Horoscope Today 21 April 2025: आजचा सोमवार 'या' 5 राशींसाठी ठरणार भाग्यशाली! मनातील इच्छा होतील पूर्ण, 12 राशींचे आजचे राशीभविष्य वाचा
Horoscope Today 21 April 2025: आजचा सोमवार 12 राशींसाठी कसा असेल? कोणासाठी दिवस फलदायी ठरेल? आजचे राशीभविष्य जाणून घ्या.

Horoscope Today 21 April 2025: वैदिक पंचांगानुसार, आज 21 एप्रिल 2025, म्हणजेच आजचा वार सोमवार. आजचा दिवस सर्व राशींसाठी खास आणि लाभदायक ठरणार आहे. या दिवशी ग्रहांच्या हालचाल पाहता आजचा दिवस फार महत्त्वाचा आहे, ज्याचा परिणाम सर्व 12 राशींच्या लोकांवर दिसून येईल. भगवान भोलेनाथाच्या कृपेने तुमचा आजचा दिवस कसा असेल? कोणासाठी दिवस फलदायी ठरेल? 12 राशींचे आजचे राशीभविष्य (Horoscope Today) जाणून घ्या.
मेष रास (Aries Horoscope Today)
मेष राशीसाठी आज महिला घरामध्ये जास्त रमतील वैवाहिक जीवनात संघर्ष आणि अशांतता निर्माण करणारा दिवस
वृषभ रास (Taurus Horoscope Today)
वृषभ राशीच्या लोकांनो आज तरुण वर्गाला प्रेम प्रकरणांमध्ये अडथळे येण्याची शक्यता, वांग्मय कला क्षेत्रामध्ये आपल्या बुद्धीची चमक दाखवू शकाल .
मिथुन रास (Gemini Horoscope Today)
मिथुन राशीच्या लोकांनो आज कोणालाही मदत करताना, त्या व्यक्तीच्या स्वभावाचा खोलवर अंदाज घेणे गरजेचे ठरेल
कर्क रास (Cancer Horoscope Today)
कर्क राशीच्या लोकांनो आज कलाकारांना आपल्या कलेचा शुद्ध अविष्कार दाखवण्यात यश मिळेल, विद्यार्थ्यांनी इतर गोष्टींकडे लक्ष देण्यापेक्षा अभ्यासात लक्ष द्यावे
सिंह रास (Leo Horoscope Today)
सिंह राशीच्या लोकांनो आज मोठ्या भावनांच्या विचित्र वागणुकीचा त्रास होईल, व्यापारी वर्गाला काही गोष्टींचे आकलन न झाल्यामुळे निर्णय घेणे कठीण जाईल
कन्या रास (Virgo Horoscope Today)
कन्या राशीच्या लोकांनो आज नोकरीमध्ये वरिष्ठांच्या अरेरावीला तोंड द्यावे लागेल, परंतु घरातील वातावरण हलकेफुलके राहिल्यामुळे स्वास्थ्य लाभेल
तूळ रास (Libra Horoscope Today)
तूळ राशीच्या लोकांनो आज महिलांना काही निर्णय घेणे कठीण जाईल, एखादी गोष्ट करायची नसेल तर तसे बाहेर न दाखवता परिस्थिती व्यवस्थित हाताळा
वृश्चिक रास (Scorpio Horoscope Today)
वृश्चिक राशीच्या लोकांनो आज नोकरी व्यवसायामध्ये वरिष्ठांची वाढ न घालता काम साधून घेणे चांगले जमेल.
धनु रास (Sagittarius Horoscope Today)
धनु राशीच्या लोकांनो आज आज कोणताही अहंकार ठेवू नये, स्वत:च्या बाहेर जाऊन थोडे आचरण ठेवलेत तर ते फायद्याचे ठरेल
मकर रास (Capricorn Horoscope Today)
मकर राशीच्या लोकांनो आज रक्तदाब हृदयविकाराच्या पेशंटने पथ्य पाणी आणि आहार विहार सांभाळावा
कुंभ रास (Aquarius Horoscope Today)
कुंभ राशीच्या लोकांनो आज मनाचा तोल सांभाळावा, नातेवाईकांना हात उसने दिलेले पैसे मागण्यासाठी दिवस फायद्याचा
मीन रास (Pisces Horoscope Today)
मीन राशीच्या लोकांनो आज पैशाची वसुली करताना उच्चपदस्थ लोकांची मध्यस्थी घ्यायला हरकत नाही, महिलांना आपले स्वत्व जपण्याची संधी मिळेल.
(टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे.)




















