Shani Dev : लवकरच होतंय शनीचं नक्षत्र परिवर्तन; 28 एप्रिलपासून 'या' 2 राशी ठरतील भाग्यवान, धनसंपत्तीचा होणार वर्षाव
Shani Dev : 29 मार्च रोजी शनीने कुंभ राशीतून मीन राशीत प्रवेश केला होता. सध्या शनी पूर्वाभाद्रपद नक्षत्रात आहे. ज्योतिष शास्त्रानुसार, 28 एप्रिल रोजी शनी उत्तराभाद्रपद नक्षत्रात प्रवेश करणार आहे.

Shani Dev : वैदिक ज्योतिष शास्त्रानुसार, शनीला (Shani Dev) कर्मफळदाता म्हणतात. नवग्रहांमध्ये शनी (Lord Shani) हा सर्वात महत्त्वाचा ग्रह मानला जातो. शनीने राशी परिवर्तन किंवा नक्षत्र परिवर्तन केल्यास सर्व 12 राशींवर त्याचा शुभ अशुभ परिणाम होतो. त्यामुळेच शनीच्या परिवर्तनाने सर्व राशी फार सांभाळून असतात. सध्या शनी मनी राशीत विराजमान आहे. तर, लवकरच शनीचं नक्षत्र परिवर्तन होणार आहे. यामुळे कोणकोणत्या राशींना (Zodiac Signs) याचा लाभ मिळणार आहे ते जाणून घेऊयात.
नक्षत्र परिवर्तन
शनीला एका राशीतून दुसऱ्या राशीत परिवर्तन करण्यासाठी तब्बल अडीच वर्षांचा कालावधी लागतो. 29 मार्च रोजी शनीने कुंभ राशीतून मीन राशीत प्रवेश केला होता. सध्या शनी पूर्वाभाद्रपद नक्षत्रात आहे. ज्योतिष शास्त्रानुसार, 28 एप्रिल रोजी शनी उत्तराभाद्रपद नक्षत्रात प्रवेश करणार आहे.
मिथुन रास (Gemini Horoscope)
शनीच्या नक्षत्र परिवर्तनाने मिथुन राशीच्या लोकांना याचा चांगलाच लाभ मिळणार आहे. या काळात तुमच्या आयुष्यात येणारी संकटं हळुहळू दूर होतील. तसेच, देवी लक्ष्मीच्या कृपेने तुमच्यावर धनसंपत्तीचा वर्षाव होईल. तुमच्या व्यवसायाचा विस्तार वाढलेला दिसेल. तसेच, समाजात तुमचामान-सन्मान वाढलेला असेल. तरुणांसाठी नवीन रोजगार उपलब्ध होतील. तसेच, विद्यार्थ्यांच्या कलागुणांना चांगला वाव मिळेल. तुमच्या करिअरमध्ये तुम्ही चांगलं यश संपादन कराल. इतकंच नव्हे तर, तुमच्यावर ज्या काही जबाबदाऱ्या सोपवण्यात येतील त्या तुम्ही प्रामाणिकपणे पार पाडाल.
कुंभ रास (Aquarius Horoscope)
कुंभ राशीच्या लोकांसाठी शनीच्या नक्षत्र परिवर्तनाचा काळ फार शुभ ठरणार आहे. यामुळे तुमचं भाग्य नक्कीच उजळू शकतं. तसेच, या कालावधीत तुमच्या व्यवसायाला चांगलं यश मिळेल. तुमच्या मार्गात येणारे अडथळे दूर होतील. तुमचं व्यक्तिमत्व अधिक खुलून दिसेल. तसेच, कामाच्या ठिकाणी देखील तुम्हाला एखाद्या मोठ्या प्रोजेक्टवर काम करण्याची संधी मिळेल. तुम्हाला धनलाभ होऊ शकतो. तसेच, परदेशी प्रवासाचे योग देखील जुळनू येणार आहेत. शेअर मार्केटमध्ये तुम्ही गुंतवून ठेवलेल्या पैशांतून तुम्हाला चांगला लाभ मिळेल. एकंदरीतच हा काळ तुमच्यासाठी फार आनंदाचा आणि समाधानकारक असणार आहे.
(टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.)
हेही वाचा:




















