एक्स्प्लोर

Horoscope Today 3 March 2026 : आज 8 राशींवर पडणार चंद्रग्रहणाचा प्रभाव, कोणताही निर्णय घेताना 10 वेळा विचार करा, वाचा आजचे राशीभविष्य

Horoscope Today 3 March 2026 : सर्व 12 राशींसाठी आज मंगळवारचा दिवस नेमका कसा असणार आहे. यासाठी वाचूयात सर्व 12 राशींचं आजचं राशीभविष्य. 

Horoscope Today 3 March 2026 : वैदिक ज्योतिष शास्त्रानुसार, आज 3 मार्च 2026 चा दिवस आहे. आजचा वार मंगळवार आहे. त्यानुसार आजचा दिवस आपण भगवान हनुमानाला समर्पित करतो. तसेच, आजच्या दिवशी धुळवड (Holi 2026) साजरी केली जाणार आहे. त्याचबरोबर, आज चंद्रग्रहण (Chandra Grahan 2026) देखील आहे. आजच्या दिवशी भक्त देवाची पूजा करतात. उपवास धरतात आणि इच्छित फळ मागतात. तसेच, ग्रहांच्या हालचालीच्या दृष्टीने देखील आजचा दिवस खास असणार आहे. कारण आज अनेक राजयोगांसह महत्त्वाच्या ग्रहांचं देखील संक्रमण होणार आहे. त्यामुळे ग्रहांच्या संक्रमणाचा कोणकोणत्या राशींवर परिणाम होणार आणि 12 राशींसाठी आजचा दिवस नेमका कसा असणार आहे. यासाठी वाचूयात सर्व 12 राशींचं आजचं राशीभविष्य

मेष रास (Aries Horoscope)

मेष राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस लाभदायक असणार आहे. या काळात कामाच्या ठिकाणी तुम्हाला सहकाऱ्यांचा चांगला पाठिंबा मिळेल. तसेच, विरोधकांवर तुम्ही अगदी सहजतेने मात कराल. तुमच्या कामाच्या बाबतीत कोणावर अवलंबून राहू नका. तसेच, आज घरात एखाद्या शुभ कार्याची तयारी सुरु होऊ शकते. धार्मिक कार्यात तुमचं मन रमेल. 

वृषभ रास (Taurus Horoscope)

आजचा दिवस तुमच्यासाठी उत्साहाचा असणार आहे. आज नवीन काहीतरी करण्याची तुमची इच्छा जागृत होईल. सकारात्मक ऊर्जेचा वावर सतत तुमच्या आजूबाजूला असेल. तसेच, आज कोणालाही इच्छा नसताना सल्ले देऊ नका. विद्यार्थ्यांनी आपल्या कामाच्या बाबतीत कोणताही हलगर्जीपणा करु नये.

मिथुन रास (Gemini Horoscope)

मिथुन राशीसाठी आजचा दिवस प्रगतीचा असणार आहे. तुम्हाला मित्रांचा चांगला पाठिंबा मिळेल. तसेच, आज तुम्हाला एखाद्या दिर्घकालीन आजाराचा त्रास होऊ शकतो. तुमच्या व्यवसायात अनेक छोटे-मोठे अडथळे येऊ शकतात. शेअर मार्केटमध्ये देखील पैशांची गुंतवणूक करताना सावधानता बाळगा.

कर्क रास (Cancer Horoscope)

कर्क राशीसाठी आजचा दिवस सतर्कतेचा असणार आहे. आज कोणतंही काम हाती घेताना घाईगडबड करु नका, तसेच, आपल्या आरोग्याची काळजी घ्या. कोणावरही आंधळेपणाने विश्वास ठेवू नका. आज तुमची अनेक रखडलेली कामे तुम्ही पूर्ण करु शकता. नोकरदार वर्गातील लोकांना नोकरीसाठी आणखी मदत घ्यावी लागेल. जोडीदाराचा सहवास तुमच्यासाठी महत्त्वाचा ठरेल.

सिंह रास (Leo Horoscope)

सिंह राशीसाठी आजचा दिवस तणावाचा असणार आहे. याचं कराण म्हणजेच तुमच्या घरात आज तणावाचं वातावरण पाहायला मिळेल. नोकरीतच्या निमित्ताने तुम्हाला प्रवास करावा लागू शकतो. राजकीय क्षेत्रात तुम्ही सक्रिय असाल. तसेच, आज तुमच्या विरोधकांपासून सावध राहा. तुमच्या विरोधात कट रचले जाऊ शकतात.

कन्या रास (Virgo Horoscope)

कन्या राशीसाठी आजचा दिवस सामान्य असणार आहे. यासाठी कोणाशीही बोलताना सावधानता बाळगा. अपशब्दाचा वापर करु नका. रागावर नियंत्रण ठेवण्याचा प्रयत्न करा. जर तुम्ही एखादी वस्तू अनेक दिवसांपासून हरवली असेल तर ती तुम्हाला लवकरच भेटू शकते. अनोळखी लोकांपासून दूरच राहा.

तूळ रास (Libra Horoscope)

तूळ राशीसाठी आजचा दिवस चांगला असेल. पण काही बाबतीत तुम्हाला सतर्क राहण्याची गरज आहे. जसे की, वाहन चालवताना काळजी घ्या. पैशांच्या गुंतवणुकीबाबत घरातील ज्येष्ठ व्यक्तींचा किंवा तज्ज्ञांचा सल्ला घेणं तुमच्या फायद्याचं ठरेल. प्रॉपर्टीच्या संदर्भात घरात वादविवाद होऊ शकतात. आज भावा-बहिणीतील संबंध चांगले असतील. 

वृश्चिक रास (Scorpio Horoscope)

वृश्चिक राशीसाठी आजचा दिवस मेहनतीचा असणार आहे. आज तुम्हाला कामाच्या बाबतीत जास्त मेहनत घेण्याची गरज आहे. मित्रांचं सहकार्य तुमच्यासाठी लाभदायी ठरणार आहे. कामाच्या बाबतीत तुम्हाला सतर्कता बाळगण्याची गरज आहे. तसेच, तुमच्या व्यवसायाचा विस्तार वाढलेला दिसेल. मात्र, तुम्हाला सांभाळून व्यवहार करावा लागेल.

धनु रास (Saggitarius Horoscope)

धनु राशीसाठी आजचा दिवस सकारात्मक असणार आहे. आज तुम्हाला तुमच्या कामाच्या बाबतीत नवीन ऊर्जा मिळेल. घरगुती कार्यात तुमचं मन रमेल. तसेच, नोकरदार वर्गातील लोकांना कामाच्या ठिकाणी प्रमोशन मिळण्याची शक्यता आहे. आज घरात शुभ कार्य घडण्याची शक्यता आहे.

मकर रास (Capricorn Horoscope)

मकर राशीसाठी आजचा दिवस सर्वसामान्य असणार आहे. आज तुमच्यासाठी उत्पन्नाचे नवे मार्ग खुले होतील. मात्र, तुमच्या खर्चातही वाढ होऊ शकते. धार्मिक कार्यात तुम्ही सहभागी व्हाल. घरातील वातावरण सकारात्मक असेल. तसेच, तुमच्या जोडीदाराबरोबर तुम्ही नवीन व्यवसायाची सुरुवात करु शकता. ग्रहांच्या संक्रमणाचा तुमच्यावर शुभ परिणाम राहील.

कुंभ रास (Aquarius Horoscope)

कुंभ राशीसाठी आजचा दिवस चांगला असणार आहे. मात्र, आज चंद्रग्रहण देखील असल्याने तुम्ही सतर्क राहण्याची गरज आहे. यासाठी कोणाच्या अध्यात मध्यात पडू नका. तुमच्या कामाची जबाबदारी इतरांवर ढकलू नका. तसेच, आरोग्याच्या बाबतीत तुम्हाला काळजी घेण्याची गरज आहे. महत्त्वाच्या कामांना आधी प्रोत्साहन द्या. 

