Maharashtra Day 2024 Wishes : महाराष्ट्र दिनाच्या प्रियजनांना द्या 'या' खास शुभेच्छा; मायभूमीला करा वंदन, पाठवा 'हे' मेसेज
Maharashtra Din Wishes In Marathi : दरवर्षी 1 मे रोजी महाराष्ट्र दिन साजरा केला जातो. या दिवशी स्वतंत्र महाराष्ट्र राज्याची निर्मिती झाली होती. महाराष्ट्राच्या स्थापना दिनी सर्वत्र उत्साह असतो, प्रियजनांना शुभेच्छा देत तुम्ही या दिवसाची गोडी वाढवू शकता.
![Maharashtra Day 2024 Wishes : महाराष्ट्र दिनाच्या प्रियजनांना द्या 'या' खास शुभेच्छा; मायभूमीला करा वंदन, पाठवा 'हे' मेसेज Maharashtra Din Wishes in Marathi messages quotes images greetings keep status of this Maharashtra Din shubheccha sandesh in marathi Maharashtra Day 2024 Wishes : महाराष्ट्र दिनाच्या प्रियजनांना द्या 'या' खास शुभेच्छा; मायभूमीला करा वंदन, पाठवा 'हे' मेसेज](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2024/04/30/aab9a86f76dc169dd558eeaaf887b3c71714469496690713_original.jpeg?impolicy=abp_cdn&imwidth=1200&height=675)
Maharashtra Din Wishes In Marathi : महाराष्ट्र दिन (Maharashtra Day 2024) म्हणजे महाराष्ट्र राज्याचा स्थापना दिवस. 1960 मध्ये 1 मे रोजी महाराष्ट्र आणि गुजरातची विभागणी करुन या दोन नवीन राज्यांची निर्मिती झाली. महाराष्ट्र दिन हा मराठी अस्मितेचा दिवस आहे. मराठी माणसासाठी हा दिवस विशेष असतो, या दिवशी सर्वांना महाराष्ट्र दिनाच्या शुभेच्छा दिल्या जातात. यंदाच्या महाराष्ट्राच्या दिनानिमित्त तुम्ही तुमच्या जवळच्या व्यक्तींना मराठीमध्ये संदेश पाठवून महाराष्ट्राच्या दिनाच्या खास शुभेच्छा (Maharashtra Din Wishes In Marathi) देऊ शकता.
महाराष्ट्र दिन शुभेच्छा संदेश (Maharashtra Din Wishes In Marathi)
सह्याद्रीचा सिंह गर्जतो, शिवशंभू राजा..
दरीदरीतून नाद गुंजला,
महाराष्ट्र माझा.. जय जय महाराष्ट्र माझा…
महाराष्ट्र दिनाच्या हार्दिक शुभेच्छा!
मराठी भाषा, मराठी मन,
अभिमान महाराष्ट्राचा,
स्वाभिमान मराठीचा...!!
महाराष्ट्र दिनाच्या हार्दिक शुभेच्छा..!
ज्ञानाच्या देशा,
प्रगतीच्या देशा आणि संताच्या देशा,
महाराष्ट्र दिनाच्या मनापासून शुभेच्छा...!
बहु असोत सुंदर संपन्न की महा...
प्रिय अमुचा एक महाराष्ट्र देश हा...
जय महाराष्ट्र महाराष्ट्र दिनाच्या हार्दिक शुभेच्छा!
मंगल देशा...
पवित्र देशा...
महाराष्ट्र देशा...
प्रणाम घ्यावा माझा
हा महाराष्ट्र देशा....
महाराष्ट्र दिनाच्या हार्दिक शुभेच्छा
जन्मलो ज्या मातीस ती माती मराठी…
गुणगुणलो जे गीत गीत मराठी…
महाराष्ट्र दिनाच्या हार्दिक शुभेच्छा!
महाराष्ट्राची यशो गाथा,
महाराष्ट्राची शौर्य कथा,
पवित्र माती लावू कपाळी,
धरणी मातेच्या चरणी माथा
महाराष्ट्र दिनाच्या हार्दिक शुभेच्छा!
