Mangal Gochar 2024 : मंगळ 'या' 6 राशींवर पडणार भारी; आर्थिक अडचणी वाढणार, कुटुंबात खटके उडणार
Mangal Gochar 2024 : मंगळ ग्रहाने वृषभ राशीत प्रवेश केल्यामुळे 6 राशीच्या लोकांना अडचणींचा सामना करावा लागू शकतो. मंगळाच्या राशी बदलाचा कोणत्या 6 राशींवर अशुभ परिणाम होणार? जाणून घेऊया.
Mangal Gochar 2024 : ज्योतिषशास्त्रात मंगळ हा कडक ग्रह मानला जातो. मंगळ ग्रहाच्या राशी बदलाचा परिणाम सर्व राशींवर पडतो. काही राशींवर याचे शुभ परिणाम पाहायला मिळतात, तर काही राशींवर अशुभ परिणाम पाहायला मिळतात. त्यातच आता 12 मंगळ ग्रहाने वृषभ राशीत प्रवेश केला आहे. 26 ऑगस्टपर्यंत तब्बल 46 दिवस मंगळ वृषभ राशीत स्थित असेल. या काळात मंगळाच्या राशी बदलाचा 6 राशींवर अशुभ परिणाम होऊ शकतो, या राशी (Zodiac Signs) नेमक्या कोणत्या? जाणून घेऊया.
या राशींवर कोसळणार संकटांचा डोंगर
मेष रास (Aries)
मंगळाच्या राशी बदलाचा मेष राशीच्या लोकांवर नकारात्मक परिणाम पाहायला मिळू शकतो. या काळात तुमच्याकडे पैसा टिकेल, परंतु कुटुंबात मतभेद होऊ शकतात. यामुळे तुम्ही तणावात याल. 12 जुलै ते 26 ऑगस्ट दरम्यान कोणालाही पैसे उधार देऊ नका, अन्यथा ते अडकू शकतात आणि ते परत मिळणं कठीण होईल. वादामुळे कोर्टात जाण्यासारखी परिस्थिती उद्भवू शकते.
मिथुन रास (Gemini)
मंगळाच्या राशी बदलामुळे मिथुन राशीच्या लोकांच्या जीवनात अनावश्यक खर्च आणि धावपळ होण्याची परिस्थिती निर्माण होऊ शकते. या काळात तुम्ही कोणत्याही प्रकारचं कर्ज घेणं टाळावं. 12 जुलैनंतर तुम्ही तुमच्या आरोग्याची काळजी घ्यावी. साथीचे आजार तुम्हाला त्रास देऊ शकतात. त्वचारोग आणि पोटाच्या विकारांमुळे समस्या वाढू शकतात. तुम्हाला तुमच्या आहाराकडे विशेष लक्ष द्यावं लागेल.
कर्क रास (Cancer)
मंगळाच्या संक्रमणामुळे कर्क राशीच्या लोकांच्या जीवनात अनेक प्रकारचे चढ-उतार पाहायला मिळतील. विशेषत: वैवाहिक जीवनात तुमचे तुमच्या जोडीदारासोबत खटके उडतील. नातेसंबंध बिघडू शकतात. यामुळे तुमचं मानसिक आरोग्य बिघडू शकतं. निद्रानाश आणि तणावाचा आरोग्यावर विपरीत परिणाम होऊ शकतो. योग आणि ध्यान करावं. दरम्यान, तुम्हाला तुमच्या जोडीदाराशी वाद टाळावे लागतील.
तूळ रास (Libra)
मंगळाच्या राशी बदलामुळे तूळ राशीच्या लोकांना आरोग्याशी संबंधित समस्यांना सामोरं जावं लागू शकतं. पावसाळ्यात बाहेरचे पदार्थ खाऊ नका. पोटाशी संबंधित समस्या भेडसावू शकतात. वैवाहिक जीवनासाठीही हा काळ कठीण जाणार आहे. तुमचे तुमच्या जोडीदारासोबत छोट्या-छोट्या गोष्टींवरून वाद होऊ शकतात. वाद टाळा.
धनु रास (Sagittarius)
मंगळाच्या राशी बदलामुळे धनु राशीच्या लोकांना आर्थिक संकटाचा सामना करावा लागू शकतो. उत्पन्न असेल, पण अचानक खर्च तुमची बचत संपवेल. अशा परिस्थितीत तुम्हाला तुमच्या अनावश्यक खर्चावर नियंत्रण ठेवण्याचा सल्ला दिला जातो. तुमच्यावर कर्ज घेण्याची परिस्थिती देखील येऊ शकते. दरम्यान, कोणालाही कर्ज देऊ नका, ते पैसे अडकू शकतात.
कुंभ रास (Aquarius)
मंगळाच्या राशी बदलामुळे कुंभ राशीच्या लोकांना घरगुती त्रास आणि मानसिक त्रासातून जावं लागेल. कुटुंबातील सदस्यांशी वाद होऊ शकतात, ज्यामुळे तुम्हाला मानसिक त्रास होऊ शकतो. 12 जुलै ते 26 ऑगस्ट दरम्यान तुम्हाला काही वाईट बातमी ऐकू येईल. कामाच्या संदर्भात तुम्हाला खूप प्रवास करावा लागू शकतो. या काळात तुम्हाला तुमच्या गोष्टींची काळजी घ्यावी लागेल.
(टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.)
हेही वाचा: