Palmistry : हातावरची 'ही' हस्तरेखा सांगते तुमच्या लग्नाची व्हॅलिडिटी; अशा व्यक्तींचे विवाह तुटतात, आयुष्यात खरं प्रेमही मिळत नाही
Palmistry : हस्तरेषा शास्त्रानुसार, हाताच्या विवाह रेषेवर जर ही खुण असेल तर अशा व्यक्तींचे प्रेमसंबंध तुटतात आणि विवाहानंतर घटस्फोटाची देखील शक्यता असते.
Marriage Line on Palm : तुमच्या हातावरील रेषांवरुन तुमच्या भविष्याबद्दलची भाकितं केली जातात, हे तुम्हाला माहित असेलच. हस्तरेषा शास्त्रात (Palmistry) तळहातावरील रेषांवरुन भविष्य सांगितलं जातं. तळहातावर अशा काही रेषा असतात, ज्यावरुन व्यक्तीचं वैवाहिक जीवन, करिअर आणि व्यक्तिमत्त्व जाणून घेता येतं. आपल्या तळहातावर अशा काही रेषा असतात, ज्यावरुन वैवाहिक जीवन (Marriage Life) आणि प्रेमसंबंधांबद्दल (Relationships) सांगितलं जातं.
हातावरील विवाह रेषेवर जर ठराविक खुण असेल तर त्या व्यक्तीचे प्रेमसंबंध तुटू शकतात आणि वैवाहिक जीवनात घटस्फोट देखील होऊ शकतो. तसेच अशा व्यक्तीला आयुष्यात खरं प्रेम कधीच मिळत नाही. नेमकी ही खुण कोणती? जाणून घेऊया.
विवाह रेषेवरील या खुणेमुळे होतात ब्रेकअप
काही जणांच्या विवाह रेषेवर काट्यासारखी खूण असते. हस्तरेषा शास्त्रानुसार, जर तुमच्या विवाह रेषेवर काट्यासारखं चिन्ह असेल तर काही काळानंतर तुमचा ब्रेकअप होऊ शकतो. तसेच अशा लोकांचं नातं हे गैरसमजामुळे किंवा तिसऱ्या व्यक्तीमुळे तुटतं.
छोट्या-छोट्या गोष्टीवरुन जोडीदारासोबत होतात भांडणं
दुसरीकडे, जर एखाद्या व्यक्तीच्या हातावर विवाह रेषेखालीच आणखी एक छोटी रेषा असेल तर अशा लोकांच्या आयुष्यात घटस्फोट किंवा ब्रेकअप होण्याचा धोका अधिक असतो. तसंच अशा लोकांचे प्रत्येक बाबतीत वाद-विवाद होत असतात. असे लोक अहंकारीही असतात.
ही हस्तरेषा असल्यास लग्न उशिरा होतं
एखाद्या व्यक्तीची विवाह रेषा वरच्या बाजूला गेली आणि बोटापर्यंत पोहचत असेल तर अशा व्यक्तींना वैवाहिक जीवनात खूपच त्रास होतो. या व्यक्तींचं लग्न फार उशिरा होतं, कधी-कधी वयाच्या तिशीनंतर हे लोक लग्न करतात. बऱ्याचदा अशा व्यक्तींचं लग्न देखील होत नाही.
...तर तुमचं लग्न लवकर होणार
विवाह रेषा आणि हृदय रेषेमधील अंतर तुमचं लग्न कधी होणार हे निश्चित करते. जर या दोन्ही रेषा एकमेकांच्या जवळ असतील तर तुमचं लग्न लवकर होण्याची शक्यता असते.
अफेअर्सची असते शक्यता
हातावर एकापेक्षा जास्त विवाह रेषा असल्यास तुमचं अफेअर होण्याची शक्यता असते. तसंच असं असल्यास, दोन वेळा लग्न होण्याचीही शक्यता असते. ही रेषा जर खालच्या दिशेने झुकली असेल तर तुम्हाला तुमच्या लग्नामध्ये समस्यांचा सामना करावा लागतो.
(टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.)
हेही वाचा: