New Year 2023 : नवीन वर्षात 'या' वस्तुंची खरेदी करा, वर्षभर राहील लक्ष्मीचा आशीर्वाद
New Year 2023 : नवीन वर्ष आनंदाचे आणि सुखाचे जावे अशी प्रत्येकाची इच्छा असते. गतवर्षी अपूर्ण राहिलेली कामे या वर्षी पूर्ण होवोत आणि वर्षभर घरात सुख, समृद्धी आणि आनंद राहो, असे प्रत्येकाला वाटत असते. परंतु, हे तेव्हाच शक्य आहे जेव्हा लक्ष्मीची कृपा तुमच्या घरावर राहील.
New Year 2023 : प्रत्येकजण नवीन वर्ष 2023 ची आतुरतेने वाट पाहत आहे. नवीन वर्ष आनंदाचे आणि सुखाचे जावे अशी प्रत्येकाची इच्छा असते. गतवर्षी अपूर्ण राहिलेली कामे या वर्षी पूर्ण होवोत आणि वर्षभर घरात सुख, समृद्धी आणि आनंद राहो, असे प्रत्येकाला वाटत असते. परंतु, हे तेव्हाच शक्य आहे जेव्हा लक्ष्मीची कृपा तुमच्या घरावर राहील.
नवीन वर्ष 2023 मध्ये धन-समृद्धीची देवी लक्ष्मी मातेचा आशीर्वाद तुमच्या घरावर राहावा आणि वर्षभर घरात कोणत्याही प्रकारची कमतरता भासू नये असे तुम्हाला वाटत असेल. त्यासाठी नवीन वर्षात घरासाठी काही शुभ गोष्टींची खरेदी नक्की करा. नववर्षाच्या शुभ मुहूर्तावर या शुभ गोष्टी घरी आणल्यास घरामध्ये मंगल, आर्थिक समृद्धी आणि माता लक्ष्मीचा आशीर्वाद वर्षभर राहील.
तुळशीचे रोप
तुळशीला लक्ष्मीचे प्रतीक मानले जाते. जिथे हिरवे तुळशीचे रोप असते तिथे लक्ष्मीचा वास असतो. म्हणूनच नवीन वर्षात तुमच्या घरी नवीन तुळशीचे रोप नक्की लावा.
मोर पंख
हिंदू धर्मात मोराचे पंख अत्यंत शुभ मानले जातात. नवीन वर्षाच्या निमित्ताने तुमच्या घरासाठी मोराची पिसे अवश्य खरेदी करा. शास्त्रानुसार भगवान श्रीकृष्णाला मोराची पिसे खूप प्रिय आहेत. असे मानले जाते की ज्या घरामध्ये मोराचे पंख असते त्या घराची आर्थिक स्थिती मजबूत राहते.
दक्षिणी शंख
असे मानले जाते की ज्या घरामध्ये दक्षिणाभिमुख शंख असतो, तिथे देवी लक्ष्मीचाही वास असतो. यासोबतच घरात शंख ठेवणे हे शुभाचे प्रतीक आहे. म्हणूनच नवीन वर्षाच्या दिवशी घरासाठी शंख खरेदी करा आणि घराच्या मंदिरात ठेवा. यामुळे देवी लक्ष्मीच्या आशीर्वादाने वर्षभर घरात धनाचा वर्षाव होईल.
लहान नारळ
लहान नारळाला श्रीफळ असेही म्हणतात. म्हणजे माता लक्ष्मीचे फळ. नवीन वर्षात हा नारळ खरेदी करा आणि पूजेनंतर घराच्या तिजोरीत ठेवा. यामुळे आर्थिक स्थिती सुधारेल, पैशाची बचत होईल आणि समृद्धी राहील. तिजोरीत नारळ ठेवताना 'ऐन हरी श्री क्लीन' या मंत्राचा जप करावा.
फिश एक्वैरियम
जर तुम्ही घरासाठी फिश एक्वैरियम खरेदी करण्याचा विचार करत असाल तर नवीन वर्षाचा दिवस यासाठी सर्वोत्तम आहे. नवीन वर्षावर आपण घरासाठी एक्वैरियम खरेदी करू शकता. वास्तूनुसार ज्या घरात फिश एक्वैरियम असेल तिथे वाईट नजरेचा प्रभाव पडत नाही. यासोबतच उत्तर दिशेला ठेवल्याने पैशाची कमतरता भासत नाही.
(टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.)
महत्वाच्या बातम्या