Shani Dev : आजपासून शनीची उलटी चाल! पुढच्या 5 महिन्यापर्यंत 'या' राशींना भोगावी लागणार कर्माची फळं, जाणून घ्या 12 राशींवरचा प्रभाव
Shani Dev : ज्योतिष शास्त्रानुसार, शनी आज दुपारी 12 वाजून 35 मिनिटांनी कुंभ राशीत उलटी चाल चालणार आहे. तर 15 नोव्हेंबर 2024 पर्यंत जवळपास 139 दिवसांपर्यंत शनी या अवस्थेत असणार आहे.
Shani Dev : कर्म आणि न्यायाचा फळदाता शनी (Shani Dev) 2024 च्या संपूर्ण वर्षांत कुंभ राशीत विराजमान आहे. ज्योतिष शास्त्रानुसार, शनी (Lord Shani) आज दुपारी 12 वाजून 35 मिनिटांनी कुंभ राशीत उलटी चाल चालणार आहे. तर 15 नोव्हेंबर 2024 पर्यंत जवळपास 139 दिवसांपर्यंत शनी या अवस्थेत असणार आहे. याचा शुभ-अशुभ परिणाम 12 राशींवर नेमका कसा होणार आहे ते जाणून घेऊयात.
मेष रास (Aries Horoscope)
शनीच्या वक्री चालीचा मेष राशीच्या लोकांवर चांगला परिणाम होणार आहे. या राशीच्या लोकांना चांगला लाभ मिळणार आहे. या कालावधीत तुम्ही जुन्या गोष्टींपासून बोध घेऊन नवीन गोष्टी शिकू शकता. तसेच, तुमच्या व्यापारात काहीशा प्रमाणात उतार-चढाव पाहायला मिळतील. आयुष्यात यश मिळवताना तुम्हाला अनेक संकटांचा सामना करावा लागेल. पण, तुमच्या मेहनतीचं फळ तुम्हाला नक्की मिळेल. तसेच, कोणताही निर्णय घाईत न घेण्याचा सल्ला यावेळी देण्यात आला आहे.
वृषभ रास (Taurus Horoscope)
वृषभ राशीच्या लोकांसाठी शनीची उलटी चाल काहीशी आव्हानात्मक असू शकते. या दरम्यान तुमच्या वाट्यात अनेक चढ-उतार येतील. तुमची महत्त्वाची कामं रखडतील. मात्र, तुम्ही तुमच्या खचून न जाता तुमच्या ध्येयाकडे लक्ष केंद्रित करणं गरजेचं आहे. परिवर्तनाला घाबरू नका. तसेच, आर्थिक बाबतीत कोणतीच रिस्क घेऊ नका.
मिथुन रास (Gemini Horoscope)
शनीच्या उलट्या चालीने मिथुन राशीत अनेक मोठे बदल होण्याची शक्यता आहे. या दरम्यान तुम्हाला आर्थिक समस्यांचा सामना करावा लागू शकतो. तसेच, अचानक तुमच्या खर्चात वाढ होण्याची शक्यता आहे. त्यामुळे तणावात राहू नका, मेहनत करत राहा. हळूहळू तुमच्या उत्पन्नात वाढ होण्याची शक्यता आहे. तसेच, अवाढव्य खर्च करू नका.
कर्क रास (Cancer Horoscope)
कर्क राशीच्या लोकांनी या काळात आपल्या ध्येयावर लक्ष केंद्रित करण्याची गरज आहे. तुमच्या बिझनेसमध्ये प्रगतीसाठी तुम्हाला मेहनत घेण्याची गरज आहे. तसेच आर्थिक बाबतीत कोणतीच रिस्क घेऊ नका. महत्त्वाचे निर्णय घेताना घरातील सदस्यांचा सल्ला घ्या.
