Palmistry : कोणत्या क्षेत्रात तुमचं करिअर रोवेल प्रगतीचा झेंडा? हाताच्या रेषांवरुन जाणून घ्या तुमचं भविष्य
Palmistry : आपल्या हातावरील रेषा पाहून आपल्याला भविष्याबद्दलच्या गोष्टी कळतात. आज अशाच एका गोष्टीबद्दल आपण जाणून घेऊया. तुम्ही कोणत्या क्षेत्रात चांगली प्रगती करू शकता हे आज आपण जाणून घेणार आहोत.
Palmistry : आपल्या हातावरील रेषा म्हणजे आपल्या भविष्याचा आरसा असतो. ज्योतिषशास्त्रात हाताचा आकार आणि बोटांचा आकार तुमच्या व्यक्तिमत्त्वाबद्दल बरंच काही सांगून जातो. व्यक्तीला कोणत्या विषयात रस आहे किंवा त्याला कोणत्या क्षेत्रात आपलं भविष्य घडवायचं आहे, या गोष्टीही हात पाहताच कळू शकतात. व्यक्ती कोणत्या क्षेत्रात आपलं भविष्य घडवेल हे देखील हात पाहून (Palmistry) समजू शकतं, याबद्दलच अधिक जाणून घेऊया.
या लोकांना राजकारणात मिळतं यश
राजकारणात स्वारस्य असलेल्या लोकांच्या हातावर एक विशेष खूण असते. अशा लोकांचे तळवे पांढरे आणि हात लांब असतात. या लोकांच्या तळहातातील सुविकसित गुरू, सूर्य आणि बुध पर्वत ही त्यांची खास ओळख मानली जाते. बृहस्पती पर्वताच्या उंचीपासून मेंदूच्या रेषेची सुरुवात होऊन ती खाली येणं आणि दोन भागात विभागणं, यावरुन देखील राजकारणात रस असल्याचं समजतं. दुसरीकडे राजकारणात छोटी उंची असलेल्या राजकारण्यांच्या हातांबद्दल बोलायचं झालं तर, बृहस्पती पर्वत त्यांच्या हातात लहान असतो आणि बुध पर्वत देखील दबला गेलेला दिसतो. मंगळाच्या पर्वतावर अनेक बारीक रेषा असणं हे देखील राजकारणात यश असल्याचं दर्शवतं.
कवितेत असतो रस
ज्या लोकांना कविता लिहिण्याची किंवा वाचनाची आवड असते, त्यांची बोटं लांब असतात. बोटांचा घेर लांबट असतो. अशा लोकांचे हात सडपातळ परंतु दिसायला सुंदर असतात. त्यांचे तळवे मऊ असल्याने, सूर्य, चंद्र आणि शुक्र पर्वत खूप उंच असतात. अशा लोकांच्या हातातील हृदयरेषा नंतर अनेक शाखांमध्ये विभागली जाते, त्यातून लेखकाचा काव्यात्मक स्वभाव दिसून येतो. असे लोक खूप गोड बोलतात.
या लोकांना असतो वकिलीत रस
हस्तरेषा शास्त्रानुसार, वकिलीमध्ये रुची असलेल्या लोकांचे तळवे खूप रुंद असतात आणि बोटांचा आकार लहान असतो. त्यांचे बुध आणि मंगळ पर्वत खूप पसरलेले असतात आणि मुख्य रेषा आणि जीवनरेषा पूर्णपणे भिन्न असतात. ज्यांना वकिलीची आवड असते, त्यांचे हात अगदी मांसल आणि लाल असतात.
तत्त्वज्ञानी असतात असे लोक
ज्या लोकांची बोटं खूप कठोर असतात आणि ज्यांच्या शिरा बाहेर पडतात, असे लोक सहसा तत्त्वज्ञानी बनतात. अशा लोकांचे हात पातळ, फिकट तपकिरी रंगाचे असतात आणि त्यांच्यात गाठी स्पष्ट दिसतात. मानले जाते की, असे लोक खूप उच्च विचारसरणीचे असतात आणि त्यांचा मोह-मायेशी फारसा संबंध नसतो.
(टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.)
हेही वाचा:
Mangal Gochar 2024 : मंगळ 'या' 6 राशींवर पडणार भारी; आर्थिक अडचणी वाढणार, कुटुंबात खटके उडणार