Shadashtak Yog : तब्बल 50 वर्षांनंतर सूर्य आणि शनि एकत्र; युतीमुळे बनलेला षडाष्टक योग 'या' राशींवर पडणार भारी, धनहानीसह आरोग्यही खालवणार?
Shadashtak Yog : ज्योतिषशास्त्रानुसार, शनि आणि सूर्य एकत्र आल्याने षडाष्टक योगाची निर्मिती होणार आहे. हा योग अतिशय धोकादायक मानला जातो, त्यामुळे काही राशींवर याचा नकारात्मक परिणाम होणार आहे.
Shadashtak Yog : वैदिक ज्योतिषशास्त्रानुसार, ग्रह एका ठराविक वेळेनंतर आपली स्थिती बदलतो. ग्रहांच्या चाली या कधी शुभ, तर कधी अशुभ ठरतात. आषाढी एकादशीपूर्वी सूर्य आणि शनिच्या संयोगातून धोकादायक योगाची निर्मिती होणार आहे. 16 जुलैला सूर्य देव कर्क राशीत प्रवेश करणार आहेत. सूर्य कर्क राशीत प्रवेश केल्यामुळे शनिसोबत षडाष्टक योग निर्माण होणार आहे. हा योग ज्योतिष शास्त्रात अत्यंत अशुभ मानला जातो. षडाष्टक योगामुळे 3 राशीच्या लोकांच्या आयुष्यात हडकंप येणार आहे.
कर्क रास (Cancer)
शनि आणि सूर्य देवाचा षडाष्टक योग तुमच्यासाठी हानिकारक असणार आहे. कारण तुमच्या राशीतून आठव्या भावात हा योग तयार होणार असल्याने तुम्हाला छुप्या आजारांचा सामना करावा लागणार आहे. हॉस्पिटलच्या पायऱ्या चढाव्या लागणार आहेत. या काळात तुम्हाला एखाद्या गोष्टीचा ताण येणार आहे. त्याच वेळी, तुम्हाला नोकरी आणि व्यवसायात परस्परविरोधी परिस्थितींचा सामना करावा लागू शकतो. तसंच, यावेळी तुम्ही पैसे गुंतवणे करु नका, तुमचा तुमच्या जोडीदाराशी वाद होणार आहे.
सिंह रास (Leo)
या राशीच्या लोकांसाठी शनि आणि सूर्य देवाचा षडाष्टक योग चांगला नाही. कारण शनिदेव मार्केश सिंह राशीत असल्याने शनिदेव तुमच्या राशीपासून 12व्या भावात स्थित असणार आहे. त्यामुळे यावेळी तुम्हाला एखाद्या गोष्टीचा ताण येणार आहे. तब्येतही बिघडणार आहे. या काळात न्यायालयाचा निर्णय तुमच्या विरोधात येण्याची शक्यता आहे. नोकरदार लोकांना कामाच्या ठिकाणी अडचणींचा सामना करावा लागू शकतो.
धनु रास (Sagittarius)
षडाष्टक योग तुमच्यासाठी हानिकारक ठरणार आहे. कारण तुमच्या पारगमन कुंडलीच्या तिसऱ्या घरात शनिदेव आहे तर सूर्यदेव आठव्या घरात आहे. अशा स्थितीत गुप्त शत्रूंपासून सावध राहावे लागणार आहे. तसंच आरोग्याची काळजी घ्या. यावेळी वाहन जपून चालवा. कारण इजा आणि अपघात होण्याची शक्यता असते. तुम्ही व्यावसायिक असाल आणि तुम्ही नवीन गुंतवणूक करण्याचा विचार करु नका. तसंच यावेळी कोणालाही पैसे उधार देऊ नका.
(टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.)
हेही वाचा :