Mangal Gochar 2024 : पुढचे 46 दिवस 'या' 6 राशींचा सुरु होणार वाईट काळ; मंगळ ग्रहाच्या संक्रमणाने एकामागोमाग येतील संकटं
Mangal Gochar 2024 : मंगळ ग्रहाचा वृषभ राशीत प्रवेश होणार आहे. मंगळ ग्रह 26 ऑगस्ट 2024 च्या दुपारी 03 वाजून 40 मिनिटांपर्यंत याच राशीत स्थित असणार आहे.
Mangal Gochar 2024 : साहस, पराक्रम, लग्न आणि भूमिचा दाता असलेला मंगळ ग्रह (Mangal Gochar) आज संध्याकाळी 7 वाजून 12 मिनिटांनी संक्रमण करणार आहे. मंगळ ग्रहाचा वृषभ राशीत प्रवेश होणार आहे. मंगळ ग्रह 26 ऑगस्ट 2024 च्या दुपारी 03 वाजून 40 मिनिटांपर्यंत याच राशीत स्थित असणार आहे. या दरम्यान सहा राशीच्या लोकांना अनेक संकटांचा सामना करावा लागेल. तसेच, पुढचे 46 दिवस या राशींनी सावधान राहण्याची गरज आहे. या राशी (Zodiac Signs) नेमक्या कोणत्या ते जाणून घेऊयात.
मेष रास (Aries Horoscope)
संक्रमणाच्या या काळात तुमची आर्थिक स्थिती चांगली असेल मात्र तुमच्या वैयक्तिक आयुष्यात सुख-शांती नसणार. कुटुंबात अनेक कारणांवरून वादविवाद होण्याची शक्यता आहे. अशा वेळी तुम्ही वाणीवर नियंत्रण ठेवणं गरजेचं आहे. अन्यथा वाद चिघळेल.
मिथुन रास (Gemini Horoscope)
मिथुन राशीच्या लोकांचा या काळात जास्त खर्च होणार आहे. कोणत्याच प्रकारे कर्ज घेऊ नका. अन्यथा ते फेडणं कठीण होईल. काही कारणास्तव व्यवसायात तुम्हाला धावपळ करावी लागू शकते. साथीच्या आजाराने त्रस्त असाल.
कर्क रास (Cancer Horoscope)
कर्क राशीच्या लोकांना या काळात अनेक चढ-उतारांचा सामना करावा लागेल. नातेसंबंध जपताना अनेक अडचणींचा सामना करावा लागेल. तसेच, जोडीदाराबरोबर छोट्या कारणांवरून खटके उडण्याची शक्यता आहे.
तूळ रास (Libra Horoscope)
तूळ राशीच्या लोकांनी या काळात बाहेरचं अन्न खाणं टाळावं. तसेच,संपत्तीच्या बाबतीत सावधानता बाळगणं गरजेचं आहे. जोडीदाराबरोबर वाद होण्याची शक्यता आहे.
धनु रास (Sagittarius Horoscope)
या काळात तुम्हाला आर्थिक तंगीचा सामना करावा लागू शकतो. यासाठी पैसे जबाबदारी खर्च करा. तसेच, कोणालाही पैसे उधार देऊ नका. डोळ्यांच्या संबंधित तक्रारी जाणवू शकतात.
कुंभ रास (Aquarius Horoscope)
कुंभ राशीच्या लोकांसाठी हा काळ फार आव्हानात्मक असण्याची शक्यता आहे. घरात छोट्या-मोठ्या कारणांवरून वाद होण्याची शक्यता आहे. कामाच्या ठिकाणी हलगर्जीपणा करू नका.
(टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.)
हेही वाचा :