Shefali Jariwala: शेफाली जरीवालाच्या मृत्यूची भविष्यवाणी आधीच झाली होती? 'हे' 3 ग्रह जबाबदार? जाणून घ्या कोणी केली भविष्यवाणी?
Shefali Jariwala Death: कांटा लगा' या गाण्याने प्रसिद्ध झालेली अभिनेत्री शेफाली जरीवालाच्या मृत्यूची भविष्यवाणी आधीच झाली होती? कोणी केली होती ही भविष्यवाणी? जाणून घ्या..

Shefali Jariwala Death: 'कांटा लगा' या गाण्याने प्रसिद्ध झालेली अभिनेत्री शेफाली जरीवालाचे (Shefali Jariwala Death) 27 जून रोजी निधन झाले. शेफालीच्या मृत्यूचे कारण हृदयविकार असल्याचे म्हटले जात आहे. या संदर्भातील एक व्हिडिओ आता सोशल मीडियावर व्हायरल होतोय. ज्यामध्ये शेफालीच्या मृत्यूची भविष्यवाणी आधीच व्हायरल झाली होती असे सांगण्यात येत आहे. मात्र ही भविष्यवाणी नेमकी केली कोणी? या व्हायरल व्हिडीओमध्ये नेमकं काय म्हटलंय? जाणून घ्या.
व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल
27 जून रोजी अभिनेत्री शेफाली जरीवालाचे वयाच्या 42 व्या वर्षी निधन झाले. वृत्तानुसार, तिला मुंबईतील तिच्या घरी हृदयविकाराचा झटका आला, त्यानंतर तिचे पती पराग त्यागी तिला रुग्णालयात घेऊन गेले. जिथे डॉक्टरांनी तिला मृत घोषित केले. शेफालीच्या अकाली मृत्यूमुळे संपूर्ण इंडस्ट्रीत शोककळा पसरली आहे. प्रत्येकाच्या मनात एकच प्रश्न आहे की इतका तंदुरुस्त असूनही शेफालीला हृदयविकाराचा झटका कसा येऊ शकतो? दरम्यान, पारस छाब्राच्या पॉडकास्टचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. व्हिडीओमध्ये पारस सांगत आहे की त्याने शेफालीची कुंडली पाहिली आहे, ज्यामध्ये एक अशुभ योग तयार होत आहे. यासोबतच त्याने त्या योगामुळे होणाऱ्या धोक्याबद्दलही सांगितले आहे.
View this post on Instagram
पारस छाब्राने केली होती भविष्यवाणी?
काही महिन्यांपूर्वी पारस छाब्राने त्यांच्या पॉडकास्टमध्ये शेफालीबद्दल एक भाकीत केले होते, ज्यामध्ये त्यांनी सांगितले होते की तिच्या कुंडलीत तीन ग्रहांचे अशुभ संयोजन तयार होत आहे, ज्यामुळे तिचा पुढचा प्रवास सोपा होणार नाही.पारस म्हणतो की 'तुमच्या जन्मकुंडलीच्या आठव्या घरात चंद्र, बुध आणि केतू आहेत. शास्त्रांमध्ये असे सांगितले आहे की चंद्र आणि केतूचे संयोजन शुभ नाही. चंद्र हा मनाचा कारक मानला जातो, तर केतू हा अशुभ ग्रह आहे. कुंडलीचे आठवे घर नुकसानाचे आहे, ज्यामुळे अकाली मृत्यू, बदनामी, नुकसान आणि तंत्र-मंत्रात अडकण्याचा धोका वाढतो.' पुढे, तो म्हणाला की 'चंद्र आणि बुध यांचे एकत्र येणे देखील शुभ नाही.'
चंद्र, बुध आणि केतू यांच्या युतीचा परिणाम
चंद्र, बुध आणि केतू यांचे युती (कोणत्याही राशी किंवा घरात एकत्र येणे) ही एक महत्त्वाची ज्योतिषीय घटना आहे. चंद्र हा मन, भावना आणि मानसिक शक्ती देणारा मानला जातो, तर बुध बुद्धिमत्ता, संवाद, व्यवसाय आणि तर्कशास्त्राचे प्रतिनिधित्व करतो. केतू हा "छाया ग्रह" आहे, जो अलगाव, अध्यात्म आणि गूढतेचे प्रतीक मानला जातो. ज्या लोकांच्या कुंडलीत कोणत्याही राशीत चंद्र, बुध आणि केतू यांची युती असते किंवा हे तिन्ही ग्रह कोणत्याही राशीत एकत्र असतात, त्यांचा अशुभ परिणाम त्या व्यक्तीच्या जीवनावर पडतो. विशेषतः अकाली मृत्यूची शक्यता असते.
अकाली मृत्यूचा धोका कधी वाढतो?
ज्योतिषशास्त्रानुसार, ज्याच्या जन्म कुंडलीच्या आठव्या घरात राहू, केतू आणि शनि एकत्र आल्याने देखील अकाली मृत्यूची शक्यता निर्माण होते. दुसरीकडे, ज्यांच्या कुंडलीत मंगळ आणि राहू एकत्र बसलेले असतात किंवा त्यांची दृष्टी एकमेकांवर पडते, त्यांच्या अकाली मृत्यूची शक्यता वाढते.
हेही वाचा :
July 2025: जुलै महिना सुरू होणार! 5 राशीं असणार भाग्यशाली, नशिबाची पक्की साथ मिळणार, सर्व स्वप्न पूर्ण होणार
(टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.)




















