Astrology : यंदाची मोक्षदा एकादशी 3 राशींसाठी ठरणार खास; 11 डिसेंबरपासून उजळणार नशीब, उत्पन्नाचे नवे स्रोत होणार खुले
Astrology 11 December 2024 : यंदाची मोक्षदा एकादशी काही राशींसाठी विशेष ठरणार आहे. या काळात मोठ्या ग्रहांच्या हालचाली होत आहेत, जे 3 राशींचं नशीब पालटू शकतात.
Astrology 11 December 2024 : ज्योतिषशास्त्रानुसार, 11 डिसेंबरपासून अनेक ग्रहांच्या चाली बदलत आहेत, ज्याचा परिणाम सर्व राशींवर होईल. 11 डिसेंबरला शुक्रदेव श्रवण नक्षत्रात प्रवेश करणार आहे. शुक्राचा श्रवण नक्षत्रातील प्रवेश अतिशय शुभ मानला जातो. जेव्हा शुक्र या नक्षत्रात प्रवेश करतो तेव्हा काही राशीचं निद्रीस्त भाग्य देखील बदलतं. त्यामुळे शुक्राच्या संक्रमणामुळे 11 डिसेंबरपासून कोणत्या राशी (Zodiac Signs) सुखात जीवन जगणार? जाणून घेऊया.
मकर रास (Capricorn)
या राशीत शुक्र वरच्या घरात असेल, अशा स्थितीत या राशीचे लोक प्रत्येक क्षेत्रात यश मिळवू शकतात. प्रदीर्घ प्रलंबित कामं पूर्ण होऊ शकतात. सुख-सुविधांमध्ये वाढ होण्याची शक्यता आहे. भौतिक सुख मिळू शकतं. यासोबतच करिअरच्या क्षेत्रातही बरेच फायदे होतील. तुमच्या कामाबद्दल तुमचं कौतुक होईल, ज्यामुळे पदोन्नती तसेच पगारात वाढ होऊ शकते. याशिवाय काही नवीन नोकरीच्या संधी मिळण्याची शक्यताही खूप आहे. व्यवसायात तुम्ही केलेली योजना फायदेशीर ठरू शकते. लव्ह लाईफ चांगलं जाणार आहे. अविवाहितांना लग्नाचा प्रस्ताव येऊ शकतो. वैवाहिक जीवनात सुरू असलेल्या समस्या आता संपुष्टात येऊ शकतात. आर्थिक स्थितीही चांगली राहील.
धनु रास (Sagittarius)
या राशीच्या दुसऱ्या घरात शुक्र असेल. अशा स्थितीत या राशीच्या लोकांना प्रवासाच्या माध्यमातून बरेच आर्थिक लाभ मिळू शकतात. तुम्ही तुमच्या कुटुंबासोबत चांगला वेळ घालवू शकाल. करिअरच्या क्षेत्रातही तुम्हाला लाभ मिळण्याची शक्यता आहे. तुमच्या कामात तुम्हाला थोडं दडपण जाणवेल. अशा स्थितीत या राशीचे लोक लवकर नवीन नोकरी शोधू शकतात. व्यवसायात तुम्ही तुमच्या प्रतिस्पर्ध्यांना कडवी टक्कर देताना दिसाल. तुम्हाला मोठा आर्थिक लाभ मिळू शकतो. तुमची आर्थिक स्थिती चांगली राहील, मात्र अनावश्यक खर्च टाळा, अन्यथा कर्ज घेण्याची वेळ ओढावेल.
वृषभ रास (Taurus)
शुक्राचा नक्षत्र प्रवेश वृषभ राशीच्या भाग्याच्या घरात राहणार आहे. अशा स्थितीत या राशीच्या लोकांना नशिबाची पूर्ण साथ मिळेल, ज्यामुळे प्रत्येक क्षेत्रात यश आणि भरपूर आर्थिक लाभ होण्याची शक्यता आहे. तुमचा अध्यात्माकडे अधिक कल असेल. नोकरीच्या अनेक नवीन संधी उपलब्ध होऊ शकतात. या काळात तुम्ही समाधानी दिसू शकता. तुम्हाला व्यवसायाशी संबंधित काही प्रवास करावा लागू शकतो. पण यातून तुम्हाला खूप फायदा होऊ शकतो. आर्थिक स्थिती चांगली राहील. परंतु वैवाहिक जीवन आणि लव्ह लाईफबाबत थोडं सावध राहण्याची गरज आहे, कारण तुमच्या आयुष्यात अडचणी निर्माण होऊ शकतात. आरोग्याची विशेष काळजी घ्या.
टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.)
हेही वाचा: