(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Shani Dev : ना ढैय्या, ना साडेसाती, ना महादशा! 'या' 2 राशींवर नेहमीच असते शनीची कृपा; जगतात राजासारखं आयुष्य
Shani Dev : सर्व नऊ ग्रहांमध्ये शनीला सर्वात क्रूर ग्रह मानतात. शनीला न्यायदेवता म्हटलं जातं. तो प्रत्येकाला आपल्या कर्मानुसार फळ देतो.
Shani Dev : ज्योतिष शास्त्रानुसार, काही राशी अशा असतात ज्यांच्यावर शनीच्या (Shani Dev) साडेसातीचा, ढैय्या किंवा महादशेचा काहीच परिणाम होत नाही. राशीचक्रानुसार, या राशींवर शनीदेवाची (Lord Shani) नेहमीच कृपा असते. या राशींच्या मागे कोणतंच दु:ख किंवा कष्ट नसतं अशी मान्यता असते. या राशी (Zodiac Signs) म्हणजे मकर आणि कुंभ.
खरंतर, व्यक्तीच्या कुंडलीत एकूण नऊ ग्रह असतात. जे वेळेनुसार, एका राशीतून दुसऱ्या राशीत संक्रमण करतात. तर, शनी साडेसाती किंवा ढैय्याच्या माध्यमातून व्यक्तींना चांगल्या आणि वाईट कर्माचा अनुभव देतात. जर, एखाद्या राशीवर साडेसाती असेल तर त्या व्यक्तीला अनेक संकटं, दु:ख आणि आव्हानांचा सामना करावा लागतो.
नऊ ग्रहांमध्ये शनीला सर्वात क्रूर ग्रह मानतात
आपल्या सर्वांनाच माहीत आहे की, सर्व नऊ ग्रहांमध्ये शनीला सर्वात क्रूर ग्रह मानतात. शनीला न्यायदेवता म्हटलं जातं. तो प्रत्येकाला आपल्या कर्मानुसार फळ देतो. ज्योतिष शास्त्रानुसार, कलयुगात शनी एकमात्र असा आहे जो आजपर्यंत प्रत्येकाला त्याच्या कर्मानुसार फळ देतो. शनी हा सर्वात संथ गतीने चालणारा ग्रह आहे. एका राशीतून संक्रमण करून पुन्हा त्याच राशीत येण्यासाठी शनीला तब्बल 30 वर्षांचा कालावधी लागतो. त्यामुळे जर कोणत्याही राशीवर शनीची साडेसाती किंवा ढैय्या असेल तर त्याचा प्रभाव फार दीर्घ काळापर्यंत राहतो. त्यामुळेच या राशींना सावधानतेचा इशारा देण्यात येतो.
शनीला प्रिय आहेत 'या' राशी
ज्योतिष शास्त्रानुसार, शनी सर्व राशींना आपल्या कर्मानुसार फळ देतो. पण, दोन राशी असा आहेत ज्यांच्यावर शनीची नेहमीच कृपा असते. त्यांना कधीच संकटांचा सामना करावा लागत नाही. या राशी म्हणजे मकर आणि कुंभ रास. खरंतर, मकर आणि कुंभ राशींचा स्वामी शनी आहे. त्यामुळे या राशींवर साडेसाती आणि ढैय्याचा परिणाम होत नाही. असं म्हणतात की, कुंडलीत मकर किंवा कुंभ लग्न चरणात असतो त्यामुळे यांच्यावर नेहमी शनीची कृपा असते.या राशींना कष्टायचा सामना करावा लागत नाही. शनी यांना नेहमी सकारात्मक फळ देतो.
(टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.)
हेही वाचा :