Shani Dev : वर्षाच्या शेवटच्या शनिवारी करा हे खास उपाय, शनिदेव होतील प्रसन्न, नव्या वर्षात होईल भरभराट
Shani Dev : कुंडलीत शनिदोष असेल तर शनिवारी केलेल्या काही उपायांनी हा दोष दूर होऊ शकतो. शनिदेवाच्या कृपेने व्यक्तीला जीवनात खूप प्रगती आणि यश प्राप्त होते.

Shani Dev : शनिवार हा न्यायदेवता शनिदेवाला समर्पित मानला जातो. तुमच्या कुंडलीत शनिदोष असेल तर शनिवारी (Saturday) केलेल्या काही उपायांनी हा दोष दूर होऊ शकतो. शनिदेवाच्या (Shani Dev) कृपेने व्यक्तीला जीवनात खूप प्रगती आणि यश प्राप्त होते. शनिवारी केलेल्या उपायांनी शनिदेव प्रसन्न होतात आणि शनिदेवाच्या त्रासापासून मुक्ती मिळते. ज्यांना शनिची साडेसाती सुरू असते त्यांना साडे सात वर्षे त्रास सहन करावा लागतो.
असे म्हटले जाते की शनिदेवाच्या कृपेने सर्व मनोकामना पूर्ण होतात. 31 जानेवारी हा वर्षाचा शेवटचा शनिवार आहे. या दिवशी काही उपाय केल्याने शनिदेव प्रसन्न होतात आणि शनिदोषापासून मुक्ती मिळते. वर्षाच्या शेवटच्या शनिवारी हे उपाय केल्याने येणारे वर्षही आनंदात जाऊ शकते. शिवाय भरभराट होईल. जाणून घेऊया कोणते उपाय केल्याने शनी देव प्रसन्न होतात.
Shani Dev : वर्षाच्या शेवटच्या शनिवारी करा हे उपाय
शनिवारी स्नान वगैरे करून शनिदेवाची विधिवत पूजा करावी. या दिवशी शनिदेवाला मोहरीच्या तेलाने आणि काळ्या तिळाचा अभिषेक करावा. शनि मंदिरात जाऊन त्यांचे दर्शन घेऊन आशीर्वाद घ्या. यानंतर शनिदोषापासून मुक्ती मिळण्यासाठी प्रार्थना करावी.
कुंडलीत सध्या असलेल्या शनिदोषापासून मुक्ती मिळवण्यासाठी वर्षाच्या शेवटच्या शनिवारी शनि मंदिरात जाऊन पिंपळाच्या झाडाला जल अर्पण करावे.
या दिवशी मोहरीच्या तेलाची भाकरी काळ्या कुत्र्याला खायला द्या. शनिवारी कावळ्यांना खाऊ घालणे देखील शुभ मानले जाते. शास्त्रानुसार असे केल्याने शनिदेव प्रसन्न होतात.
असे मानले जाते की शनिदेव हनुमानजींच्या भक्तांना कधीही त्रास देत नाहीत. अशावेळी शनिवारी हनुमानजींना चमेलीच्या तेलाचा दिवा लावा आणि सिंदूर अर्पण करा.
शनिदोषापासून मुक्ती मिळवण्यासाठी मंगळवार आणि शनिवारी हनुमान चालीसा किंवा सुंदरकांडचे पठण करावे. यामुळे शनिदेव प्रसन्न होतात.
गरिबांची सेवा केल्याने शनिदेवाचा आशीर्वादही मिळतो. शनिवारी काळे तीळ, कपडे, उडीद डाळ, जोडे, चप्पल आणि ब्लँकेट गरिबांना दान करावे.
महत्वाच्या बातम्या
(टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.)
महत्वाच्या बातम्या




