अभिनान आहे मराठी असल्याचा
माझ्या मातीचा, माझ्या महाराष्ट्राचा
महाराष्ट्र दिनाच्या हार्दिक शुभेच्छा !
भीती न आम्हा तुझी मुळी ही गडगडणाऱ्या नभा
अस्मानाच्या सुलतानीला जवाब देती जीभा
सह्याद्रीचा सिंह गर्जतो, शिवशंभू राजा
दरीदरीतून नाद गुंजला, महाराष्ट्र माझा
महाराष्ट्र दिनाच्या हार्दिक शुभेच्छा!
माझा महाराष्ट्र माझा,
मनोमनी वसला शिवाजी राजा,
वंदितो या भगव्या ध्वजा,
गर्जतो, गर्जतो महाराष्ट्र माझा…
गर्जा महाराष्ट्र माझा…!
महाराष्ट्र दिनाच्या हार्दिक शुभेच्छा!
पुर्नजन्म घेतला तरी महाराष्ट्रात घेईन
आणि या मातीत जन्मलेल्या वीरांसारखा शूरवीर होईन
महाराष्ट्र दिन शुभेच्छा संदेश!
जय जय महाराष्ट्र माझा..
गर्जा महाराष्ट्र माझा..
महाराष्ट्र दिन आणि कामगार दिनाच्या
हार्दिक शुभेच्छा..!
दगड होईन तर सह्याद्रीचा होईन
माती झालो तर महाराष्ट्राची होईन
तलवार झालो तर आई भवानीची होईन
जय भवानी जय शिवाजी
महाराष्ट्र दिनाच्या हार्दिक शुभेच्छा
आम्हाला अभिमान आहे
महाराष्ट्रीय असल्याचा,
आम्हाला गर्व आहे मराठी भाषेचा,
आम्ही जपतो आमची संस्कृती, आमची निष्ठा,
महाराष्ट्र दिनाच्या मनापासून शुभेच्छा...
जय महाराष्ट्र..!
महान संतांची जन्मभूमी, विज्ञानाने जेथे केली प्रगती प्रेम, आदर, स्नेह आणि माणुसकी हीच आहे आमची संस्कृती. महाराष्ट्र दिनाच्या मनापासून शुभेच्छा.. जय महाराष्ट्र..!
नतमस्तक झालो ज्या वीरांपुढे
ज्यांनी रचली शौर्याची गाथा
जाणता होता आमचा राजा
अशा महाराष्ट्र देशा
तुझ्या भूमीला माझं वंदन
महाराष्ट्र दिनाच्या हार्दिक शुभेच्छा
महाराष्ट्राची यशो गाथा,
महाराष्ट्राची शौर्य कथा,
पवित्र माती लावू कपाळी,
धरणी मातेच्या चरणी माथा
महाराष्ट्र दिनाच्या हार्दिक शुभेच्छा!
लाभले आम्हास भाग्य बोलतो मराठी…
मराठी भाषिकांना आणि महाराष्ट्रातील प्रत्येक नागरिकाला महाराष्ट्र दिनाच्या शुभेच्छा!
सर्वांनी एकत्र येऊन महाराष्ट्राची उज्वल दिशेकडे वाटचाल करूया,
एकमेंकाना जपूया आणि महाराष्ट्राची धुरा सांभाळूया,
महाराष्ट्र दिन शुभेच्छा संदेश!
आम्हाला अभिमान आहे महाराष्ट्रीय असण्याचा
आम्हाला गर्व आहे मराठी भाषेचा
आम्ही जपतो आमची संस्कृती
आमची निष्ठा आहे मातीशी
महाराष्ट्र दिनाच्या शुभेच्छा!
महाराष्ट्रासाठी आहुती दिलेल्या
त्या सर्वांना मानाचा मुजरा..!
आंतरराष्ट्रीय कामगार दिन
आणि महाराष्ट्र दिनानिमित्त,
सर्व मराठी बांधवाना हार्दिक शुभेच्छा..!
मर्द मराठ्यांचा हा मुलुख
शांतता, आनंद आणि अभिमान असलेल्या
महाराष्ट्राचा अभिमान आहे मला
महाराष्ट्र दिनाच्या हार्दिक शुभेच्छा...!
हेही वाचा:
महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-mid.png)