Lucky Zodiac Signs : 5 नोव्हेंबरचा दिवस ठरणार गेमचेंजर! देव दिवाळीच्या शुभ मुहूर्तावर 5 राशींना लागणार लॉटरी; वेळोवेळी मिळतील 'हे' शुभ संकेत
Lucky Zodiac Signs On 5 November 2025 : उद्याच्या दिशी कार्तिक पौर्णिमा अर्थात देव दिवाळी कारणाने या दिवसाला फार महत्त्व प्राप्त झालं आहे.

Lucky Zodiac Signs On 5 November 2025 : ज्योतिषशास्त्रानुसार, उद्या 5 नोव्हेंबरचा दिवस आहे. हा दिवस गणरायाला समर्पित आहे. तसेच, उद्याच्या दिशी कार्तिक पौर्णिमा अर्थात देव दिवाळी (Dev Diwali) कारणाने या दिवसाला अनन्य साधारण महत्त्व प्राप्त झालं आहे. या दिवशी अनेक शुभ योग जुळून येणार आहेत. पंचांगानुसार, सर्वार्थ सिद्धी योग, शिवास योगामुळे अनेक राशींवर (Zodiac Signs) याचा सकारात्मक परिणाम दिसून येईल. त्यामुळे उद्याचा दिवस कोणत्या राशींसाठी (Zodiac Signs) भाग्यशाली असणार आहे ते जाणून घेऊयात.
मेष रास (Aries Horoscope)
मेष राशीच्या लोकांसाठी हा काळ फार उत्साहाचा असणार आहे. नशिबाची साथ तुमच्याबरोबर असेल. त्यामुळे तुम्ही कोणत्याही शुभ कार्याची सुरुवात उद्यापासून करु शकता. नवीन प्रोजेक्ट्स तुमच्या हाती लागतील. प्रगतीचे अनेक योग जुळून येणार आहेत. या दिवशी ग्रहांची स्थिती देखील अनुकूल असल्या कारणाने तुम्हाला कसलीच चिंता करण्याची गरज नाही.
सिंह रास (Leo Horoscope)
सिंह राशीच्या लोकांसाठी देव दिवाळीचा हा काळ फार उत्तम असणार आहे. या काळात तुमच्या मनात असलेली इच्छा पूर्ण करता येईल. तसेच, अनेक दिवसांपासून रखडलेली तुमची कामे तुम्हाला पूर्ण करात येतील. कुटुंबात सुख शांती नांदेल. तुमच्या आजूबाजूला सकारात्मक गोष्टींचा परिणाम दिसून येईल. मुलांच्या कलागुणांना चांगला न्याय मिळेल.
मकर रास (Capricorn Horoscope)
मकर राशीसाठी उद्याचा दिवस भाग्याचा असणार आहे. ज्या लोकांना नोकरीत बदल करायचा असेल त्यांच्यासाठी हा उत्तम काळ असेल. तसेच, तुमच्या मेहनतीला चांगलं यश मिळेल. तुमची आर्थिक स्थिती पूर्वीपेक्षा चांगली राहील. कामाच्या निमित्ताने तुम्हाला प्रवास करावा लागेल. मात्र हा प्रवास आनंददायी असेल. नवीन लोकांशी भेटीगाठी वाढतील.
वृश्चिक रास (Scorpio Horoscope)
वृश्चिक राशीला भाग्याची साथ मिळणार. तुमची नियोजित कामे तुम्हाला वेळेत करता येतील. तसेच, अनेक दिवसांपासून तुमचे रखडलेले पैसे तुम्हाला परत मिळतील. धार्मिक कार्यात तुमचं मन रमेल. तसेच, दान धर्म आणि पुण्याचं काम करत राहा. देवी लक्ष्मीची तुमच्यावर विशेष कृपा राहील.
मीन रास (Pisces Horoscope)
मीन राशीच्या लोकांचा उद्याचा दिवस लाभदायी असणार आहे. तुमचा दिवस अनुकूल असेल. दिवसाची सुरुवात सकारात्मक होईल. तसेच, काही कारणास्तव तुमचे पैसे खर्च होऊ शकतात. अशा वेळी पैशांचा जपून वापर करा. तसेच, प्रवासाचे योग जुळून येणार आहेत.
(टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.)
हेही वाचा :




















