Kamada Ekadashi 2025 : कामदा एकादशीला तुमच्या राशीनुसार करा 'हे' अचूक उपाय; भगवान विष्णूसह देवी लक्ष्मीही होणार प्रसन्न
Kamada Ekadashi 2025 : पंचांगानुसार, यंदाची कामदा एकादशी 8 एप्रिल 2025 रोजी मंगळवारी म्हणजेच आज साजरी केली जातेय. या दिवशी भगवान विष्णू आणि देवी लक्ष्मीची पूजा केली जाते.

Kamada Ekadashi 2025 : हिंदू धर्म मान्यतेनुसार, एकादशी तिथीला विशेष महत्त्व आहे. ही एकादशी भगवान विष्णूला समर्पित आहे. तसेच, या एकादशीला अत्यंत श्रद्धेने आणि नियमांनी केलं जातं. माहितीनुसार, प्रत्येक महिन्यात दोनदा एकादशीचा उपवास केला जातो. मात्र, चैत्र महिन्याच्या शुक्ल पक्षातील एकादशीला कामदा एकादशी म्हणतात.
पंचांगानुसार, यंदाची कामदा एकादशी 8 एप्रिल 2025 रोजी मंगळवारी म्हणजेच आज साजरी केली जातेय. या दिवशी भगवान विष्णू आणि देवी लक्ष्मीची पूजा केली जाते. असं म्हणतात की या दिवशी त्यांची पूजा केल्याने आपली सर्व संकटं दूर होतात. आणि मनातील सर्व इच्छा पूर्ण होतात. ज्योतिष शास्त्रानुसार, या दिवशी राशीनुसार काही उपाय केल्यास पुण्य फळ मिळतं.
मेष रास (Aries Horoscope)
ज्योतिष शास्त्रानुसार, कामदा एकादशीच्या दिवशी मेष राशीच्या लोकांनी भगवान विष्णूला चंदन अर्पण करावे. तसेच, 'नमो भगवते वासुदेवाय 'मंत्राचा 108 वेळा जप करावा. यामुळे तुम्हाला मानसिक शांती लाभेल.
वृषभ रास (Taurus Horoscope)
वृषभ राशीच्या लोकांनी या दिवशी श्रीहरींना पांढऱ्या रंगाची मिठाई आणि तुळस चढवावी. यामुळे तुमची आर्थिक स्थिती मजबूत होण्यास मदत होईल.
मिथुन रास (Gemini Horoscope)
ज्योतिष शास्त्रानुसार, मिथुन राशीच्या लोकांनी भगवान विष्णूला पिवळ्या रंगाची फुलं आणि केळ्याचा नैवेद्य दाखवावा. आणि 'ऊॅं वासुदेवाय नम: या मंत्राचा 108 वेळा जप करावा.
कर्क रास (Cancer Horoscope)
कर्क राशीच्या लोकांनी आजच्या दिवशी भगवान विष्णूला दूध आणि तांदळाचा नैवेद्य दाखवावा. त्याचबरोबर 'ऊॅं नारायणाय नम:'या मंत्राचा 108 वेळा जप करावा.
सिंह रास (Leo Horoscope)
सिंह राशीच्या लोकांनी आजच्या दिवशी भगवान विष्णूला केशरचा टिळा लावावा. आणि 'ऊॅं गोविंदाय नम:' या मंत्राचा 108 वेळा जप करावा. यामुळे तुमच्या कुटुंबात सुख शांती टिकून राहील.
कन्या रास (Virgo Horoscope)
कन्या राशीच्या लोकांनी या दिवशी हिरव्या रंगाचे मूग दान करावेत. तसेच, 'ऊॅं मधुसूदनाय नम:या मंत्राचा 108 वेळा जप करावा.
तूळ रास (Libra Horoscope)
तूळ राशीच्या लोकांनी या दिवशी भगवान विष्णूला गुलाबाचं फूल अर्पण करावं आणि 'ऊॅं पद्मनाभाय नम:' या मंत्राचा जप करावा. यामुळे तुमचे नातेसंबंध अधिक घट्ट होतील.
वृश्चिक रास (Scorpio Horoscope)
या राशीच्या लोकांनी 'ऊॅं हृशीकेशाय नम:'मंत्राचा जप करुन लाल कापडात गूळ बांधून देव्हाऱ्यात ठेवावा. यामुळे घरातील नकारात्मक ऊर्जा दूर होईल.
धनु रास (Sagittarius Horoscope)
धनु राशीच्या लोकांनी या दिवशी पिवळ्या रंगाचे कपडे परिधान करावेत. आणि देवाला केळ्यांचा नैवेद्य दाखवावा.
मकर रास (Capricorn Horoscope)
मकर राशीच्या लोकांनी भगवान विष्णूला पंचामृत अर्पण करावे. आणि 'ऊॅं दामोदराय नम:'या मंत्राचा 108 वेळा जप करावा. यामुळे तुम्हाला धनलाभ होईल.
कुंभ रास (Aquarius Horoscope)
कुंभ राशीच्या लोकांनी या दिवशी शंकात जल भरुन भगवान विष्णूचा अभिषेक करावा. तसेच, 'ऊॅं अच्युताय नम:' या मंत्राचा जप करावा. मनातील इच्छा पूर्ण होतील.
मीन रास (Pisces Horoscope)
मीन राशीच्या लोकांनी आजच्या दिवशी केसरचा नैवेद्य दाखवावा. तसेच, 'ऊॅं अनंताय नम:' या मंत्राचा जप करावा. यामुळे तुमची रखडलेली कामे पूर्ण होतील.
(टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.)
हेही वाचा:




















