Shardiya Navratri 2024 : नवरात्रीमध्ये चुकूनही 'या' 5 गोष्टी करू नका; देवीच्या उपासनेसाठी हे नियम पाळाच
Shardiya Navratri 2024 : पौराणिक कथेनुसार, देवी दुर्गेने महिषासुराशी 9 दिवस युद्ध केले आणि दहाव्या दिवशी या राक्षसाचा वध केला. त्यामुळेच मातृशक्तीची 9 दिवस उपासना केली जाते.
Shardiya Navratri 2024 : शारदीय नवरात्रीचा (Shardiya Navratri 2024) पवित्र सण अवघ्या काही दिवसांनी सुरू होणार आहे. 3 ऑक्टोबरपासून नवरात्रौत्सवाला सुरुवात होणार आहे. नवरात्रीचे नऊ दिवस देवीची पूजा केली जाते. नवरात्रीचे विशेष महत्त्व शास्त्रात सांगण्यात आले आहे. नवरात्रीच्या 9 व्या दिवशी माता दुर्गा देवीची विशेष पूजा केली जाते. दुर्गा ही शक्तीची देवी आहे. नवरात्रीच्या काळात विशेष नियम आणि शिस्त पाळली पाहिजे असे मानले जाते.
पौराणिक कथेनुसार, देवी दुर्गेने महिषासुराशी 9 दिवस युद्ध केले आणि दहाव्या दिवशी या राक्षसाचा वध केला. त्यामुळेच मातृशक्तीची 9 दिवस उपासना केली जाते, या 9 दिवसांना नवरात्री म्हणतात. या 9 दिवसांमध्ये मातेच्या विविध रूपांची पूजा केली जाते.
नवरात्रीत 'या' 5 गोष्टी करू नका
नवरात्रीत विशेष नियम पाळण्यास सांगितले आहे. जे या गोष्टींची काळजी घेत नाहीत, त्यांना माता दुर्गा कठोर शिक्षा देते अशी श्रद्धा आहे. शारदीय नवरात्र हे सर्व नवरात्रींमध्ये महत्त्वाचे मानले जाते. यामध्ये ध्यानाचे विशेष महत्त्व सांगितले आहे. त्यामुळे या गोष्टी लक्षात ठेवाव्यात.
राग
नवरात्रीत राग येऊ देऊ नये. कारण असे म्हटले जाते की, माता दुर्गा रागावलेल्या व्यक्तींना आशीर्वाद देत नाही. शास्त्रात असेही सांगण्यात आले आहे की ज्यांना राग येतो त्यांना कधीच यश मिळत नाही. प्रत्येकाला अशा व्यक्तीपासून दूर राहायचे असते. रागाच्या भरात एखादी व्यक्ती काहीतरी चुकीचं पाऊल उचलू शकते.
अहंकार
नवरात्रीत अहंकारापासून दूर राहावे. जे व्रत करतात आणि माता दुर्गेची विशेष पूजा करतात त्यांनी अहंकारापासून दूर राहावे. याची काळजी घेतली नाही तर दुर्गा मातेचा आशीर्वाद लाभत नाही.
लोभ
नवरात्रीत या दोषाचा त्याग करावा. लोभ सर्व प्रकारचे दोष वाढवतो. लोभी माणूस स्वतःचा विचार करतो. जे स्वतःच्या हिताला प्राधान्य देतात, त्यांना माता दुर्गा कधीच आशीर्वाद देत नाही.
खोटे बोलणे
नवरात्रीत खोटे बोलू नये. जे स्वतःच्या फायद्यासाठी इतरांशी खोटं बोलायला सदैव तयार असतात त्यांना देवी दुर्गा कधीच आशीर्वाद देत नाही. अशा लोकांना कधीच मान मिळत नाही.
फसवणूक
नवरात्रीचा सण हा दोषांवर विजय मिळवण्याचाही सण आहे. स्वत:च्या फायद्यासाठी दुसऱ्यांची फसवणूक करणे अत्यंत चुकीचे आहे. जे ही सवय सोडत नाहीत त्यांना देवी दुर्गा वेळ आल्यावर कठोर शिक्षा देते. अशा लोकांना माता दुर्गेची कृपा कधीच मिळत नाही.
(टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.)
हे ही वाचा :