Makar Sankranti 2024 : मकरसंक्रातीच्या दिवशी करा या '5' गोष्टींचे दान, काय आहे या दिवशी दानपुण्याचं महत्त्व?
Makar Sankranti 2024 : मकरसंक्रांतीच्या निमित्ताने तुम्ही गरजूंना काहीही दान करू शकता. तसेच या दिवशी काही गोष्टी दान करणे याला विशेष महत्त्व आहे.
मुंबई : सूर्य ज्या दिवशी मकर राशीत प्रवेश करतो, त्या दिवशी मकससंक्रांत (Makar Sankrant) हा सण साजरा केला जातो. मकर संक्रांतीला उत्तरायण, पोंगल या नावाने देखील ओळखले जाते. तसेच या दिवसाला जप, तपश्चर्या, स्नान आणि दान यांचा दिवस देखील म्हटलं जातं. दरवर्षी हा उत्सव 14 किंवा 15 जानेवारीला साजरा केला जातो. पण यंदा सूर्य 14 जानेवारीच्या रात्री 02:44 वाजता मकर राशीत प्रवेश करेल. त्यामुळे यंदा मकरसंक्रात 15 जानेवारी रोजी साजरी केली जाणार आहे.
असं म्हटलं जातं की, मकरसंक्रांतीच्या दिवसापासून सूर्य उत्तरेकडे प्रवास सुरु करतो आणि स्वर्गाचे दरवाजे उघडतात. याला सूर्याची उत्तरायण म्हणतात. सूर्य उगवल्यानंतर दिवस मोठे होऊ लागतो आणि रात्र हळूहळू लहान होऊ लागते. या शुभ दिवशी तुम्ही पवित्र नद्यांमध्ये स्नान केले किंवा दान केले तर त्याचे फळ अनेक पटीने वाढते, असं म्हटलं जातं. या दिवशी तुम्ही गरजूंना काहीही दान करू शकता, परंतु अशा 5 गोष्टी आहेत ज्या या दिवशी दान करणे खूप शुभ मानले जाते.
गूळ
गूळाचा सूर्यदेवाशी संबंध असल्याचं मानलं जातं. असं म्हटलं जातं की, मकरसंक्रांतीच्या दिवशी गुळाचे दान केल्याने गुरु आणि सूर्याशी संबंधित सर्व समस्या दूर होतात. या दोन ग्रहांच्या सुधारणेमुळे करिअरमध्ये चांगली प्रगती होते आणि मान-सन्मान आणि कीर्ती वाढते.
काळे तीळ
या दिवशी काळ्या तिळाचे दान करण्याला देखील विशेष महत्त्व आहे. वास्तविक मकरसंक्रांतीच्या दिवशी सूर्य मकर राशीत येतो आणि मकर ही शनीची राशी आहे. पिता-पुत्र असूनही सूर्य आणि शनीच्या वैराची भावना आहे, परंतु सूर्य शनीच्या घरी येणे आणि त्यात राहणे हे प्रेमाचे प्रतीक आहे. अशा स्थितीत या दिवशी शनिशी संबंधित वस्तूंचे दान आणि प्रसाद वगैरे दिला जातो. काळे तीळ शनिशी संबंधित आहे. त्यामुळे काळे तीळ टाकून सूर्याला जल अर्पण करा आणि काळे तीळही दान करणं लाभदायक ठरु शकतं
खिचडी
मकर संक्रांतीच्या दिवशी खिचडी तयार करून खाल्ली जाते आणि खिचडीचे दानही केले जाते. काळ्या उडीद डाळ खिचडीचेही दान करावे. काळी उडीद शनिशी संबंधित आहे आणि तांदूळ अक्षय धान्य मानले जाते. त्यांचे दान केल्याने शनिदोषापासून मुक्ती मिळते आणि घर धनधान्याने भरलेले राहते.
तूप
संक्रांतीच्या दिवशीही तुपाचे दान करावे. जेवढे तुप दान करता येईल तेवढे दान करा, पण करा. तुपाचा संबंध सूर्य आणि गुरूशी संबंधित मानला जातो. तसेच तूप हे समृद्धीचे प्रतीक मानले जाते. याचे दान केल्याने करिअरमधील यशासोबत सर्व प्रकारचे भौतिक सुख प्राप्त होते, असं म्हटलं जातं.
ब्लँकेट
मकर संक्रांतीच्या वेळी हिवाळा असतो. अशा परिस्थितीत ब्लँकेट दान करणे खूप चांगले मानले जाते. काळे ब्लँकेट दान करण्याचा प्रयत्न करा. एखाद्या गरजू व्यक्तीला काळे ब्लँकेट दान केल्याने राहू आणि शनि या दोन्हींशी संबंधित समस्या दूर होतात. पण घोंगडी फाटलेली किंवा वापरली जाऊ नये आणि ती देण्याचा हेतू चांगला असावा.
टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.