Shani Asta 2024 : शनीचा कुंभ राशीत अस्त; 'या' 3 राशींच्या समस्या वाढणार; आयुष्यात येणार मोठं वादळ
Shani Asta Bad Effects: शनिदेव प्रत्येकाला कर्मानुसार फळ देतात. शनि 11 फेब्रुवारी रोजी कुंभ राशीत मावळल्याने काही राशीच्या लोकांच्या अडचणी वाढणार आहेत. जाणून घ्या कोणत्या राशीच्या लोकांनी काळजी घेणे आवश्यक आहे.
![Shani Asta 2024 : शनीचा कुंभ राशीत अस्त; 'या' 3 राशींच्या समस्या वाढणार; आयुष्यात येणार मोठं वादळ Shani Dev Asta Effects on these zodiac signs will face struggles and challenges saturn sets in aquarius Shani Asta 2024 : शनीचा कुंभ राशीत अस्त; 'या' 3 राशींच्या समस्या वाढणार; आयुष्यात येणार मोठं वादळ](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2024/02/10/66a22ae1614aa61414d8a9064d7063cd1707533088954343_original.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=1200&height=675)
Shani Asta 2024 : ज्योतिषशास्त्रानुसार, या वर्षी शनिदेव राशी परिवर्तन करणार नाही. 2024 मध्ये शनि आपल्या मूळ राशीत, म्हणजेच कुंभ राशीतच विराजमान असणार आहे. परंतु कुंभ राशीतच शनि अधूनमधून आपल्या हालचालीत बदल करेल.
उद्या, म्हणजेच 11 फेब्रुवारीला शनीच्या स्थितीत बदल झाला आहे. शनीने 11 फेब्रुवारीला सायंकाळी 6 वाजून 56 मिनिटांनी कुंभ राशीत अस्त स्थितीत प्रवेश केला. शनीच्या अस्तामुळे काही राशींना विशेष लाभ मिळू शकतो, तर काही राशीच्या जीवनात समस्या उद्भवू शकतात. शनीच्या अस्तामुळे काही राशींना शारीरिक, मानसिक आणि आर्थिक समस्यांचा सामना करावा लागणार आहे. शनीच्या (Shani) अस्तामुळे कोणत्या राशींना विशेष काळजी घ्यावी लागेल? जाणून घेऊया.
कर्क रास (Cancer)
शनि अस्त अवस्थेत असताना कर्क राशीच्या लोकांवर सर्वात जास्त नकारात्मक प्रभाव टाकेल. कर्क राशीचे लोक यावेळी शनीच्या प्रभावामुळे त्रासलेले असतील. शनीच्या अस्ताची स्थिती यावेळी तुम्हाला अधिक त्रास देणार आहे. शनीच्या अस्तामुळे तुमच्या आयुष्यात अनेक अडचणी येऊ शकतात. शनि या राशीच्या लोकांसाठी मानसिक, शारीरिक आणि आर्थिकदृष्ट्या त्रासदायक ठरेल. शनीच्या अस्तामुळे तुमच्या सर्व कामात अडथळे येऊ शकतात. व्यवसायातही तुमचे नुकसान होऊ शकते.
मकर रास (Capricorn)
शनिदेवाच्या अस्तामुळे मकर राशीच्या लोकांच्या अडचणी वाढणार आहेत. या राशीच्या लोकांवर सध्या शनीची साडेसती चालू आहे, त्यातच शनीच्या अस्तामुळे तुम्हाला खूप त्रास सहन करावा लागू शकतो. मकर राशीच्या लोकांना करिअर क्षेत्रात खूप त्रास होईल. तुमच्या प्रगतीत अडथळे येतील, नोकरीत बढती थांबू शकते. ऑफिसमध्ये तुमचे काम बिघडू शकते आणि त्यामुळे तुमची नोकरीही जाऊ शकते. या काळात मकर राशीच्या लोकांचे आरोग्यही बिघडू शकते.
कुंभ रास (Aquarius)
कुंभ राशीच्या लोकांवर सध्या शनीची साडेसती सुरू आहे. शनीच्या अस्तादरम्यान कुंभ राशीच्या लोकांच्या अडचणी आणखी वाढणार आहेत. तुमचे मोठे नुकसान होऊ शकते. तुमच्या आयुष्यात अनेक चढ-उतार येतील. नात्यात दुरावा निर्माण होऊ शकतो. जोडीदाराशी वाद इतके वाढू शकतात की त्यामुळे विभक्त होण्याची शक्यता आहे. शनीच्या अशुभ प्रभावामुळे कुंभ राशीचे लोक काही मोठ्या आजाराला बळी पडू शकतात. कुंभ राशीच्या लोकांना त्यांच्या आरोग्याची विशेष काळजी घ्यावी लागेल. नोकरी आणि व्यवसायातही तुम्हाला अनेक आव्हानांना सामोरे जावे लागेल. तुमच्या कामात अनेक अडथळे येतील.
(टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.)
हेही वाचा :
महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-mid.png)