Shani Dosh Upay : शनिदोषापासून मुक्ती मिळवण्यासाठी आषाढाच्या 'या' शनिवारी करा 'हा' उपाय, होईल लाभ
Shani Dosh Upay : हिंदू धर्मात आषाढ महिन्याला विशेष महत्त्व आहे. या महिन्याच्या पहिल्या शनिवारी विशेष योगाने शनिदोषापासून मुक्ती मिळवण्यासाठी शनि स्तोत्राचं पठण करणं फायदेशीर ठरेल आहे.
Shani Dosh Upay, Shanivar Puja : आषाढ महिना सुरू झाला आहे. हिंदू धर्मात आषाढ महिन्याला विशेष महत्त्व आहे. धार्मिक आणि उपासनेच्या दृष्टिकोनातून आषाढ महिन्याला विशेष महत्त्व आहे. आज म्हणजे या महिन्याच्या शनिवारी शनिदोषापासून मुक्ती मिळण्याचा विशेष योगही आहे. यावेळी ज्या लोकांवर शनिची अर्धशत आणि शनिचा कोप आहे, त्यांना लाभ होईल. आजच्या दिवशी या लोकांनी शनिदेवाची पूजा करावी आणि राजा दशरथाच्या शनिस्तोत्राचं पठण करावं. यामुळे या लोकांवर शनिदेवाची कृपा होते आणि शनिदोष कमी होतो असं मानलं जातं.
ज्योतिषशास्त्रानुसार, 30 वर्षांनंतर शनिने 29 एप्रिल 2022 रोजी मकर राशी सोडली आणि कुंभ राशीत प्रवेश केला. त्यानंतर 5 जूनपासून कुंभ राशीमध्ये शनी विरुद्ध दिशेनं जात आहे. शनी 13 जुलै 2022 पासून येथून मागे जाईल आणि मकर राशीत प्रवेश करेल आणि 17 जानेवारी 2023 रोजी पूर्णपणे कुंभ राशीत येईल. कुंभ राशीत शनीच्या वक्रीमुळे कुंभ, मकर, मीन राशीत शनिची साडेसाती सुरू आहे. त्यामुळे या राशीच्या लोकांनी शनि स्तोत्राचं पठण करावं.
राजा दशरथाचं शनिस्तोत्र
नम: कृष्णाय नीलाय शितिकण्ठनिभाय च।
नम: कालाग्निरूपाय कृतान्ताय च वै नम: ।।
नमो निर्मांस देहाय दीर्घश्मश्रुजटाय च।
नमो विशालनेत्राय शुष्कोदर भयाकृते।।
नम: पुष्कलगात्राय स्थूलरोम्णेऽथ वै नम:।
नमो दीर्घायशुष्काय कालदष्ट्र नमोऽस्तुते।।
नमस्ते कोटराक्षाय दुर्निरीक्ष्याय वै नम:।
नमो घोराय रौद्राय भीषणाय कपालिने।।
नमस्ते सर्वभक्षाय वलीमुखायनमोऽस्तुते।
सूर्यपुत्र नमस्तेऽस्तु भास्करे भयदाय च।।
अधोदृष्टे: नमस्तेऽस्तु संवर्तक नमोऽस्तुते।
नमो मन्दगते तुभ्यं निरिस्त्रणाय नमोऽस्तुते।।
तपसा दग्धदेहाय नित्यं योगरताय च।
नमो नित्यं क्षुधार्ताय अतृप्ताय च वै नम:।।
ज्ञानचक्षुर्नमस्तेऽस्तु कश्यपात्मज सूनवे।
तुष्टो ददासि वै राज्यं रुष्टो हरसि तत्क्षणात्।।
देवासुरमनुष्याश्च सिद्घविद्याधरोरगा:।
त्वया विलोकिता: सर्वे नाशंयान्ति समूलत:।।
प्रसाद कुरु मे देव वाराहोऽहमुपागत।
एवं स्तुतस्तद सौरिग्र्रहराजो महाबल:।।
(टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही. यासाठी संबंधित तज्ज्ञाचा सल्ला घ्यावा.)
महत्त्वाच्या बातम्या :