ्रिका खंडाचा ईशान्य भाग, आशियाचा नैऋत्य भाग आणि अटलांटिकमध्ये दिसणार आहे. हे सूर्यग्रहण भारतात दिसणार नाही.

सूर्यग्रहण 2022 चा दिवाळी आणि गोवर्धन पूजेवर काय परिणाम होणार? 
24 ऑक्टोबरला दिवाळी आहे, तर दुसऱ्या दिवशी 25 ऑक्टोबरला सूर्यग्रहण होणार आहे. अशा स्थितीत सूर्यग्रहणाचा दिवाळीच्या सणावर कोणताही परिणाम होणार नाही. दिवाळीच्या दुसऱ्या दिवशी गोवर्धन पूजा साजरी केली जाते. यावरही सूर्यग्रहणाचा कोणताही परिणाम होणार नाही कारण हे सूर्यग्रहण भारतात दिसणार नाही.

(टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही. यासाठी संबंधित तज्ज्ञाचा सल्ला घ्यावा.) 

महत्वाच्या बातम्या :

Ashwattha Maruti Poojan 2022 : श्रावणातील शनिवार म्हणजे अश्र्वत्थ मारूती पूजनाचा दिवस; काय आहे यामागची आख्यायिका? जाणून घ्या

Lucky zodiac sign : 'या' तीन राशीच्या लोकांना प्रत्येक गोष्टीत नशीब देते साथ

 

 

 

महत्त्वाच्या बातम्या

Shani Dev: शनिदेव 'या' 2 राशींचे स्वामी! उशीराने कृपा, पण राजासारखं जीवन! पैसा, नोकरी, प्रेमात यू-टर्न, ज्योतिषशास्त्र...
शनिदेव 'या' 2 राशींचे स्वामी! उशीराने कृपा, पण राजासारखं जीवन! पैसा, नोकरी, प्रेमात यू-टर्न, ज्योतिषशास्त्र...
Shardiya Navratri 2026: नवरात्रीत कुलदेवतेचं दर्शन घेणं आवश्यक असतं का? ओटी कधी आणि कशी भराल? उपासना कशी करावी? धार्मिक महत्त्व, परंपरा...
नवरात्रीत कुलदेवतेचं दर्शन घेणं आवश्यक असतं का? ओटी कधी आणि कशी भराल? उपासना कशी करावी? धार्मिक महत्त्व, परंपरा...
Shardiya Navratri 2026: नवरात्रीचे 9 दिवस कडक उपवास शक्य नसेल तर? उपवास करताना काय काळजी घ्याल? उपवासाचे महत्त्व, पर्याय जाणून घ्या...
नवरात्रीचे 9 दिवस कडक उपवास शक्य नसेल तर? उपवास करताना काय काळजी घ्याल? महत्त्व, पर्याय जाणून घ्या...
Shani Sade Sati: एक 'अशी' रास, 2027 पर्यंत पैसा, नोकरीत सावधान! शनिची साडेसाती कुठल्याही क्षणी अडचणी वाढवणार, 'या' गोष्टी टाळा, ज्योतिषशास्त्र
एक 'अशी' रास, 2027 पर्यंत पैसा, नोकरीत सावधान! शनिची साडेसाती कुठल्याही क्षणी अडचणी वाढवणार, 'या' गोष्टी टाळा, ज्योतिषशास्त्र

व्हिडीओ

Abhijeet Dipke vs Delhi Police : दिपके, पोलीस भिडले; कोण कुणाला नडले? | Special Report ABP Majha
Sunetra Pawar Speech : अजित पवारांचे नाव घेताना सुनेत्रा पवार भावुक, भावनिक भाषण
MPSC Protest Pune: पुण्यातील तिन्ही आंदोलनं कशी गुंडाळली?; Inside Story
Shetitil Navdurga | Swati Kushare |‘शेतकरी’ म्हणवून घेण्याचा संकोच होता… आज त्याच ओळखीचा अभिमान आहे!
Majha Katta Dr. Abhijit Joshi : जेवण कसं जेवावं?नियम काय? आयुर्वेदात काय? डॉ.अभिजीत जोशी माझा कट्टावर | ABP Majha

