Shri Krishna Updesh : भगवान श्रीकृष्णाचे 3 उपदेश म्हणजे यशाची गुरुकिल्ली! कोणते आहेत ते? जाणून घ्या
Shri Krishna Updesh : जर तुम्ही तुमच्या जीवनात भगवान श्रीकृष्णाच्या शिकवणीचे पालन केले तर, तुम्हाला यशाच्या मार्गात येणारे सर्व अडथळे दूर करण्याची गुरुकिल्ली मिळालीच म्हणून समजा...
Motivational Thoughts In Marathi : श्रीमद् भगवद्गीतेत (Bhagvad Geeta) जीवनाचे सार आहे. यासोबतच यात यश मिळवण्याची अनेक रहस्येही दडलेली आहेत. महाभारताच्या (Mahabharat) युद्धात, भगवान श्रीकृष्णाने (Lord Shri Krishna) अर्जुनाला गीतेची शिकवण सांगितली, ज्यामुळे पांडवांना कौरव सैन्याचा पराभव करण्यात यश आले. जर तुम्ही तुमच्या जीवनात भगवान श्रीकृष्णाच्या शिकवणीचे पालन केले तर, तुम्हाला यशाच्या मार्गात येणारे सर्व अडथळे दूर करण्याची गुरुकिल्ली मिळालीच म्हणून समजा... म्हणूनच कृष्णाच्या या शिकवणींना यशाची गुरुकिल्ली म्हटले जाते.
यशाचा मंत्र
श्रीकृष्णाने गीतेमध्ये दिलेल्या या शिकवणुकीत यशाचा मंत्र समाविष्ट आहे. ज्याने या शिकवणुकी जीवनात स्वीकारल्या, त्याला यश मिळण्यापासून कोणीही रोखू शकत नाही. महाभारत युद्धाच्या वेळी अर्जुन गोंधळलेला असताना श्रीकृष्णाने त्याला अनेक उपदेश दिले. कृष्णाच्या या शिकवणींना यशाचा मूळ मंत्र म्हटले गेले आहे, जे प्रत्येक व्यक्तीला माहित असणे आवश्यक आहे.
श्रीकृष्णाच्या या 3 शिकवणी म्हणजे यशाची गुरुकिल्ली!
रागावर नियंत्रण
कृष्णाने गीतेतील एका श्लोकात रागावर नियंत्रण ठेवण्यास सांगितले आहे. याचे कारण म्हणजे जेव्हा एखादी व्यक्ती रागात असते, तेव्हा तो गोंधळून जाऊ शकते. कारण रागामुळे गोंधळ निर्माण होतो. या परिस्थितीत योग्य-अयोग्य हा भेद संपतो आणि फक्त राग उरतो.
श्रीकृष्णाचा हा उपदेश जीवनात आत्मसात करणे आवश्यक
त्याचबरोबर माणसाची बुद्धीही रागाने विचलित होते. सध्याच्या काळातही यश मिळवायचे असेल तर श्रीकृष्णाचा हा उपदेश जीवनात आत्मसात करणे आवश्यक आहे. आज लोक रागात नोकरी आणि नातेसंबंधांवरून आपला जीव पणाला लावतात. म्हणूनच जेव्हा जेव्हा राग येतो तेव्हा क्षणभर थांबा आणि रागामुळे होणाऱ्या परिणामांचा विचार करा.
मोह सोडून सत्य जाणून घ्या
गीतेमध्ये श्रीकृष्ण अर्जुनाला एखाद्या गोष्टीचा मोह सोडून सत्य जाणून घेण्याचा प्रयत्न करण्यास सांगतात. मोहाचा काही उपयोग नाही. शरीर नश्वर आहे आणि एक दिवस नष्ट होईल. म्हणूनच देहाचा मोह सोडून समाज आणि धर्म यांच्यासाठी जे चांगले आहे. ते करण्यात अजिबात संकोच करू नका.
देव आणि धर्म
आजच्या काळातही देव आणि धर्म जाणून घेण्याचा प्रयत्न केला पाहिजे. यामुळे, तो कधीही चुकीच्या दिशेने जाणार नाही आणि यशस्वी होण्याची शक्यता देखील वाढेल.
वडीलधारी मंडळी आणि पालकांचे मत
गीतेमध्ये, कृष्ण अर्जुनाला सांगतात की, जीवनात एखाद्याने अनुभवातून शिकले पाहिजे. आजच्या काळातही ही गोष्ट जीवनात आणण्याची गरज आहे. आज लोक सहसा वडीलधारी मंडळी आणि पालकांचे मत आवश्यक मानत नाहीत.
सहज ध्येयापर्यंत पोहोचू शकाल.
तुम्ही ज्या वयात आणि टप्प्यावर आहात, तुमच्या वडीलधाऱ्यांनी त्या परिस्थितीला तोंड दिले आहे. म्हणूनच त्यांच्या अनुभवातून शिकून पुढे जा. याद्वारे तुम्हाला ध्येयाच्या मार्गात येणाऱ्या अडथळ्यांची जाणीव होईल आणि त्यांचे निराकरण करून तुम्ही सहज ध्येयापर्यंत पोहोचू शकाल.
(टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.)
संबंधित बातम्या
Geeta Gyan : हिंमत तुटल्यावर 'हे' काम माणसाने करावे, गीतेची अमूल्य शिकवण जाणून घ्या