सिंह रास (Leo Horoscope)
सिंह राशीच्या लोकांसाठी हा काळ काहीसा चांगला असणार आहे. या दरम्यान कामाच्या ठिकाणी सहकाऱ्यांचा सल्ला घ्या. अनुभवी व्यक्तीचा सल्ला घेण्यात संकोच करू नका. तसेच, ऑफिसमध्ये तुमच्यावर अनेक जबाबदाऱ्या सोपवल्या जातील. पण, महत्त्वाचे निर्णय घेताना काळजी घ्या. आर्थिक बाबतीत उतार-चढाव पाहायला मिळतील.
कन्या रास (Virgo Horoscope)
शनीच्या वक्री चालीने कन्या राशीच्या प्रोफेशनल लाईफवर परिणाम दिसून येणार आहे . या दरम्यान तुम्ही तुमच्या ध्येयावर लक्ष केंद्रित करणं गरजेचं आहे. तुमच्या कार्यात अनेक अडचणींचा सामना करावा लागू शकतो. तसेच, घाईत कोणताही निर्णय न घेण्याचा सल्ला देण्यात आला आहे.
तूळ रास (Libra Horoscope)
तूळ राशीच्या लोकांना पुढच्या पाच महिन्यांसाठी अनेक संकटांचा सामना करावा लागू शकतो. या दरम्यान कोणताही निर्णय घेताना गोंधळात राहू नका. तुमच्या यशास विलंब होईल.. पण तुमच्या मेहनतीचं फळ तुम्हाला मिळेल. या काळात तुमच्या खर्चार नियंत्रण ठेवा.
वृश्चिक रास (Scorpio Horoscope)
शनीच्या उलट्या चालीचा वृश्चिक राशीवर परिणाम होणार आहे. या दरम्या तुमची एकाग्रता नाहीशी होईल. तसेच, कौटुंबिक जीवनात तुम्हाला अनेक संकटांचा सामना करावा लागू शकतो. पण, तुम्ही तुमच्या ध्येयावर लक्ष केंद्रित करणं गरजेचं आहे. जर, तुम्हाला गुंतवणूक करायची असेल तर हा काळ तुमच्यासाठी चांगला आहे.
धनु रास (Sagittarius Horoscope)
धनु राशीच्या लोकांना या काळात चढ-उताराचा सामना करावा लागू शकतो. यश मिळविण्यासाठी अनेक नवीन पर्याय शोधणं गरजेचं आहे. एखाद्याशी बोलताना तुमच्या विचारात स्पष्टवक्तेपणा ठेवा. गुंतवणूक करायची असेल तर दिग्गज व्यक्तीचा सल्ला घेऊनच करा. अन्यथा तुमचं नुकसान होऊ शकतं.
मकर रास (Capricorn Horoscope)
मकर राशीच्या लोकांना या काळात अडचणींचा सामना करावा लागू शकतो. या काळात तुम्ही तुमच्या करिअरवर लक्ष केंद्रित करण्याची गरज आहे. यश मिळवण्यासाठी नवीन योजना आखण्याची गरज आहे. तसेच, खर्चावर नियंत्रण ठेवण्याची गरज आहे.
कुंभ रास (Aquarius Horoscope)
कुंभ राशीच्या लोकांसाठी हा काळ प्रगतीचा असणार आहे. या काळात तुमच्या यशातील सर्व संकटं दूर होतील. तुम्हाला नशिबाची चांगली साथ मिळेल. मात्र, आर्थिक बाबतीत तुम्हाला पैशांचा जपून वापर करणं गरजेचं आहे.
मीन रास (Pisces Horoscope)
मीन राशीच्या लोकांना या काळात अनेक चढ-उतारांचा सामना करावा लागणार आहे. ऑफिसच्या कामात हलगर्जीपणा करू नका. तसेच, तुमच्या खर्चात अचानक वाढ होण्याची शक्यता आहे. आर्थिक बाबतीत कोणताही निर्णय एकट्याने घेऊ नका.
(टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.)
हेही वाचा :