एक्स्प्लोर
Advertisement
Nirjala Ekadashi 2024 : निर्जला एकादशीच्या दिवशी करा 'हे' उपाय; लक्ष्मी होईल प्रसन्न, मनातील इच्छा होतील पूर्ण
Nirjala Ekadashi 2024 : निर्जला एकादशीचे व्रत केल्यास दीर्घायुष्य आणि मोक्षप्राप्तीचे वरदान मिळते.
Nirjala Ekadashi 2024 : आज 18 जून रोजी निर्जला एकादशी (Nirjala Ekadashi) साजरी केली जाणार आहे. सर्व एकादशींमध्ये निर्जला एकादशी सर्वश्रेष्ठ मानली जाते. पौराणिक मान्यतेनुसार, निर्जला एकादशीचा उपवास केल्यास वर्षातील सर्व एकादशी सारखेच फळ मिळते. निर्जला एकादशीचा उपवास केल्याने, भगवान विष्णू प्रसन्न होतात आणि सर्व भक्तांना आशीर्वाद देतात.
निर्जला एकादशीचे व्रत केल्यास दीर्घायुष्य आणि मोक्षप्राप्तीचे वरदान मिळते. या दिवशी काही विशेष उपाय केल्याने भाग्य बदलते. या संदर्भात अधिक माहिती जाणून घेऊयात.
निर्जला एकादशीसाठी उपाय
- निर्जला एकादशीच्या दिवशी भगवान विष्णूला लाल रंगाची फुले अर्पण करावीत. या दिवशी सात प्रकारचे धान्य दान केल्याने भगवान विष्णूची तसेच देवी लक्ष्मीचा आशीर्वाद मिळतो.
- निर्जला एकादशीला भगवान विष्णूला पिवळ्या रंगाचे वस्त्र अर्पण करावे. याशिवाय तांदळाची खीर अर्पण करणेही खूप चांगले मानले जाते.
- या एकादशीला खीर बनवून भगवान विष्णू आणि माता लक्ष्मीला अर्पण करावी. तसेच, घरातील सर्व सदस्यांना अर्पण करावी आणि प्रसाद म्हणून वाटावी. असे केल्याने देवी लक्ष्मीचा विशेष आशीर्वाद प्राप्त होतो.
- निर्जला एकादशीच्या दिवशी लक्ष्मीदेवीला लाल रंगाचे वस्त्र अर्पण करावे आणि या दिवशी पिवळे वस्त्र परिधान करून पूजा करावी. देवी लक्ष्मीच्या कृपेने तुमच्या आर्थिक समस्या दूर होतील.
- निर्जला एकादशीच्या दिवशी वाटसरूंना गूळ आणि हरभरा दान करणे शुभ असते. असे केल्याने करिअरमध्ये यश मिळते.
- या एकादशीला पिवळ्या फळांचे दान करणेही फलदायी ठरू शकते. या दिवशी भगवान विष्णूला दही आणि केशर अर्पण करावे. यामुळे वैवाहिक जीवन आनंदी राहते आणि चांगला वर प्राप्त होतो अशी मान्यता आहे.
- निर्जला एकादशीला पिंपळाच्या झाडावर तिळाच्या तेलाचा दिवा लावून त्याची सात ते अकरा वेळा प्रदक्षिणा करावी. असे केल्याने संकटांपासून मुक्ती मिळते आणि देवी लक्ष्मीची कृपा प्राप्त होते.
- या दिवशी जल कलश दान करणाऱ्या भाविकांना खूप आशीर्वाद मिळतात. या एकादशीचे व्रत केल्याने इतर एकादशीला अन्न खाण्याचे पाप नाहीसे होऊन सर्व एकादशींचे पुण्य लाभते, असे मानले जाते.
(टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.)
हेही वाचा :
Nirjala Ekadashi 2024 : निर्जला एकादशीच्या तिथीबद्दल बराच संभ्रम; जाणून घ्या अचूक तारीख आणि महत्त्व
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
निवडणूक
भविष्य
क्राईम
निवडणूक
Advertisement