Sun Transit 2025: पुढच्या 10 दिवसात 'या' 3 राशींच्या कर्माचा हिशोब होणार! सूर्याची शनिच्या नक्षत्रात एंट्री, दोघं मिळून करणार न्याय, पैसा दुप्पट होणार
Sun Transit 2025: ज्योतिषशास्त्रानुसार, येत्या काही दिवसात सूर्य शनीच्या नक्षत्रात प्रवेश करेल. यामुळे अनेक राशींच्या कर्माचा हिशोब होऊ शकतो.

Sun Transit 2025: ते म्हणतात ना, आयुष्यात चांगले कर्म करत राहा, फळाची अपेक्षा करू नका, एक ना एक दिवस तुम्हाला तुमच्या चांगल्या कर्माचे फळ नक्की मिळते. ज्याप्रमाणे ज्योतिषशास्त्रात आणि हिंदू धर्मात शनिदेवांना (Shani Dev) कर्माचे फळ देणारी देवता असे म्हटले जाते. तेच आता कर्माचा हिशोब करतील. ज्योतिषशास्त्रानुसार, नोव्हेंबर महिना (November 2025) हा अत्यंत महत्त्वाचा आहे. या महिन्यात अनेकांच्या कर्माचा हिशोब होणार आहे. ग्रहांचा राजा सूर्याच्या नक्षत्र बदलणार आहे. ज्याचा विविध राशींच्या जीवनावर परिणाम होईल. हा नक्षत्र बदल 19 नोव्हेंबर रोजी होईल. सूर्य शनीच्या अनुराधा नक्षत्रात प्रवेश करेल. यामुळे अनेक राशींच्या कर्माचा हिशोब होऊ शकतो.
करिअर, आर्थिक परिस्थिती, आरोग्य आणि वैवाहिक जीवनावर कसा परिणाम होणार?
ज्योतिषशास्त्रानुसार, सूर्याच्या नक्षत्रातील बदलामुळे अनेक राशींच्या जीवनात बदल होतील. बुधवार, 19 नोव्हेंबर 2025 रोजी रात्री 9:03 वाजता सूर्य शनीच्या अनुराधा नक्षत्रात प्रवेश करेल. अनुराधा नक्षत्रात सूर्याचा प्रवेश या राशींच्या राशींचे भाग्य उजळवेल. 2 डिसेंबरपर्यंत सूर्य अनुराधा नक्षत्रात राहील. या नक्षत्रातील बदलाचा राशींच्या करिअर, आर्थिक परिस्थिती, आरोग्य आणि वैवाहिक जीवनावर कसा परिणाम होईल? तसेच, या नक्षत्रातील बदलाचा या तीन राशींच्या जीवनावर कसा परिणाम होईल? जाणून घेऊया.
'या' 3 राशींना सूर्याच्या नक्षत्र परिवर्तनाचा फायदा होईल... (Sun Transit 2025)
मिथुन (Gemini)
ज्योतिषशास्त्रानुसार, मिथुन राशीच्या लोकांना सूर्याच्या नक्षत्र परिवर्तनाचे अत्यंत फायदेशीर परिणाम मिळतील. व्यावसायिकांना मोठा फायदा होईल. तुम्हाला पदोन्नती आणि पगारवाढ मिळू शकते. तुम्हाला पदासोबतच आदरही मिळेल. जीवनात आनंद आणि शांती मिळेल. तुम्हाला तुमच्या कुटुंबासोबत वेळ घालवण्याची संधी मिळेल.
सिंह (Leo)
ज्योतिषशास्त्रानुसार, सूर्याचे नक्षत्र परिवर्तन तुमच्यासाठी भाग्यवान ठरेल. सिंह राशीच्या लोकांना आर्थिक फायदा होऊ शकतो. तुमची आर्थिक परिस्थिती मजबूत होईल. तुम्ही तुमच्या कारकिर्दीत प्रगती कराल आणि काही चांगल्या बातम्या मिळू शकतात.
वृश्चिक (Scorpio)
ज्योतिषशास्त्रानुसार, सूर्याचे नक्षत्र परिवर्तन तुमच्यासाठी फायदेशीर ठरेल. नोकरीच्या शोधात असलेल्यांना यश मिळू शकते. तुम्हाला पैसे कमविण्याच्या चांगल्या संधी मिळतील. तुमच्या आरोग्यासाठीही हा काळ चांगला आहे. तुम्हाला तुमच्या कुटुंबासोबत वेळ घालवता येईल. तुमची मानसिक स्थिती चांगली राहील.
हेही वाचा>>
2026 Yearly Numerology: खूप सोसलं.. 2026 मध्ये 'या' जन्मतारखेच्या लोकांचे भोग संपणार! कोणाला मिळणार शिक्षा? वार्षिक अंकभविष्य वाचा..
(टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.)