मीन रास (Pisces Horoscope)

मीन राशीसाठी आजचा दिवस लाभदायी असणार आहे. आज तुम्हाला दिवसभरात एखादी शुभवार्ता ऐकायला मिळू शकते. तसेच, घरातील वातावरण आनंदी राहील. पार्टनरबरोबर तुमचा ताळमेळ चांगला राहील. नवीन गोष्टी शिकण्यासाठी तुम्ही फार उत्सुक असाल. तसेच, तुमची अनेक रखडलेली कामे तुम्हाला पूर्ण करता येतील.

हे ही वाचा :

(टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.)

Horoscope Today 3 March 2026 : आज धुलिवंदनाच्या दिवशी 5 राशींना मिळणार पुण्य फळ, संध्याकाळच्या वेळी करा 'हे' कार्य; आजचे राशीभविष्य

आणखी वाचा
Sponsored Links by Taboola
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Horoscope Today 30 May 2026: आज शनिवारचा दिवस 6 राशींचं नशीब पालटणारा! शनिदेवांच्या कृपेने अडचणींतून सुटका, आजचे राशीभविष्य
आज शनिवारचा दिवस 6 राशींचं नशीब पालटणारा! शनिदेवांच्या कृपेने अडचणींतून सुटका, आजचे राशीभविष्य
Lucky Zodiac Signs : 30 मेचा दिवस ठरणार भाग्यशाली! शनिदेवाच्या कृपेने 'या' 5 राशींचं रातोरात पालटणार नशीब, हातात खेळणार पैसाच पैसा
30 मेचा दिवस ठरणार भाग्यशाली! शनिदेवाच्या कृपेने 'या' 5 राशींचं रातोरात पालटणार नशीब, हातात खेळणार पैसाच पैसा
Weekly Horoscope: सिंह, कन्या राशींसाठी आर्थिक बाबतीत सावधानतेचा इशारा! जूनचा पहिला आठवडा, पैसे जपून वापरा.. साप्ताहिक राशीभविष्य
सिंह, कन्या राशींसाठी आर्थिक बाबतीत सावधानतेचा इशारा! जूनचा पहिला आठवडा, पैसे जपून वापरा.. साप्ताहिक राशीभविष्य
June Month Born Zodiac Personality : जूनध्ये जन्म घेणाऱ्या लोकांचा स्वभाव नेमका कसा असतो? वाचा स्वभाव वैशिष्ट्य आणि लकी नंबर
जूनध्ये जन्म घेणाऱ्या लोकांचा स्वभाव नेमका कसा असतो? वाचा स्वभाव वैशिष्ट्य आणि लकी नंबर
Advertisement
Advertisement
Advertisement

व्हिडीओ

Vidhan Parishad Politics : विधान परिषदेत ‘पुढच्या पिढी’ची एंट्री? दिग्गज नेत्यांचं लॉबिंग सुरू | ABP Majha
Pune Liquor Tragedy : विषारी दारूमुळे १४ मृत्यू; पोलिसांच्या भूमिकेवरही सवाल | ABP Majha
NEET Exam Special Report : NEET पेपरफुटीनंतर मोठा निर्णय! आता PM मोदींकडे NEETचं नियंत्रण
Rahul Gandhi Special Report : सीबीएसई परिक्षेवरुन वाद, भाजप आणि राहुल गांधींमध्ये आरोप-प्रत्यारोप
Gunratna Sadavarte Mumbai : रीलस्टार मनोज, तुझ्या मागण्या बेकायदेशीर, गुणरत्न सदावर्ते बरसले