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Ahilyadevi Holkar Karjmukti Yojana 3rd List : शेतकरी कर्जमुक्तीची तिसरी यादी जाहीर, साडेतीन लाख शेतकऱ्यांना थेट लाभ; लाभार्थ्यांची नावं कुठे पाहाल?
शेतकरी कर्जमुक्तीची तिसरी यादी जाहीर, साडेतीन लाख शेतकऱ्यांना थेट लाभ; लाभार्थ्यांची नावं कुठे पाहाल?
सोमेश्वर कारखाना निवडणुकीत एकतर्फी विजय; सुनेत्रा पवार भावुक, जय स्मृतीस्थळावर, पार्थ पवारांनाही आनंद
सोमेश्वर कारखाना निवडणुकीत एकतर्फी विजय; सुनेत्रा पवार भावुक, जय स्मृतीस्थळावर, पार्थ पवारांनाही आनंद
मतदार यादीतील नाव नोंदणीस आणखी मुदतवाढ; SIR प्रक्रियेत नाव वगळलेल्यांना संधी, निवडणूक आयोगाचा निर्णय
मतदार यादीतील नाव नोंदणीस आणखी मुदतवाढ; SIR प्रक्रियेत नाव वगळलेल्यांना संधी, निवडणूक आयोगाचा निर्णय
धक्कादायक! चिमुकल्या बाळाचे अपहरण करुन विक्री; महिलांची टोळी अटकेत, गुजरातला नेणार असल्याचं तपासातून समोर
धक्कादायक! चिमुकल्या बाळाचे अपहरण करुन विक्री; महिलांची टोळी अटकेत, गुजरातला नेणार असल्याचं तपासातून समोर
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 12 ऑक्टोबर 2026 | सोमवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 12 ऑक्टोबर 2026 | सोमवार
विरोधी पक्षांचा पहिल्यांदाच सुप्रीम कोर्टावर विराट मोर्चा, अभूतपूर्व एकजुटीने दिल्ली दणाणली; राहुल, अखिलेश यादवांसह 11 विरोधी नेत्यांकडून SIR, ज्ञानेश कुमारांविरोधात रिट याचिका
विरोधी पक्षांचा पहिल्यांदाच सुप्रीम कोर्टावर विराट मोर्चा, अभूतपूर्व एकजुटीने दिल्ली दणाणली; राहुल, अखिलेश यादवांसह 11 विरोधी नेत्यांकडून SIR, ज्ञानेश कुमारांविरोधात रिट याचिका
राजू शेट्टींनी ऊसाला 5 हजार भाव मागितला; माजी सहकारमंत्र्यांचा पलटवार, म्हणाले,
राजू शेट्टींनी ऊसाला 5 हजार भाव मागितला; माजी सहकारमंत्र्यांचा पलटवार, म्हणाले, "तुमच्या काकांनी ठेवलंय का?"
दिल्लीतील इंडिया आघाडीच्या मोर्चात 'सुप्रीम' एकजूट! राहुल गांधींसोबत अखिलेश यादव, तेजस्वी यादव, ममता बॅनर्जी सामील, डाव्या आघाडीचा अन् जेनझीचा अभिमान नेहा बोरा सुद्धा फ्रंट फूटवर
दिल्लीतील इंडिया आघाडीच्या मोर्चात 'सुप्रीम' एकजूट! राहुल गांधींसोबत अखिलेश यादव, तेजस्वी यादव, ममता बॅनर्जी सामील, डाव्या आघाडीचा अन् जेनझीचा अभिमान नेहा बोरा सुद्धा फ्रंट फूटवर
Embed widget