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Pune Hooch Tragedy : पुण्यात विषारी दारूमुळे 14 जणांचा मृत्यू; पोलीस आयुक्तांची मोठी कारवाई, हडपसरच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांसह 3 पोलीस निलंबित
पुण्यात विषारी दारूमुळे 14 जणांचा मृत्यू; पोलीस आयुक्तांची मोठी कारवाई, हडपसरच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांसह 3 पोलीस निलंबित
Parner Crime : धक्कादायक! गतिमंद मुलाला बरं करण्याच्या बहाण्याने भोंदू बाबाने घातला 6 लाखांचा गंडा; ठार मारण्याची धमकी देत महिलेवर अत्याचार
धक्कादायक! गतिमंद मुलाला बरं करण्याच्या बहाण्याने भोंदू बाबाने घातला 6 लाखांचा गंडा; ठार मारण्याची धमकी देत महिलेवर अत्याचार
Weather Update: हवामान विभागाचा जून आणि जुलैमध्ये उष्णतेच्या लाटेचा इशारा; श्रीलंकेत मान्सून अडकल्याने अजूनही आठवड्याचीव प्रतीक्षा; यंदा 10 टक्के कमी पावसाचा अंदाज
हवामान विभागाचा जून आणि जुलैमध्ये उष्णतेच्या लाटेचा इशारा; श्रीलंकेत मान्सून अडकल्याने अजूनही आठवड्याचीव प्रतीक्षा; यंदा 10 टक्के कमी पावसाचा अंदाज
कर्नाटकात डीकेंसाठी मार्ग प्रशस्त केला, पण राजीनाम्यानंतर सिद्धरामय्यांची भलतीच खेळी; काँग्रेसने 'रिमोट'चा डाव वेळीच ओळखला अन्
कर्नाटकात डीकेंसाठी मार्ग प्रशस्त केला, पण राजीनाम्यानंतर सिद्धरामय्यांची भलतीच खेळी; काँग्रेसने 'रिमोट'चा डाव वेळीच ओळखला अन्
Hardik Pandya: हार्दिक पांड्याला मुंबई काही केल्या सोसवेना, सलग तिसऱ्यांदा चर्चा रंगली, संघ बाहेर पडताच नेमकं कोणाकडे बोट दाखवत आता झेपत नाही म्हणाला?
हार्दिक पांड्याला मुंबई काही केल्या सोसवेना, सलग तिसऱ्यांदा चर्चा रंगली, संघ बाहेर पडताच नेमकं कोणाकडे बोट दाखवत आता झेपत नाही म्हणाला?
Vaibhav Sooryavanshi IPL 2026 : IPLच्या इतिहासात जे कधीच घडलं नाही, ते एका 15 वर्षांच्या पोराने करून दाखवलं; वैभव सूर्यवंशीने पुन्हा मोडले अनेक विक्रम, दिग्गजही चक्रावले
IPLच्या इतिहासात जे कधीच घडलं नाही, ते एका 15 वर्षांच्या पोराने करून दाखवलं; वैभव सूर्यवंशीने पुन्हा मोडले अनेक विक्रम, दिग्गजही चक्रावले
Lalit Modi on Sanjiv Goenka: 'संजीव गोयंकासारख्या लोकांमुळे आता आयपीएलच्या फक्त मैदानातच नव्हे, तर...' रिषभ पंतचा राजीनामा पडताच ललित मोदी भलताच पेटला
'संजीव गोयंकासारख्या लोकांमुळे आता आयपीएलच्या फक्त मैदानातच नव्हे, तर...' रिषभ पंतचा राजीनामा पडताच ललित मोदी भलताच पेटला
न्यूयॉर्कचे महापौर जोहरान ममदानींचा इराण युद्धाला विरोध; म्हणाले, 'हजारो जीव गेले, एका अविचारी निर्णयाची किंमत जनता मोजत आहे'
न्यूयॉर्कचे महापौर जोहरान ममदानींचा इराण युद्धाला विरोध; म्हणाले, 'हजारो जीव गेले, एका अविचारी निर्णयाची किंमत जनता मोजत आहे'
Embed widget